ADVERTISEMENT
home / Fitness
Indoor workout for monsoon in Marathi

पावसाळ्यात नियमित करा हे इनडोअर व्यायाम, राहाल एकदम फिट

पाऊसाचा जोर वाढला की चालणे, धावणे, सायकलिंग बंद करावं लागतं. कधी कधी तर जीमला जाणंही कठीण होतं. मग अशा कारणांमुळे तुमच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत असेल तर तुम्ही घरीच व्यायामाचा सराव करायला हवा. व्यायाम हा सातत्याने केला तरच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी, फिटनेस राखण्यासाठी तुम्ही व्यायाम सुरु केला असेल तर पावसामुळे त्यात व्यत्यय येऊ देऊ नका. यासाठी हे इनडोअर व्यायामाचे प्रकार करून पावसाळ्यात फिट आणि निरोगी राहा. यासोबतच जाणून घ्या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे,

स्कॉट (Squat Exercise)

स्कॉट हा व्यायामाचा असा एक प्रकार आहे ज्यासाठी तुम्हाला कोणतेही साधन लागत नाही. कुठेही आणि केव्हाही तुम्ही स्कॉट करू शकता. स्कॉट एक्सरसाइझसाठी तुम्हाला फक्त तुमचे दोन्ही हात पुढे करून सरळ उभं राहायचं आहे. छाती पुढे आणि पाठीचा कणा ताठ असायला हवा. हळू हळू गुडघ्यातून खाली जात खुर्चीवर बसल्याप्रमाणे पोझिशन करायची आहे. श्वास घेत खाली जायचं आणि श्वास घेत वर यायचं इतका सोपा हा व्यायामाचा प्रकार आहे. दिवसभरात थोडा वेळ काढून तुम्ही नियमित स्कॉट घरीच करू शकता. सुरूवातीला पाच, दहा स्कॉट करा मग हळू हळू त्याचे प्रमाण आणि सेट वाढवत न्या. ज्यामुळे तुमच्या हात, पाय, मांड्या, पोट, कंबरेला चांगला आराम मिळेल.

पुश अप्स (Push Ups) 

पुश अप हा एक पारंपरिक आणि चांगला व्यायामाचा प्रकार आहे. विशेष म्हणजे तो तुम्ही कुठेही सहज करू शकता. यासाठी जमिनीवर पोटावर झोपा आणि मान सरळ ठेवा. खांद्याजवळ हाताचे पंजे ठेवा आणि हातावर जोर टाकत संपूर्ण शरीर वर उचला. खाली जाताना जमिनीवर छाती लावा आणि पुन्हा वर न्या. पुश अप करताना कमीत कमी दहा सेंकद शरीराचा तोल हात आणि पायाच्या चवड्यांवर सांभाळा. नियमित तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार पुशअप करा.

सीट अप्स (Sit Ups)

पुश अप प्रमाणेच सीट अप्स अथवा दंड बैठकाही तु्म्ही घरच्या घरी घालू शकता. यासाठी तुम्हाला पायांवर उकिडवे बसायचे आहे. हात जमिनीवर न टेकवता आणि पायाचे तळवे न उचलता उभं राहायचे आहे. अशा दंड बैठका तुम्ही जितक्या घालाल तितका तुमचा पाठीचा कणा आणि पाय मजबूत होतील. सीट अप्स निरनिराळ्या प्रकारे करता येतात जमिनीवर बसूनही तुम्ही सीट अप्स करू शकता.

ADVERTISEMENT

प्लॅंक (Plank)

प्लॅंक करण्यासाठी तुम्हाला नियमित सराव करावा लागेल. सुरूवातीला तुम्हाला ते नीट जमणार नाही. मात्र सरावाने तुम्ही खूप वेळ प्लॅंक करू शकता. प्लॅंक करण्यासाठी तुम्हासा जीमला जाण्याची गरज नाही. घरीच तुम्ही याचा सराव करू शकता. यासाठी पोटावर झोपा. हात कोपऱ्यातून वळवत समोर ठेवा. हाताच्या मनकट, कोपरा आणि पाटाचे चवडे यावर स्वतःचा तोल सांभाळा. सुरुवातीला एक मिनीट तोल सांभाळा. पुढे पुढे तुम्ही पाच ते दहा मिनीटे स्वतःचा तोल अशा स्थितीत सांभाळू शकता.

स्ट्रेचिंग (Stretching Exercise)

घरी तुम्ही हात, पाय, मानेचे व्यायाम सहज करू शकता. नियमित स्ट्रेचिंग एक्सरसाइझ केल्यामुळे तुम्हाला कठीण व्यायाम, कठीण योगासने सहज करता येतील. यासाठी दिवसभरात सकाळी अथवा संध्याकाळी कमीत कमी दहा मिनीटे स्ट्रेचिंग व्यायामाचे प्रकार करा. ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक आणि निरोगी राहील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT