ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Happy Birthday Wishes For Mother In Marathi

100+ Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

‘आई’ या केवळ दोन अक्षरी शब्दात किती जादू सामावलेली आहे बघा ना!..ज्या आईच्या उदरी आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो. ती आईच आपल्या सुखदु:खात कायम आपल्या पाठीशी असते. चुकल्यावर मारते पण मारल्यानंतर जवळ घ्यायलाही विसरत नाही. तिच्या समोर जेवणाचे भरलेले ताट वाढले असले तरी तुम्ही खाईपर्यंत तिच्या पोटात अन्नाचा एकही कण जात नाही. तुम्हाला कोणी बोलले तर ते तिला मुळीच चालत नाही. कधी कडक कधी नरम अशा वागण्यातून ती तुमच्यावर संस्कार करते. अशी आई प्रत्येकाच्या जीवनात सर्वोच्च अशा स्थानावर असते. आईचा प्रत्येक दिवस हा तुम्ही खास करायला हवा. तुमच्या आईच्या जन्मदिनी म्हणजेच वाढदिवशी काहीही न करता प्रेमाचे दोन शब्द तिला बोलून दाखवले तरी तिचा दिवस धन्य झाल्यासारखा होतो. अशा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Kavita In Marathi) देण्यासाठी आम्ही काही निडक आई वाढदिवस संदेश शोधून काढले आहेत. ते पाठवून तुम्ही आईचा दिवस आनंदाने भरु शकता. 

Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आईचा वाढदिवस हा खास असायलाच हवा. आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. तुमच्या लाडक्या आईच्या वाढदिवसाची तुम्ही जय्यत तयारी केली असेल पण तुमच्या भावना या शब्दातून व्यक्त करण्यासाठी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Mother) देण्यासाठी आम्ही काही निवडक शुभेच्छा संदेश शोधून काढले आहेत.

Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Mother In Marathi

 • स्वत:ला विसरुन  घरातील इतरांसाठी
  सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
  खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
  आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
  एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
  आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
 • प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
  तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
  आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
  यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
  तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मी कलेकलेने वाढताना,
  तू कधीही केलास नाही तुझा विचार,
  आई आज आहे तुझा वाढदिवस,
  आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
 • व्हावीस तू शतायुषी,
  व्हावीस तू दीर्घायुषी,
  ही एकच माझी इच्छा
  आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • माझ्या आयुष्यातील यशाच्या
  शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
  अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
  पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस
  आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
  तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • कितीही काळ लोटला तरी
  माया तुझी ओसरत नाही,
  तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – 100+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Mother In Law In Marathi | सासूला पाठवा वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्न करुन सासरी गेल्यानंतर सासू हीच दुसरी आई असते. जितकी माया तिला कराल तितकीच ती देखील तुम्हाला लावते. हल्ली सासू-सूनेचे नाते ‘तू तू मै मैं’ असं राहिलेलं नाही. कारण हे नात आता त्यापलीकडे जाऊन आई आणि मुलीचे झालेले आहे. त्यामुळे तुमच्या लाडक्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा या खासच द्यायला हव्यात. (Birthday Wishes For Mother In Law In Marathi)

Birthday Wishes For Mother In Law In Marathi | सासूला पाठवा वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Mother-In-Law In Marathi

 • सासू माझी भासे मला माझी आई,
  कधी केला नाही दुरावा,
  घेते माझी काळजी वेळोवेळी,
  कधी असले उदास की,
  मायेने घेते जवळ,
  तिची सावली असावी नेहमीच अशी
  घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • सासू म्हणजे खाष्ट
  असे मला कधीच जाणवले नाही,
  तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
  आज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
  तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या
 • लाडाची लेक मी तुमची
  झाले कधी माहीत नाही,
  अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली  कळली नाही,
  आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • आई तू माझी लाडाची,
  तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
  तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
  सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
  तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
  सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
  पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
  म्हणजे माझ्या सासूबाई,
  माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
  अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
  माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
  प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जगातील चांगली सासू असण्यासोबतच
  तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
  अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
  कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
  सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
  हीच देवाचरणी इच्छा,
  सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • मुंबईत घाई,
  शिर्डीत साई,
  फुलात जाई,
  आणि गल्लीत भाई,
  पण जगात भारी माझी सासूबाई,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – मुलीसाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा

mom birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

birthday wishes for mom in marathi – आईच्या वाढदिवसासाठी तुम्ही काही खास स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे असे स्टेटसही ठेवू शकता. शिवाय आईसाठी गिफ्ट द्यायचा असा विचार करत असाल तर शब्दरुपी हे गिफ्टस आईला कायमच आवडते हे देखील लक्षात घ्या,

ADVERTISEMENT
Birthday Status For Mother In Marathi

Birthday Status For Mother In Marathi

 • देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
  म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • आई तुझ्या मूर्तीवाणी,
  या जगात मूर्ती नाही,
  अनमोल जन्म दिला तू आई,
  तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
 • माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
  तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!
 • आई म्हणजे मायेचा पाझर,
  आईची माया एक आनंदाचा सागर,
  आई म्हणजे घराचा आधार,
  आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • दिवस आज आहे खास,
  तुला उदंड आयुष्य लाभो,
  हाच मनी माझ्या ध्यास
  आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • आईच्या गळ्याभोवती
  तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
  हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
  मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी
 • आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
  असेच काय असू दे,
  प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जल्लोष आहे गावाचा.
  कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
  आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
  तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – Birthday Wishes For Father In Marathi

Birthday Poem For Mom In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

| आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आईच्या वाढदिवसासाठी खास कविताही आम्ही निवडल्या आहेत. या कविताही आईला नक्कीच आनंद देतील.

 • स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
  जी प्रेम करते तिला,
  ‘आई’ म्हणतात,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • रोज सकाळी मनामध्ये,
  तुझा फोन वाजत असतो,
  तुझा आवाज ऐकवत असतो,
  तुझी खुशाली सांगत असतो,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जगी माऊलीसारखी कोण आहे,
  जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
  असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
  त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
  जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,
  जिच्या यातनांना जगी तोड नाही,
  तिचे नाव जगात आई,
  आई एवढे कशालाच मोल नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • माझे हात तुझ्या हातात आई,
  मी चालतो ठाई ठाई,
  अशीच थाप राहु दे राहु दे आई
  तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
  जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • माझ्या जीवनाची सावली,
  आई माझी माऊली,
  कष्ट करोनी अतोनात,
  भरवलास तू मला घास,
  केलीस माझ्यावर माया,
  जशी वृक्षाची छाया,
  माझ्या जीवनाची सावली,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • नवा गंध नवा आनंद,
  निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
  व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
  तुझा आनंद शतगुणित व्हावा,
  आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!
 • आई दिव्याची ज्योत असते,
  आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
  म्हणून दु:ख सगळे सोसत असते.
 • बघते प्रतिंबिब तुझ्यात
  मिळतो मला दिलासा,
  शोधू कुठे तुझ्यात मला,
  मग दिसे मज एक आरसा
  आरशात शोधाताना तुला,
  आई मज तू जवळ भासे,
  तुझ्याविना माझे आयुष्य,
  म्हणजे पाण्याविना मासे,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • अनेक चेहरे बदलताना पाहिले,
  आईला मात्र प्रत्येकवेळी मी
  प्रेमच करताना पाहिले,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – Birthday Wishes For Mama In Marathi

ADVERTISEMENT

60th Birthday Wishes For Mom In Marathi | आईच्या साठाव्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश

60th Birthday Wishes For Mom In Marathi

आईचा साठावा वाढदिवस हा अगदी दणक्यातच व्हायला हवा. तिच्या या खास दिवसासाठी खास शुभेच्छा संदेश पाठवायला हवेत. जेणे करुन आईच्या आनंदात आणखी भर पडेल. मातृदिनाच्या शुभेच्छा पाठवूनही तुम्ही तिचा दिवस आनंदाने भरु शकता

 • प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
  तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • स्वत: उन्हाचे चटके सोसून
  मला सावलीत ठेवणाऱ्या
  माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
  कायम तुझे हात सरसावतात,
  अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
  आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • नाती जपले, तू प्रेम दिलेस,
  या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
  पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • जगात असे एकच न्यायालय आहे,
  जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मनात आमच्या एकच इच्छा
  आपणास उदंड आयुष्याच्या
  हार्दिक शुभेच्छा!
 • एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
  पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 • या मौल्यवान दिवशी,
  तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
  तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
  तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
  आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – 50th Birthday Wishes In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आईची जागा काही केल्या कोणी घेऊ शकत नाही. तिच्या शिवाय कोणाच्याही जीवनाला अर्थ नाही. अशा आपल्या लाडक्या आईसाठी Birthday Wishes For Mother In Marathi

 1. आयुष्यात तू मिळालीस
  आयुष्य धन्य झाले,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2. आजही तुझ्या हाताने भऱवलेला खास लागतो गोड,
  का मी मोठा झालो,
  पण आजही तुझ्या घासाला आहे तीच चव
 3. तुझे डोळे मिटण्याआधी
  माझे डोळे फुटावे
  तुझ्याशिवाय आई आयुष्यात काहीही नसावे
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 4. लाख लाख शुभेच्छांनी वाढावे तुझे आयुष्य
  तुला मिळावा जीवनाचा परमानंद
 5. आमच्यासाठी आयुष्यभर झटून केलास तू
  तुझ्या आनंदाचा त्याग
  आता काहीही नको मला
  कारण तूच आहेस माझ्या जीवनाचा आधार
 6. वय वाढतं त्याचा आनंद आहे,
  मग तू म्हातारी होऊ नये असे देखील वाटते
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 7. माझ्या शुभेच्छा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन याव्यात
  हीच इश्वरचरणी प्रार्थना, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 8. जगासाठी तू केवळ एक व्यक्ती असशील
  पण माझ्यासाठी तू माझं सगळं जग आहे,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9. आयुष्य माझे सगळे तुझ्याभोवती फिरते,
  तुझ्यासाठीच माझे मन कायम झुरते आहे,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 10. आमच्यात नसली म्हणून काय झाले
  तुझी जागा कोणीही घेतली नाही
  तू माझ्या मनात कायम अबाधित राहशील
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Mummy In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आईला वाढदिवसाच्या थोड्या हटक्या अशा शुभेच्छा देण्याचा विचार असेल तर तुम्ही आईला द्या Happy Birthday Mummy In Marathi

ADVERTISEMENT
 1. आई आज तुझा वाढदिवस, आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस
  तुझा जन्म झाला म्हणून आम्ही जन्मलो, धन्य झालो
 2. लाडाने मी तिला म्हणतो मम्मी,
  तू असतेस म्हणूनच सगळे लागते यम्मी,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 3. देवाने दिलेली अशी भेटवस्तू आहेस
  तू, ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
 4. लाडाची एकच अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे,
  आई तू सगळ्यात खास आहेस,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा आई
 5. ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
  म्हणूनच त्याने आईरुपी व्यक्ती आयुष्यात आणली
  अजून काय हवे
 6. तुझ्याशिवाय या जीवनाची तुलना करणे आहे
  अशक्य,
  आई तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
 7. सर्व चुकांची माफी आहे जिच्याकडे,
  जी मायेने करते मला जवळ
  अशा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 8. आयुष्यात कोणीही आले तरी तुझी
  जागा कोणी घेऊ शकत नाही,
  तुझ्याशिवाय माझा एक दिवस
  जाऊ शकत नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9. चेहराही न पाहता प्रेम करणारी फक्त आई असते,
  आय लव्ह यू माय सुपर मॉम
 10. कोणीही विश्वास ठेवला नाही तरी तुमच्यावर
  आंधळा विश्वास ठेवते ती फक्त आपली आई
  असते,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Latest Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

आईला वाढदिवसाच्या Latest Birthday Wishes For Mother In Marathi द्यायच्या असतील तर तुम्हाला हे काही शुभेच्छा संदेश नक्की आवडतील असे आहेत

 1. दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन
  तुला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2. जगात माझ्यासाठी कोणाकडेही वेळ नसला तरी
  माझ्या आईकडे कायम असतो,
  अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 3. आई, तुझा वाढदिवस असतो नेहमीच खास
  दरवर्षी व्हावी यात वाढ
 4. हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
  पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा
  आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5. आई असते प्रेमाचे निर्मळ रुप,
  तुझ्या असण्यानेच आयुष्याला मिळतो हुरुप
  आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 6. तुझ्या प्रेमाचा हात डोक्यावर माझ्या कायम असावा,
  आई तुला वाढदिवसाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा
 7. माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा गुरु आहे तू आई,
  तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ
 8. अभिमानाने कुठेही नेऊ शकणारी व्यक्ती आहेस तू ,
  तुझ्याशिवाय जगण्याचा विचार तरी कसा करु
 9. आई, तुझा प्रत्येक वाढदिवस असावा खास,
  त्यात लावावेत मी चार चांँद
 10. रागाव, ओरड प्रसंगी मार पण माझ्याशी बोलणं
  कधीही सोडू नकोस
  माझी आई

च्छा देत तिचा हा दिवस आणखी खास करा.

हे देखील वाचा

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT
24 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT