ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि ताऱ्यांचे महत्त्व अधिक आहे. ग्रह आपले स्थान बदलतात आणि वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतात. त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींच्या व्यक्तींवर घडून येत असतो. विशेषतः शनि ग्रहाचा राशींवर खूपच परिणाम दिसून येताना ऐकिवात येते. 27 जून, 2022 रोजी पहाटे मंगळाचा मेष राशीमध्ये प्रवेश झाला असून 10 ऑगस्ट, 2022 पर्यंत हा ग्रह या राशीत राहणार आहे. मंगळ ग्रह मेष राशीत असून राहुसह युती करणार असून अंगारक योग येणार आहे असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
ही मंगळ आणि राहू युती यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण कुंभ राशीमध्ये शनिने आपली वक्रदृष्टी ठेवली असून सध्या कुंभ राशीसाठी अत्यंत वाईट दिवस आहेत. हिंसक घटना, संपत्तीसाठी भांडणे अशा गोष्टी घडण्याची शक्यता अधिक आहे. तर 12 जुलै रोजी शनिदेव हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून ज्या राशींना याचा फायदा होणार आहे तर काही राशींना नुकसान होणार आहे, त्याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया. कोणत्या आहेत त्या राशी –
मीन रास
मीन राशीच्या व्यक्तींना शनिचा प्रवेश हा लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला धनप्राप्ती होण्याची आणि नोकरीमध्ये बढती मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या काळात जर तुम्हाला धनप्राप्ती झाली तर ती शनिदेवतेच्या मकर राशी प्रवेशामुळे झाली असल्याचे समजून जा. कित्येक वर्ष प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर आता ही संधी येण्याची शक्यता आहे.
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनि ग्रहाचा हा बदल आर्थिक संकटाचे कारण ठरू शकते. तर काही व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायातही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या कार्यालयात काही समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही जुलै महिन्यात सावध राहण्याची अत्यंत गरज आहे.
धनु रास
या राशीच्या व्यक्तींनाही शनिच्या दुष्प्रभावाचा सामना करावा लागू शकतो. तुमची काही कामं बिघडू शकतात. तर तुम्हाला काही ठिकाणी आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
मिथुन रास
मिथुन राशीच्या व्यक्तींनाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याचा प्रभाव तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जायला लाऊ शकतो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे.
धनलाभासाठी करा हे अचूक उपाय
- शनिचा प्रभाव टाळण्यासाठी आणि शुभ फळ मिळण्यासाठी रोज तुम्ही हनुमान चालिसा पठण करावे अथवा मारूती स्तोत्र म्हणावे. तसंच शनि मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा
- 30 जूनपासून गुप्त नवरात्रीचा आरंभ झाला आहे. त्यामुळे तुम्ही देवी दुर्गेची पूजा करावी आणि सप्तशतीचा पाठ करावा
- घरामध्ये कापूरचा धूप करावा. ज्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास मदत मिळते
- तुमच्या जन्मपत्रिकेत अंगारक योग अथवा मंगळ – राहू युती असेल तर तुम्ही विशेष सावधानता बाळगायला हवी
जुलैपासून साधारण 6 महिने शनिचा प्रभाव राहू शकतो. त्यामुळे सर्व राशींनी आणि विशेषतः ज्या राशी वर दिल्या आहेत, त्यांनी काळजी घ्यावी.
टीप – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि त्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक