ओव्हरसाईज टी-शर्ट बऱ्याचदा कॅज्युअल लुकसाठी आणि आरामदायक वाटण्यासाठी वापरलं जातं. पिकनिकला जाताना अथवा शॉपिंगसाठी पटकन तयार होताना तुम्ही एखादं ओव्हरसाईज टी-शर्ट नक्कीच वापरू शकता. ओव्हरसाईज टी -शर्टने तुम्ही वेगवेगळे लुक करू शकता. असा लुक करून सर्वांपेक्षा तुम्ही नक्कीच हटके दिसू शकता. एखाद्या बर्थडे पार्टीला, पिकनिकसाठी, फॅमिली गेट-टुगेदर, बॉयफ्रेंडसोबत फिरायला जाताना अथवा शॉपिंगसाठी तुम्ही हे लुक करू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत ओव्हर साईज टी-शर्टसोबत कोणते निरनिराळे लुक करता येतील हे शेअर करत आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी एखादा परफेक्ट लुक निवडता येईल.
बऱ्याचदा तुमच्याकडे असलेलं ओव्हरसाईज टी-शर्ट नेमकं कधी आणि कोणत्या कपड्यांसोबत कॅरी करावं हा प्रश्न तुम्हाला पडतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत 12 निरनिराळे लुक शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी हटके आणि स्टायलिश दिसू शकाल.
वाचा - समर टॉपचं कलेक्शन
ओव्हरसाईज टी शर्ट आणि बॉयफ्रेंड जीन्स हा एक कॉमन पण मस्त लुक आहे. कारण ओव्हर साईज टी शर्ट तुम्ही तुमच्या एखाद्या बॉयफ्रेंड जीन्ससोबत अगदी मस्त कॅरी करू शकता. बॉयफ्रेन्ड जीन्समध्ये थोडासा रफ लुक असतो. ज्यामुळे तुम्हाला कॅज्युअल स्टाईल करता येईल. अशा लुकसाठी तुम्ही तुमच्याजवळील एखादं ओव्हरसाईज टी -शर्ट या जीन्ससोबत पेअर करू शकता. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाताना, डेटसाठी अथवा फॅमिलीसोबत आऊटींग करताना तुम्ही या लुकमध्ये अगदी मस्त दिसाल.
जर तुमच्याकडे एखादं व्हाईट कलरचं ओव्हरसाईज टी-शर्ट असेल तर ते तुम्ही तुमच्या एखाद्या डेनिम मिनी स्कर्चवर कॅरी शकता. शॉपिंगला जाण्यासाठी हा लुक अगदी परफेक्ट आहे. कारण शॉपिंगला जाताना तुम्हाला मोकळे आणि आरामदायक कपडे हवे असतात. ज्यामुळे खरेदी करताना तुम्हाला सुटसुटीत आणि ट्रेंडी वाटेल.
ओव्हरसाईज टी-शर्ट स्टाईल करण्याचा हा जुना पण तरिही ट्रेंडी प्रकार आहे. तुमच्या टी-शर्टला पुढच्या बाजूने एक गाठ मारा ज्यामुळे ते टी-शर्ट तुमच्या बांध्याला अगदी फिट बसेल. टी-शर्ट घालण्याचा हा एक स्टाईलिश प्रकार आहे. शिवाय तुम्ही घाललेला स्कर्ट अथवा पॅंन्ट यामुळे व्यवस्थित दिसेल. शिवाय जर तुम्हाला कॉन्फिडंट लुक हवा असेल तर हा अगदी बेस्ट आहे.
कतरिना कैफप्रमाणे नुसतं तुमच्याकडचं एखादं लोकरीने विणलेलं ओव्हरसाईज टी-शर्ट तुम्ही ट्राय करू शकता. पिकनिक अथवा बॉयफ्रेंडसोबत नाईट आऊटिंग करताना तुम्ही हे टी शर्ट नक्कीच ट्राय करू शकता. मात्र टी-शर्टचा रंग मात्र व्हायब्रंट घ्या. ज्यामुळे त्यासोबत दुसरं काही कॅरी केलं नाही तरी तुमचा लुक खुलून दिसेल.
पेस्टल कलरच्या या ओव्हरसाईज टी-शर्टसोबत काळ्या रंगाची शॉर्ट अगदी परफेक्ट दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा एक सिंपल पण परफेक्ट लुक दिसेल. या टी शर्टसोबत तुम्ही काळ्या रंगाची कोणतीही जीन्स, लेगिंग अथवा जेगिन पेअर करू शकता. हलका रंग असल्यामुळे तुम्ही डेली रूटीनसाठी हा लुक करण्यास काहीच हरकत नाही.
काळ्या पांढऱ्या रंगाच्या जेगिनवर काळ्या रंगाच्या या ओव्हरसाईज टी-शर्टमुळे तुम्हाला एक हटका लुक नक्कीच मिळेल. शिवाय नेहमीसाठी तुम्ही या लुक ट्राय करू शकता. मॉर्निंग वॉक अथवा पिकनिकला जाताना तुम्ही हा लुक ट्राय करू शकता.
समजा तुम्ही वेकेशनवर आहात आणि तिथे तुम्हाला आकर्षक आणि ग्लॅमरस असा दोन्ही लुक हवा असेल तर हा लुक ट्राय करा. पेस्टल कलरच्या ओव्हरसाईज टी-शर्टला काळ्या रंगाच्या मिनी स्कर्टवर पेअर करू शकता. मोकळे केस आणि असा ग्लॅम लुकमुळे या वेकेशनवर तुम्ही अगदी मनसोक्ट फोटोशूट करू शकता.
वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ओव्हरसाईज टी शर्टची स्टाईल करू शकता. जर तुम्हाला ओव्हर क्लॉथची फॅशन करणं आवडत असेल तर ही स्टाईल जरूर कॅरी करा. तुमच्या एखाद्या टी शर्टवर तुम्ही कंबरेवर जीन्स अथवा इतर कोणतंही जॅकेट बांधू शकता. ज्यामुळे तुमचा ओव्हरसाईज टी-शर्ट लुक अगदी परफेक्ट दिसेल.
क्रॉप टॉपची फॅशन सध्या इन आहे. तुम्ही एखादं ओव्हरसाईज क्रॉप टी-शर्ट यासाठी ट्राय करू शकता. ज्यामुळे तुमचा गर्ली लुक नक्कीच खुलून येईल. जीन्स अथवा इतर रंगाची पॅंटचं कॉंम्बिनेशन तुम्ही करू शकता. यासोबत जर तुम्ही शॉर्ट्स, पंपस अथवा अॅंकल लेंथ शूज घातले तर तुमचा लुक अगदी हटके दिसेल.
ओव्हरसाईज टी-शर्ट कॅरी करण्यासाठी स्किनी पॅंटसोबत ते पेअर करणं हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुमचं कोणत्याही रंगाचं अथवा मटेरिअलचं टी-शर्ट तुम्ही तुमच्या स्किनी जीन्ससोबत ट्राय करू शकता. ज्यामुळे तुमच्या कंबरेकडचा भाग शेपमध्ये दिसू शकतो. शिवाय प्रत्येकीकडे एकतरी स्किनी जीन्स असतेच त्यामुळे ही स्टाईल करणं प्रत्येकीला शक्य आहे.
जर तुम्हाला अगदी गर्ली लुक हवा असेल तर तुमच्याजवळंच एखादं पिंक कलरचं ओव्हरसाईज टी-शर्ट घ्या. व्हाईट कलरच्या जीन्सवर पिंक कलरचं टी-शर्ट पेअर केल्यामुळे तुम्ही अगदी सुंदर दिसाल. बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाण्यासाठी हा लुक अगदी बेस्ट आहे.
व्हेकेशनवर जाताना विमान प्रवासासाठी हा लुक अगदी परफेक्ट आणि सोयीचा आहे. कारण ओव्हरसाईज टी-शर्टमुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. शिवाय विमानात प्रवास करताना थंडीदेखील वाजणार नाही.
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा -
जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!
तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स
स्टायलिश लुकसाठी ट्राय करा 'हे' विविध प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट