ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
mistakes-that-can-cause-dark-lips-in-marathi

तुमच्या या सवयींमुळे ओठ होतात काळे

बरेचदा ओठ काळे पडण्यामागे नैसर्गिक कारणे असतात. पण याशिवाय आपल्या काही चुका आणि आपल्याला असणाऱ्या चुकीच्या सवयींमुळेही ओठ काळे पडतात. बरेचदा आपण ज्या चुका करतो त्याकडे आपले लक्ष जात नाही. त्या चुका अनाहुतपणे घडत असतात पण त्याचा परिणाम ओठ काळे पडण्यावर नक्कीच होत असतो. अशा या कोणत्या चुका आहेत, ज्या आपल्या ओठांना काळे पाडतात, त्याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊ आणि तुम्हीही या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या ओठांची काळजी घेण्याची सुरूवात करा. काळे ओठ गुलाबी करण्यासाठी अनेक घरगुती उपायदेखील आहेत. 

लोकल लिपस्टिकचा वापर 

ओठांचे सौंदर्य वाढविण्यासाठी लिपस्टिक (Lipstick) एक अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत असते. पण अनेकदा असे दिसून आले आहे की, काही पैसे वाचविण्याच्या नादामध्ये अनेक महिला या अगदी ट्रेनमध्ये अथवा फुटपाथवर असणाऱ्या लोकल लिपस्टिक विकत घेतात आणि ओठांवर त्याचा उपयोग करतात. या लिपस्टिकमुळे ओठ अधिक काळे पडतात कारण या लिपस्टिकमध्ये वापर करण्यात आलेल्या घटकांचा दर्जा तितका चांगला नसतो. त्यामुळे नेहमी ब्रँडेड लिपस्टिकचा वापर करावा. उदाहरणार्थ myglamm.com वरून तुम्ही तुम्हाला हवी ती लिपस्टिक शेड्स (Lipstick Shades) मिळवू शकता आणि या लिपस्टिक विगन असून सर्व लिपस्टिक क्रुएल्टी फ्री आहेत, ज्यामुळे तुमच्या ओठांना काळे पडण्यापासून या लिपस्टिक दूर ठेवतात. तुम्हाला अधिक पैसे खर्च नसतील करायचे तर तुम्ही घरातील नैसर्गिक गोष्टींचा वापर करून लिप टिंट (Lip Tint) तयार करा आणि ते तुमच्या ओठांवर लावा. 

तारीख संपलेल्या लिपस्टिकचा वापर

काही महिला जेव्हा लिपस्टिक खरेदी करतात तेव्हा वर्षानुवर्षे त्याच एका लिपस्टिकचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? अशा लिपस्टिक वापरून तुमचे ओठ पटकन काळे पडू शकतात. तुम्हाला तुमच्या ओठांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की, एक्सपायर्ड (Expired Lipstick) अर्थात तारीख संपलेली लिपस्टिक कधीही ओठांवर लावणे चुकीचे ठरते. यामुळे ओठांना अधिक त्रास होतो. तसंच कधीही ओठांवर अथवा लिपस्टिकवर घाणेरड्या ब्रशचा वापरही करू नका. 

उन्हात लिपस्टिक लाऊन निघणे 

काही महिला मेकअप करतात आणि लगेच उन्हात घराबाहेर जातात. पण उन्हात कधीही लिपस्टिक लाऊन फिरणं योग्य नाही. सूर्यकिरणांमुळे ओठ अधिक काळे होण्याची शक्यता असते. तुम्ही तुमच्या ओठांना कव्हर करूनच उन्हातून बाहेर पडा. यासाठी तुम्ही मास्कचा वापर करू शकता अथवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांवर सन प्रोटेक्शन नक्की लावा. 

ADVERTISEMENT

लिपस्टिक न काढता वावरणे 

तुम्ही दिवसभर लिपस्टिक लावली असून रात्रीही ती काढली नाही तर तुमचे ओठ अधिकाधिक लवकर काळे पडणं सुरु होते. त्यामुळे तुम्ही दिवसभर चेहऱ्यावर कितीही मेकअप केला असेल अथवा ओठांना कितीहीवेळा लिपस्टिक लावली असेल तरीही ती योग्य पद्धतीने काढून टाकायला हवी. लिपस्टिक काढल्यावर त्यावर कच्चे दूध वा दुधाची साय आणि गुलाबपाणी मिक्स करून आपल्या ओठांवर लावा. यामुळे तुमच्या ओठांचा गुलाबीपणा टिकून राहण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आठवड्यातून एक वेळा तुम्ही लिप स्क्रब करणेही गरजेचे आहे. 

या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचे नैसर्गिक गुलाबी ओठ टिकविण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या सवयींपासून दूर राहण्याचा नक्की प्रयत्न करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT