ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
monsoon flower plants in marathi

पावसाळ्यात बाल्कनीत लावा ही फुलझाडे, जास्त देखरेखीची गरज नाही

पावसाळा झाडांच्या वाढ आणि विकासासाठी उत्तम ऋतू असतो. या सीझनमध्ये झाडांची फार निगा न राखताही झाडं उत्तम वाढतात. फुलझाडांसाठी तर पावसाळा अधिकच पोषक असतो. ज्यामुळे या सीझनमध्ये अनेक फुलझाडं जोमाने वाढतात. प्रत्येकाला घराची बाग फुलझाडांनी सुशोभित असावी असं वाटत असतं. मात्र यासाठी बागेत अथवा बाल्कनीत कोणती फुलझाडं लावावी असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच जाणून घ्या पावसाळ्यात कोणती फुलझाडे लावावी. तसंच वाचा या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi) आणि झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

झेंडू

झेंडूचं रोप पावसाळ्यात लावलं जातं कारण पावसाळा संपण्याच्या काळात झेंडूला बहर येतो. पिवळ्या आणि लाल रंगाची झेंडूची फुलं दसरा, दिवाळी अथवा अनेक धार्मिक विधींमध्ये सजावटीसाठी वापरली जातात. घराच्या कुंडीतही झेडूंचे रोप छान वाढते. शिवाय या झाडाला विशेष निगा राखण्याची गरज नसते. तुमच्या घरात वापरलेल्या जुन्या फुलांमधील बिया तुम्ही कुंडीत पेरल्या तरी त्यातून झेडूंचे रोप उगवते. 

जास्वंद

जास्वंद गणपती बाप्पाला प्रिय खूप आहे. गणेशोत्सवा आधी घरातील रोपाला फुलं यावी असं वाटत असेल तर आताच हे झाड लावा. विविध रंगाच्या जास्वंदीची रोपं बाजारात मिळतात. घराच्या बाल्कनीत अथवा कुंडीत तुम्ही जास्वंदीचे रोप लावू शकता. जास्वंदीला बाराही महिने फुलं येत असल्यामुळे पावसाळ्यात तुमची बाग कायम सुशोभित राहू शकते. 

गुलाब

गुलाबाचे फुल प्रत्येकाला आवडते. त्यामुळे घरात छान गुलाबाचे रोप असावे असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. गुलाबाच्या फुलांचेही विविध रंग आणि प्रकार बाजारात मिळतात. गुलाबाला हिवाळ्यात चांगला बहर येतो मात्र पावसाळ्यात तुम्ही नक्कीच गुलाब घरात लावू शकता. विशेष म्हणजे छोट्या कुंडीतही गुलाबाची वाढ चांगली होते. मात्र झाडाला कीड लागू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. 

ADVERTISEMENT

सदाफुली

सदाफुलीच्या नावातच या झाडाचं सौंदर्य लपलेलं आहे. सदाफुली कायम फुललेली असते म्हणून तिला सदाफुली असं म्हणतात. या रोपाला बारा महिने बहर असतो. आजकाल विविध रंगाच सदाफुली बाजारात मिळतात. जर पावसाळ्यात तुम्हाला तुमची बाग सहाबहीत राहावी असं वाटत असेल तर घरात सदाफुलीचं झाड लावा. या झाडाला खूप कमी निगा राखण्याची गरज असते. कमी सूर्यप्रकाशातही याची वाढ जोमाने होते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT