ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
पावसाळ्यामुळे घराचे लाकडी दरवाजे फुगले असतील तर करा हे उपाय

पावसाळ्यामुळे घराचे लाकडी दरवाजे फुगले असतील तर करा हे उपाय

पावसाळा म्हणजे आनंद आणि आल्हाददायक वातावरण… गरमागरम भजी, वाफाळता चहा आणि बाल्कनीत बसून मस्त मारलेल्या गप्पा, अधूनमधून मस्त भटकंती करण्यासाठी काढलेली पावसाळी पिकनिक आणि डोंगरदऱ्यातून निसर्गाचा घेतलेला वेध… असा पावसाळा कोणाला नाही आवडणार. मात्र प्रत्येकासाठी पावसाळा म्हणजेच असंच सारं असेल असं नाही. अनेकांसाठी पावसाळा म्हणजे नकोशी वाटणारी आजारपणं, छताचं लिकेज, पूरामुळे घरात साचणारं पाणीदेखील असू शकतं. त्यामुळे सर्वांसाठीच हा ऋतू आल्हाददायक असेलच असं नाही. पावसाळ्यात कधी कधी घरात दमट वातावरणातून निर्माण झाल्यामुळे दुर्गंधीमुळे जीव गुदमरल्यासारखा वाटतो , अशा अति पावसाळी वातावरणात साधे धुतलेले कपडेदेखील लवकर सुकत नाहीत, काहींच्या घरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे फुगतात आणि ते नीट लागत नाहीत. पावसाळ्यात दरवाजे फुगण्याचा त्रास तर प्रत्येकालाच जाणवतो. यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरातील दरवाजे पावसाळ्यात फुगणार नाहीत. या टिप्ससोबत वाचा आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi), सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi, टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

दरवाजे ऑयलिंग करा

पावसाळ्यात तुमच्या घराचे अथवा बाथरूमचे दरवाजे फुगत असतील तर ते लवकर खराब होऊ शकतात. कारण या वातावरणात ओलाव्यामुळे लाकडी दरवाजा फुगतो आणि त्याला बुरशी येते. यासाठीच पावसाळा सुरू होताच दरवाज्यांना ऑयलिंग अथवा वॅक्सिंग करा. ज्यामुळे दरवाजा फुगणार नाही. ऑयलिंग करण्यासाठी तुम्ही घरातील दरवाज्याला कोणतंही तेल कापसाच्या मदतीने लावू शकता. 

पाण्याने स्वच्छ करू नका

पावसाळा म्हणजे जीवजंतू आणि इनफेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच घरात सतत स्वच्छता राखली जाते. घराची स्वच्छता करताना जर तुम्ही लाकडी दरवाजे पाण्याने पुसत असाल तर असं करू नका. कारण दरवाजा ओला झाला तर तो पावसाळ्यात लवकर खराब होऊ शकतो. यासाठी कोरड्या कापडाने अथवा एखाद्या तेलाने लाकडी दरवाजा स्वच्छ करा. 

पॉलिश करून घ्या

लाकडी दरवाजे वेळच्या वेळी पॉलिश करून घेतले तर ते लवकर खराब होत नाहीत. यासाठी पावसाळा सुरू होताच घरातील दरवाजे आधी पॉलिश करून घ्या. ज्यामुळे दरवाज्याला लागलेली बुरशी, वाळवी अथवा छिद्रे नष्ट होतात. सहाजिकच यामुळे दरवाजे फुगत नाहीत आणि खराब देखील होत नाहीत. 

ADVERTISEMENT

पावसाळ्यात दरवाजे दमट पडून फुगू नयेत, यासाठी जेव्हा घरात ऊन येत असेल तेव्हा दारे खिडक्या उघड्या ठेवा ज्यामुळे घरातील वातावरण खेळतं राहील. तसंच आठवड्यातून एकदा दारे, खिडक्या नीट पुसून स्वच्छ करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT