आपण ज्यावर प्रेम करतो. त्या व्यक्तिवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी गिफ्टसमधून, कधी प्रेमाच्या मिठीतून तर कधी कधी शब्दांमधूनही प्रेम व्यक्त करणे हे फारच जास्त गरजेचे असते. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तिला तुमचे प्रेम कळावे यासाठी लव्ह शायरी मराठी Love Shayari Marathi पाठवायला अजिबात विसरु नका. कारण त्या Love Shayari In Marathi च्या माध्यमातून तुमचे तुमच्या जोडीदारावर किती प्रेमआहे ते कळायला मदत होईल. चला तर जाणून घेऊया Marathi Love Shayari. या शिवाय तुमच्या गर्लफ्रेंडसाठी खास बेस्ट गर्लफ्रेंड्स कोट्स देखील नक्की पाठवा.
Table of Contents
- लव्ह शायरी मराठी | Love Shayari Marathi
- मनाला भावणारी लव्ह शायरी | Heart Touching Love Shayri Marathi
- प्रियकरासाठी लव्ह शायरी मराठी | Shayari For Boyfriend In Marathi
- खरे प्रेम रोमँटिक प्रेम शायरी मराठी | True Love Romantic Love Shayari Marathi
- नवऱ्यासाठी लव्ह शायरी | Love Shayari For Husband In Marathi
- बायकोसाठी लव्ह शायरी | Love Shayari For Wife In Marathi
- आठवण लव्ह शायरी | Miss You Love Shayari In Marathi
- दुखी लव्ह शायरी | Sad Love Shayari Marathi
- सुप्रभात लव्ह शायरी | Good Morning Love Shayari Marathi
लव्ह शायरी मराठी | Love Shayari Marathi
आपल्या आवडीच्या व्यक्तिला लव्ह शायरी पाठवायची असेल तर तुम्ही यापैकी काही True Love Romantic Love Shayari Marathi पाठवू शकता. तुम्हाला आणि जोडीदाराला नक्की आवडतील.
- कितीही भांडण झाली तरी,
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही
ताणला तरी तुटत नाही. - तिने विचारले, मी तुझ्यासाठी काय आहे,
मी जवळ गेलो आणि तिला मिठीत घेतले,
आणि म्हणालो सर्वकाही - तुझ्यासाठी जीव देणारे खूप असतील,
पण तुझ्यावर जीव लावणारा फक्त मीच आहे - एक भाषा जी नजरेची नजरेलाच कळते,
शब्दाविना भावनांची मग,
नकळत देवा- घेवाण होते
- एकमेकांची चूक विसरुन
एकमेकांना समजून घेणे
हेच खरे प्रेम असते
मनाला भावणारी लव्ह शायरी | Heart Touching Love Shayri Marathi
नात्यातील काही गोष्टी मनाला भावणाऱ्या असतात. नात्यात अनेकदा अशी वेळ येते की, काही गोष्टी बोलून दाखवाव्या लागतात. त्यासाठीच शेअर करत आहोत मनाला भावणारी लव्ह शायरी Heart Touching Love Shayri
- आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला
तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना? - माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा,
त्यातील जीव आहेस तू - प्रेम म्हणजे कधी उन्हात
पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी
उगाचच भांडणं - मला ती पाहिजे
जिला मी पाहिजे - तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही
प्रियकरासाठी लव्ह शायरी मराठी | Shayari For Boyfriend In Marathi
प्रेम व्यक्त करताना प्रियकराला आपल्या भावना शब्दातून व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी खास लव्ह शायरी शेअर करत आहोत. Marathi Love Shayari शायरी तुम्हाला नक्की आवडतील.
- आठवणींच्या हिंदोळ्यात मला तुझ्या झुलायचे आहे,
तुझ्यासाठी मला शेवटपर्यंत सगळे काही करायचे आहे - तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी,
त्याला येते तुझ्या प्रेमाने लाली - गप्प राहावंस वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर - तुझं हसणं आणि माझं फसणं
दोन्ही एकाचवेळी घडतं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं - तुझ्या रुपाने सापडला मला उत्तम जोडीदार,
देवाकडे मानते मी आभार
खरे प्रेम रोमँटिक प्रेम शायरी मराठी | True Love Romantic Love Shayari Marathi
खरे प्रेम या काळात मिळणे हे खूपच दुर्मिळ आहे. पण असे प्रेम मिळाले की, आयुष्य अधिक चांगले होते. तुमच्या आयुष्यातील अशा खऱ्या प्रेमासाठी true love romantic love shayari marathi
- खरं प्रेम ते असतं
ज्याच्यामध्ये वयाचा आणि कास्टचा
विचार केला जात नाही - गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहे,
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस - जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंय
ह्रदयाच्या पंखावरती तुझे नाव कोरुन ठेवलंय - जसे फुलातून सुगंध,
आणि सूर्यातून प्रकाश,
येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासात
तुझाच ध्यास - पाणी फक्त सूर्यप्रकाशात चमकते,
आणि तूच माझा सूर्यप्रकाश आहे
नवऱ्यासाठी लव्ह शायरी | Love Shayari For Husband In Marathi
नवऱ्याची जागा ही आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही.अशा नवऱ्यावर प्रेम करायची एकही संधी सोडायला नको. तुमचे त्याच्यावर किती प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी love shayari marathi खास नवऱ्यासाठी. या शिवाय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही द्या.
- तुझ्या प्रेमाने आली माझ्या आयुष्याला लाली,
तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला आली झळाळी - लाडका, तू माझास
तुझ्यासाठी चंद्र काय सूर्यही घेईन
मी माझ्या हाता - तुझ्यावर असावी प्रेमाची सावली,
तुला मिळावी तू इच्छिलेले सर्व काही - आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला तुला पाहायचे आहे,
तुझ्या मिठीत मला कायम विसवायचे आहे - तुझा तो पहिला स्पर्श आजही मला आठवतो
ते रोमांचित क्षण मी आजही आठवतेय
बायकोसाठी लव्ह शायरी | Love Shayari For Wife In Marathi
बायकोवर तुमचे प्रेम आहे हे तुम्ही शायरीतून व्यक्त करायला अजिबात विसरु नका त्यासाठी खास Marathi Shayari Love. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका
- तू तशीच आहेस, जशी मला हवी होती,
आता मलाही संधी दे
तुझ्यासारखे होण्याची - तुझ्यासारखी जोडीदार मिळणे आहे माझे भाग्य
तुझ्यामुळे मिळाली आयुष्य जगण्याची नवी दिशा - आयुष्यात हवी होती एक आशा
तुझ्या रुपाने मला मिळाली एक नवी दिशा - बायको, तू आहेस माझ्या
प्रेमाचा आधार तुझ्याशिवाय नाही जीवनाला धार - तुझे सोबत असणे मला देते एक नवी उमेद
तुझ्यामुळे आयुष्य आहे प्रेमाने भरलेला लेक
आठवण लव्ह शायरी | Miss You Love Shayari In Marathi
एखाद्याला तुम्ही खूप मनापासून मिस करत असाल तर अशा व्यक्तिला Miss You Love Shayari In Marathi पाठवा
- पाऊस पडला की, दोन गोष्टी कराव्याशा वाटतात,
एक चहा पिण्याची आणि दुसरी तुला भेटून मिठीत घेण्याची - माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल,
जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील - मला फक्त तुला हसताना बघायचं आहे,
त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल - तुझी आठवण येणार नाही,
असे कधी होणार नाही,
काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही - आठवण येते तुझी रोज काय करु
पण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही
दुखी लव्ह शायरी | Sad Love Shayari Marathi
प्रेमात कधी कधी नको असलेल्या गोष्टीही होतात. अनेकदा नात्यात प्रेम पुरेसे होत नाही. असे नाते कधी तरी तुटते.अशावेळी होणारी मनाची अवस्था आणि घालमेल घालवण्यासाठी Sad Love Shayari Marathi तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करतील.
- एकदाच होतं नशीबववानांनाच मिळतं,
म्हणून जीवापाड जपावं… असं प्रेम करावं - प्रेम असो वा मैत्री
जर ती मनापासून केलेली असेल
तर त्या व्यक्तिपासून एक क्षणही दूर राहता येत नाही - आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी वाट पाहीन,
एक दिवस तुझ्या आठवणी मी घेऊन जाईन - एखाद्या व्यक्तिवर काही काळ प्रेम करणे
हे आकर्षण असतं,
एकाच व्यक्तिवर मरेपर्यंत ते प्रेम राहणं
हे खरं प्रेम असतं - तू कितीही नजरअंदाज केलास तरी मी
करणार नाही,
माझे प्रेम तुझ्यावरुन काही कमी होणार नाही.
सुप्रभात लव्ह शायरी | Good Morning Love Shayari Marathi
दिवसाची सुरुवात तुमच्या मस्त प्रेमाच्या शायरीने झाली तर तुमच्या जवळच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाईल. चला तुमच्या आवडीच्या व्यक्तीला पाठवा good morning love shayari marathi
- पहाटेचा वारा खूप काही सांगून गेला,
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला - प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो
फक्त आपल्याकडे माणूसकी असायला हवी - तुमची एक स्माईल पाहण्यासाठी मी उत्साहीत आहे,
उठा आता सकाळ झाली आहे - सकाळच्या गारव्यात मला तुम्ही आठवले,
प्रेमाचे एक पान मी मनामध्ये साठवले - कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे,
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आता तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला Love Shayari Marathi , Love Shayari In Marathi पाठवायला अजिबात विसरु नका.