ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Best Friend Quotes in Marathi for Girl

50+ बेस्ट गर्ल फ्रेंड कोट्स मराठी | Best Friend Quotes In Marathi For Girl 

मैत्री म्हणजे एक निखळ नातं. मैत्रीत वय, शिक्षण, जातपात, पैसाअडका येत नाही. मैत्री स्टेटस पाहून केली जात नाही. जन्माने मिळालेली नाती टिकवावी लागतात पण एकदा मैत्रीचे सूर जुळले की ते आपोआप टिकतात. मित्रमैत्रिणींमध्ये मुलगा मुलगी असा फरक नसतो. एखादा मित्र आणि मैत्रीणही बेस्ट फ्रेंड असू शकतात. पण मुलगा आणि मुलगी यांची मैत्री समाजाच्या दृष्टीने नेहमीच वेगळी असते. बऱ्याचजणांची मैत्री म्हणूनच एका चौकटीबाहेर जात नाही, आणि जर मैत्रीचं नातं पुढे गेलं तर त्याला लग्नबंधनाशिवाय पर्याय उरत नाही. असं असूनही अनेक मुलामुलींची मैत्री आयुष्यभर टिकते. कारण ती मैत्री निस्वार्थी असते. अशाच तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास गर्ल फ्रेंडसाठी शेअर करत आहोत हे काही स्पेशल मैत्री कोट्स तेव्हा वाचा आणि शेअर करा हे मैत्रिणीसाठी सुंदर कोट्स Best Friend quotes in marathi for girl यासोबतच वाचा 70+ भावनिक मैत्री कोटस (Emotional Friendship Quotes in Marathi), मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस, मित्रांसोबत शेअर करा मस्त मराठी जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends)

मैत्रिणीसाठी सुंदर कोट्स – Best Friend Quotes In Marathi For Girl

Best Friend Quotes In Marathi For Girl | मैत्रिणीसाठी सुंदर कोट्स
Best Friend Quotes In Marathi For Girl

मैत्रिणीचे स्थान आयुष्यात नेहमीच खास असते, ती जवळ नसली तरी तिच्या मैत्रीमुळे तुम्हाला तिची नेहमीच साथ असते. अशा खास मैत्रिणीसाठी सुंदर कोट्स Best Friend quotes in marathi for girl 

1. तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नं सुद्धा पाहू शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एक क्षणही जगणं शक्य नाही.

2. तिने विचारलं मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, अलिंगन दिलं आणि म्हणालो, “सर्वकाही”

ADVERTISEMENT

3. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्की आहेस, पण त्याहून सुंदर तुझं असणं आहे 

4. तुझं हसणं इतकं सुंदर की, गुलाबही पहात बसतो. तू समोर आलीस की हे सांगायचं मात्र मी विसरून जातो. 

5. नदीला काठ दे, वाटेला माझ्या वाट दे, अडकलाय जीव तुझ्यात, आता आयुष्यभराची साथ दे

6. रोज स्वप्नात जे जीवन जगतो ते आयुष्यात खरं खुरं तुझ्यासोबत जगायचं आहे.

ADVERTISEMENT

7. प्रेम एवढं आहे की सांगू शकत नाही, आयुष्य भले माझं आहे पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

8. आयुष्यात काही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस, कारण श्वासास श्वास असेपर्यंत मी तुझ्यासोबत असेन.

9. कसं सांगू तुला तूच समजून घे, तुझी आठवण येते खूप जवळ येऊन मिठीत घे.

10. जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते, तिच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. 

ADVERTISEMENT

मैत्रिणीसाठी कोट्सSweet Quotes For Your Friend

Sweet Quotes for Your friend | मैत्रिणीसाठी कोट्स
Sweet Quotes For Your Friend

मैत्रिणीला तुमच्या मनातील सर्व काही न सांगता समजत असतं. कारण निस्वार्थ मैत्रीमुळे तुमची मनं एकरूप झालेली असतात. अशा तुमच्या गोड मैत्रिणीसाठी कोट्स Sweet Quotes for Your friend

1.तू छान दिसतेस साडी नेसल्यावर, पण अजून छान दिसशील माझ्यासोबत डबलसीट बसल्यावर

2.मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तू जवळ नसतानाही, मला तुझं असणं हवं आहे.

3.मला फक्त तुला हसताना पाहायचं आहे, त्यामागचं कारण मग मी नसलो तरी चालेल.

ADVERTISEMENT

4. तेज असावं सूर्यासारखं, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्रीण असावी तुझ्यासारखी

5. तुझ्यासाठी जीव देणारे भरपूर असतील, पण माझ्यासारखा जीव लावणारा एक पण मिळणार नाही

6. अशी मैत्रीण जिच्यावर प्रेम करण्यापेक्षा जास्त गंमत तिच्यासोबत भांडण्यात येते

7. सर्व म्हणतात आयुष्य सुंदर आहे, पण माझा यावर विश्वास तेव्हा बसला जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस

ADVERTISEMENT

8. काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणाऱ्या ताऱ्यांकडे तुझ्यासाठीच मागत होतो.

9. तू साधी आहेस पण माझी आहेस

10. तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.

खऱ्या मैत्रीवरील बेस्ट फ्रेंड कोट्स – True Friendship Best Friend Quotes in Marathi for Girl

True Friendship Best Friend Quotes in Marathi for Girl | मैत्रीसाठी कोट्स
True Friendship Best Friend Quotes in Marathi For Girl

मैत्री आणि प्रेम यांच्यात एक दृढ बंध असतो. बेस्ट फ्रेंड जेव्हा तुमची जोडीदार होते तेव्हा तुमच्या आयुष्याला खास अर्थ येतो. म्हणूनच अशाच तुमच्या खऱ्या मैत्रिणीसोबत शेअर करा हे मैत्री कोट्सTrue Friendship Best Friend Quotes in Marathi for Girl

ADVERTISEMENT

1. हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस…तू न सांगता कळत होतं की, प्रेम किती करत होतीस.

2. कधी कधी माणसाला औषधाची नाही, फक्त जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची गरज असते. 

3. प्रेम तात्पुरतं असतं मैत्री मात्र कायम टिकते

4. माहीत नाही तुझ्यात असं काय वेगळं आहे,तू जवळ असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे.

ADVERTISEMENT

5. खूप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलतं माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी काळजी घे.

6.मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात

7. तुझ्याशिवाय मी काही नाही पण जेव्हा आपण दोघं एक असतो तेव्हा आपण सर्वकाही असतो.

8. मैत्रीण सुंदर नसली तरी चालेल पण प्रेमाची कदर करणारी हवी

ADVERTISEMENT

9.रोज तुला शब्दात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण शब्द लिहिताना मिच शब्दात हारवतो.

10. प्रत्येकवेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

मैत्रिणीसाठी भावनिक कोट्स – Emotional Quotes for Friend In Marathi

Emotional Quotes for Friend | मैत्रिणीसाठी भावनिक कोट्स
Emotional Quotes for Friend In Marathi

मैत्रीत मनाचे बंध कधी जुळतात हे आपल्यालाच कळत नाही. म्हणूनच मैत्रीसारखी बेस्ट गोष्ट जगात शोधूनही सापडणार नाही. अशात तुमच्या एखाद्या खास मैत्रिणीसाठी भावनिक कोट्स Emotional Quotes for Friend

1. आठवण करून देतो पाऊस, तुझ्या त्या गोड स्पर्शाची, ओलीचिंब भिजलेली तू मिठीत माझ्या असल्याची

ADVERTISEMENT

2. नाही आजवर बोलता आले ते सारं काही तुझ्यापुढे मांडणार आहे, नाही जगू शकत तुझ्याशिवाय हे आज तुला सांगणार आहे.

3. मला एक कळत नाही की तू मला इग्नोर केलंस तरी मी तुझ्याच मेसेजची वाट का पाहत असतो.

4. तूझं हे एक बरं आहे थोडंसं रडतेस आणि बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.

5.प्रेमात शंका आणि राग तेच लोक धरतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती मनात असते.

ADVERTISEMENT

6. मला आवडेल तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला, हातात तुझा हात घेत फक्त डोळ्यात पाहात राहायला.

7. कळलं नाही हा श्वासही कधी झाला तुझा, इतकं वेड्यासारखं प्रेम मी तुझ्यावर कधी करू लागलो.

8. माझ्या ह्रदयाला कान लाव तिथे फक्त तुझीच साद ऐकू येईल

9. ओए पागल, रागव पण दूर जाऊ नकोस, नाहीतर मला पण येतं कान पकडून जवळ आणायला.

ADVERTISEMENT

10. मी तुझ्यावर मरतो आणि तुझ्या प्रेमाचा स्वीकार करतो.

मैत्रिणीसाठी मजेशीर कोट्स – Funny Best Friend Quotes in Marathi For Girl  

Best Friend Quotes in Marathi for Girl Funny | मैत्रिणीसाठी मजेशीर कोट्स
Funny Best Friend Quotes in Marathi For Girl  

मैत्री म्हणजे मौजमजा… कारण मजा मस्करी करण्याचा पूर्ण हक्क मैत्रीत असतो. मैत्रीत केलेल्या मस्करीचा राग धरला जात नाही. यासाठीच अशाच तुमच्या एखाद्या जीवलग मैत्रिणीसाठी मजेशीर कोट्स Best Friend Quotes in Marathi for Girl Funny

1.काही म्हणा आपल्या ब्रेस्ट फ्रेंडला त्रास देत डोकं फिरवण्यात जास्त मजा येते. 

2. मुर्ख असल्याचं सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते तुझ्यासारखे लोक तिथेपण घाई करतात.

ADVERTISEMENT

3. बेस्ट फ्रेंड म्हणजे अशी व्यक्ती जी तुमचा मूड खराब असतानाही तुम्हाला हसायला मजबूर करतो.

4. जिला पागल नाही अति पागल शब्द सूट करतो त्या माझ्या बेस्ट फ्रेंडला खूप खूप प्रेम…

5. अनोळखी अनोळखी असं म्हणत जे एकमेकांच्या जास्त जवळ येतात तेच खरे बेस्ट फ्रेंड

6. एकच पाहिजे पण बेस्ट फ्रेंड पाहिजे

ADVERTISEMENT

7. आयुष्य लहान आहे गर्ल फ्रेंड शोधण्यात ते वाया घालवू नका

8. गुण जुळले की लग्न होतं आणि दुर्गुण जुळले की मैत्री

9. तुझी माझी मैत्री इतकी घट्ट हवी की तू नोकरी करायची आणि मी पगार घ्यायचा

10. जिचा स्क्रू थोडा ढिला असतो तीच नेमकी माझी बेस्ट फ्रेंड असते.

ADVERTISEMENT

Conclusion – आम्ही शेअर केलेले हे Best Friend quotes in marathi for girl, true friendship best friend quotes in marathi for girl,best friend quotes in marathi for girl funny तुम्हाला कसे वाटले हे कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

22 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT