ADVERTISEMENT
home / नातीगोती
तुटलेलं नातं जोडताना

तुटलेले नाते पुन्हा जोडण्याचा विचार करत असाल तर

 कोणत्याही नात्यात अडचणी या असतात.नातं टिकवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पण काहीही केल्या काही नाते टिकत नाही. असे नाते तुटले की, त्याचे दु:ख असते. अशावेळी खूप जण तुटलेले नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी असे नाते पुन्हा जोडणे देखील त्रासदायक ठरु शकते. पण प्रत्येक नात्याच्या कंडिशन्स या वेगळ्या असतात. ते वेगवेगळ्या कारणामुळे तुटलेले असते किंवा मन दुखावलेली असतात. तुमचेही नाते तुटले आणि असे नाते तुम्ही जोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायल्या हव्यात

Love Msg And Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश

नात्यात मिळेल का मान?

एखादे नाते बिनसले की, त्या नात्यातील मान हा कमी होऊन जातो.एकमेकांबद्दलचा आदर कमी होऊन गेला असेल आणि पुन्हा हे नाते जोडताना तो मान-सन्मान परत मिळणार नसेल तर तुम्ही असे नाते न टिकवलेले बरे. बरेचदा जोडप्यांमध्ये अशी भांडणे होतात की, त्यातून मागे फिरणे आणि माफी मागणे देखील कठीण होऊन जाते. कोणी कितीही समजावले तरी मन ऐकायला तयार होत नाही. जर खूप भांडण करुन आणि प्रेमाचा लवलेशही राहिला नसेल असे वाटत असेल तर तुम्ही असे नाते जोडायचा प्रयत्न करु नका. 

तर नाते जोडण्याची गरज

नाते पुन्हा जोडणे गरजेचे असते का?

कधी कधी जबाबदाऱ्या असल्यानंतर नात्यामध्ये थोडी ॲडजस्टमेंट करणे गरजेचे असते. म्हणजे जर तुम्हाला मुलं असतील तर अशावेळी तुम्हाला थोडी माघार घ्यावी लागते. मुलं मोठी असतील तर ठीक पण कधी कधी मुलं अशा वयात असतात. त्यांना  विभक्त होण्याची संकल्पना कळत नाही. त्यांच्या मनात इतके प्रश्न असतात की, त्यांना पालकांनी वेगळे होणे म्हणजे काहीतरी विपरित घडत आहे असे वाटते. अशावेळी तुम्हाला केवळ मुलांसाठी शक्य असेल तर तुम्ही ते नाते टिकवायला काहीच हरकत नाही. पण अशा नात्यात तुम्हाला मारहाण होत असेल तर मात्र तुम्ही योग्य तोच निर्णय घ्यायला हवा.

ADVERTISEMENT

तरुणपणातील प्रेम

पौंगडावस्थेत असताना खूप वेळा प्रेम होतं आणि ते प्रेम तुटतं सुद्धा. काही जण आपलं ब्रेकअप झालं तर लोकं काय म्हणतील हा विचार करत बसतात आणि आपले आयुष्य चुकीच्या लोकांसोबत घालवतात. पण तुम्ही या वयात असाल तर तुम्हाला अयोग्य वाटलेल्या नात्यात वेळ घालवण्याची काहीही गरज नाही. हे वय प्रेम करण्याचे नाही असा दावा आम्ही करणार नाही. कारण खूप जणांना या वयात प्रेम होते आणि ते प्रेम टिकवण्याचा प्रयत्न करतात. ते नाते लग्नापर्यंत नेतात आणि आयुष्य सुखात देखील घालवतात. पण  अनेकदा असेही होते की, खूप जणांचा करियरचा निर्णय झालेला नसतो. आर्थिक बाबतीत एखादी व्यक्ती पुढे जाते  किंवा मागे राहते. एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवताना तुम्हाला या गोष्टींचे भान नक्कीच ठेवावे लागते. नाहीतर पुढे जाऊन हे नाते खराब होऊ शकते. त्यामुळे जर तुमचे नाते त्याच वेळात तुटत असेल तर ते तोडणेच चांगले. कारण या वयात सहन करण्याची शक्ती असते.ठराविक वयानंतर ही सहनशक्ती नसते. त्यामुळे अशावेळी काही झाले तर चालू शकते. 

नात्यात मुलींसाठी असतात या गोष्टी महत्त्वाच्या, या गोष्टी असतील तर टिकते नाते

20 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT