Advertisement

घर आणि बगीचा

झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 13, 2020
झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

Advertisement

घर सजवण्यासाठी आजकाल घरातच अनेक झाडे अथवा रोपांची वाढ केली जाते.इनडोअर गार्डनमधील ही वृक्षवल्ली तुमच्या घराची शोभा तर वाढवतात शिवाय तुमच्या घरात आनंदी आणि प्रफुल्लित वातावरणही निर्माण करतात. झाडांची वाढ आणि निगा राखणं हे काम सोपं नसलं तरी कठीण नक्कीच नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला घरात सहज वाढवता येतील अशा काही झाडांच्या प्रजाती आणि झाडांच्या योग्य वाढीसाठी सोप्या टिप्स शेअर करत आहोत. घरात कोणती झाडे लावावी आणि त्यांची लागवड कशी करावी. 

सक्युलंट प्लांट (Succulent Plant)

या प्रकारच्या वनस्पतींची पाने आणि खोडाचा भाग जाडसर आणि मांसल असतो. या वनस्पतीचे अनेक प्रकार आहेत. बऱ्याचदा अशा प्रकारच्या वनस्पती वाळंवटी प्रदेशात आढळतात. या वनस्पतींमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अधिक प्रमाणात असते. या वनस्पतींना अधिक पाण्याची  गरज नसल्यामुळे घरातच छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तुम्ही त्यांची वाढ नक्कीच करू शकता. या वनस्पतींची वाढ घरातच करणं खूप सोपं असतं. कारण यासाठी तुम्हाला फक्त त्यांची जुनी पाने काढून टाकावी लागतात. असं केल्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. पाने काढून टाकल्यावर चार ते पाच दिवस त्यांना सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. ज्यामुळे त्यांची वाढ जोमाने होऊ शकते. त्याचप्रमाणे या झाडांना पाण्याची गरज कमी प्रमाणात असल्यामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी भरलेल्या स्प्रे बॉटलने त्यांना पाणी स्प्रे करून द्यावे लागते. कुंडीतील माती भिजेल इतकंच पाणी त्यांना द्यायचे असते. ज्यामुळे ही रोपं सुकत नाहीत आणि टवटवीत दिसतात. 

How To Care For Indoor Plants In Marathi

सक्युलंट प्लांट - Succulent Plant Image

Instagram

मॉन्स्टेरा प्लांट (Monstera Plant)

मॉन्स्टेरा या वनस्पतीची वाढ पाण्यामध्ये सहज होते. मॉन्टेरा वाढत असताना तिची वाढ पारदर्शक काचेच्या कुंडीतून पाण्यात होताना पाहणं नक्कीच मजेशीर आणि उत्सुकता वाढवणारं असू शकतं. यासाठी पाण्यात बुडेल इतपत उंचीचे या वनस्पतीचे खोड तुम्हाला एखाद्या धारदार कात्री अथवा चाकूने कापून लावावे लागते. पाण्यामुळे या वनस्पतीच्या खोडाला मुळं येतात आणि त्याची वाढ सुरू होते. पण जर तुम्हाला इनडोअर गार्डनसाठी या झाडाचा वापर करायचा असेल तर तिला सुर्यप्रकाशापासून शक्य तितकं दूर ठेवा. नाहीतर तिची वाढ झपाट्याने होऊ शकते. कुंडीतील पाणी दर आठवड्याला बदला. शिवाय खोड पाण्यात व्यवस्थित बुडेल याची काळजी घ्या. या खोडाला चार इंचाची मुळं उगवली की तुम्ही हे रोप मातीच्या कुंडीत लावू शकता. पाण्यामध्ये साधारणपणे सहा आठवड्यांमध्ये ही वाढ नक्कीच होऊ शकते. 

मॉन्स्टेरा प्लांट-Monstera Plant Image

Instagram

स्नेक प्लांट (Snake Plant) –

स्नेक वनस्पतींमध्ये निरनिराळे प्रकार आढळून येतात. मात्र हे सर्व प्रकार तुम्ही घरातील बागेत वाढवू शकता. यासाठी यातील कोणत्याही प्रकारच्या झाडाचे छोटेसे रोप घरातील कुंडीत लावा. मोठ्या झाडाखाली छोटी छोटी रोपं वाढतात. ती त्या कुंडीतून काढून दुसऱ्या कुंडीत लावावी लागतात. रोप मोठं होऊन वाढून लागली की तुम्ही ती एखाद्या मोठ्या कुंडीत लावू शकता. कुंडीत याची वाढ साधारणपणे पाच ते सहा इंच होऊ शकते. 

पोथोस अथवा मनी प्लांट (Pothos)

पोथोस अथवा मनी प्लांट वाढवण्यासाठी तुम्हाला ते वेळोवेळी योग्य पद्धतीने कट करणं खूप गरजेचं आहे. या वनस्पतीची पानं सात ते आठ सेंटिमीटर लांब असतात. अनेक भारतीय घरात या झाडाची वाढ केली जाते. विशेष म्हणजे अगदी कमी प्रकाशातदेखील हे झाड उत्तम रितीने वाढू शकते. मातीत आणि पाण्यात या झाडाची वाढ झपाट्याने होते. सजावटीसाठी निरनिराळ्या आकाराच्या आकर्षक काचेच्या बाटल्यांमध्ये पाण्यात हे झाड लावले जाते. 

पोथोस अथवा मनी प्लांट-Pothos or Money Plant Image

Instagram

स्पायडर प्लांट (Spider Plant)

स्पायडर प्लांट अथवा वनस्पतीच्या पानांची वाढ अशा प्रकारे होत असते की त्यामध्ये कोळ्यांच्या आकार निर्माण होतो म्हणून या वनस्पतीला स्पायडर प्लांट  असं म्हटलं जातं. या झाडांच्या टेठावरच नवी पालवी फुटून नवी पाने उगवतात. म्हणूनच त्यांची वेळच्या वेळी छाटणी करणं गरजेचं असतं. ज्यामुळे या झाडाला योग्य आकार मिळू शकतो. माती आणि पाणी या दोन्ही ठिकाणी हे झाड उत्तम रित्या वाढते. मात्र पाण्यात वाढवताना आठवड्यातून एकदा ते पाणी बदलण्याची गरज  असते. 

स्पायडर प्लांट-Spider Plant Image

Instagram

रोजमेरी प्लांट (Rosemary Plant)

रोजमेरी हे निळ्या रंगाची फुलं येणारं एक फुलझाड आहे. या झाडाच्या फुलांच्या सुंगधामुळे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. उबदार वातावरणात या झाडाची वाढ चांगली होते. या झाडाची वाढ इनडोअर आणि आऊटडोअर गार्डन अशा दोन्ही ठिकाणी करता येऊ शकते. झाडाची वाढ चांगली होण्यासाठी वेळच्या वेळी त्याची छाटणी करावी. घराबाहेर लावण्यापूर्वी कमीतकमी आठ ते दहा आठवडे तुम्ही ते घराच्या सावलीतदेखील वाढवू शकता. झाडाला पुरेसा सुर्यप्रकाश आणि पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. कारण अतती सुर्यप्रकाश आणि पाणी या झाडाला सहन होत नाही. 

रोजमेरी प्लांट-Rosemary Plant Imag

Instagram

ट्रेडस्कॅन्टिया प्लांट (Tradescantia Plant)

ट्रेडस्कॅन्टिया हे एक झपाट्याने वाढणारे रोप असून दक्षिण मॅक्सिकोमध्ये या वनस्पतीला प्रेमाने वाढवले जाते. या वनस्पतीच्या वाढीसाठी प्रकाश, तापमान, आर्द्रता, वातावरणातील बदल या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे रोप सुकू नये म्हणून कुंडीतील माती सतत ओलसर राहील याची काळजी घ्यावी. यासाठी कुंडीतील मातीचा वरचा थर सुकू लागला की पाणी स्प्रे करावे. चांगल्या वातावरणासाठी थंडीत या रोपाची वाढ तुमच्या किचनमध्ये करावी ज्यामुळे त्याला पुरेसा उबदारपणा मिळेल. 

ट्रेडस्कॅन्टिया प्लांट-Tradescantia Plant Image

Instagram

अम्ब्रेला प्लांट (Umbrella Plant)

घराच्या सजावटीसाठी अम्ब्रेला प्लांटचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. कारण हे झाड वाढवणं आणि त्याची निगा राखणं सोपं आहे. परदेशात या वनस्पतीचा वापर घर सजावटीसाठी केला जातो. हे झाड सुर्यप्रकाशात, कमी सुर्यप्रकाशात दोन्ही परिस्थितीत वाढू शकते. ज्यामुळे ते इनडोअर गार्डनसाठी नक्कीच वापरले जाते. या झाडाला उबदार वातावरणाची आवश्यक्ता नसली तरी  कोरड्या वातावरणात त्याला कीटकांचा प्रादूर्भाव लगेच होऊ शकतो. त्यामुळे वेळच्यावेळी काळजी घेणं गरजेचं असू शकतं. 

अम्ब्रेला प्लांट-Umbrella Plant-

Instagram

अफ्रिकन व्हॉयलेट्स (African Violets)

आफ्रिकन व्हॉयलेट्स हे घरात वाढवलं जाणारं छोटसं फुलझाड आहे. ज्यावर पांढऱ्या, निळ्या आणि जांभळ्या रंगाची फुलं येतात. या रोपाला मध्यम सुर्यप्रकाशाची गरज असते. ज्यामुळे ते तुमच्या घरातही मस्त फुलतं. तुम्ही ते मातीच्या कुंडीत वाढवू शकता. छोट्या छोट्या कुंड्यामध्ये ते सुशोभित करता येतं. दर वर्षी या कुंड्यांमधील माती बदलणं मात्र फार गरजेचं आहे. याच्या वाढीसाठी घरातील सामान्य तापमान आणि ओलसर माती पोषक ठरते. धुळ,प्रदूषणापासून मात्र या रोपाला जपावं ज्यामुळे ते चांगलं वाढू शकतं.  

अफ्रिकन व्हॉयलेट्स-African Violets Image

Instagram

प्रेअर प्लांट (Prayer Plant)

बऱ्याचदा जास्त काळजी आणि निगा न राखावी लागल्यामुळे अनेकांना घरात या झाडाची वाढ करणं सोयीचं वाटतं. मात्र कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की या  झाडाची वाढ चांगल्या प्रकाशात अधिक जोमाने होऊ शकते. फक्त यासाठी रोपावर थेट सुर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी. या झाडाला ओलसर मातीची आवश्यक्ता असते. मात्र मातीत पाण्याचे प्रमाण जास्त झालेले त्याला सहन होत नाही. यासाठी दर दोन आठवड्यातून त्याला पाणी द्यावे. 

प्रेअर प्लांट-Prayer Plant Image

Instagram

मिंट अथवा पुदिना (Mint Plant)

मिंट अथवा पुदिन्याचा वापर स्वयंपाकात केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा घरातील गार्डनमध्ये अनेकजण पुदिना लावतात. पुदिन्याचे निरनिराळे प्रकार आहेत. पुदिना ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे तिचा घरगुती औषधासाठीदेखील वापर केला जातो. मात्र तिच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारच्या मातीची आणि पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या  कुंडीची गरज असते. पुदिन्याचे काही प्रकार घरातील सावलीतदेखील जोमाने वाढतात मात्र काही प्रकारांना सुर्यप्रकाशाची गरज असते. जर तुम्हाला घराच्या बाल्कनीत भाज्या आणि आयुर्वेदिक वनस्पतींची वाढ करण्याची आवड असेल तर तुमच्या बागेत पुदिन्याचे रोपदेखील असायलाच हवे. 

मिंट अथवा पुदिना-Mint Plant Image

Instagram

बेसिल प्लांट अथवा तुळस (Basil Plant)

बेसिल प्लांट अथवा तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुळशीला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या घरी कुंडीत तुळशीचे रोप असते. या वनस्पतीचा घरगुती औषधांसाठीदेखील चांगला वापर केला जातो. तुळशीचे विविध प्रकार आहेत. यातील कोणताही प्रकार तुम्ही घरातील कुंडीत लावू शकता. तुळशीच्या रोपाला दररोज थोडं पाणी देण्याची गरज असते. तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होते.  

बेसिल प्लांट अथवा तुळस-Basil Plant

Instagram

घरात झाडे वाढवण्यासाठी सोप्या टिप्स (Easy Plant Care Tips In Marathi)

घरात एखादं रोप लावणं हे नक्कीच एक सोपं काम वाटू शकतं. मात्र या रोपाची योग्य वाढ होण्यासाठी त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. यासाठी या  काही टिप्स जरूर फॉलो करा. 

झाडाला पाण्याची किती गरज आहे हे ओळखा

जेव्हा तुम्ही घरात बाग फुलवता तेव्हा तुम्हाला घरातील कुंडीत रोपांची वाढ करावी लागते. प्रत्येक इनडोअर गार्डनमधील रोपाची पाण्याची गरज निरनिराळी असते. म्हणूनच तुम्हाला तुम्ही वाढवत असलेल्या रोपांना किती पाण्याची गरज आहे हे माहीत असायला हवं. यासाठी एक महत्वाचा नियम सर्व झाडांसाठी लक्षात ठेवा कुंडीतील मातीचा पृष्ठभाग एक इंच ओला राहील इतकं पाणी रोपांवर शिंपडा. जर हा पृष्ठभाग लवकर कोरडा होत असेल अथवा पानं सुकत असतील तर तुमच्या झाडाला पाण्याची अधि गरज आहे हे समजा. 

Watering Can And Indoor Plants

Instagram

पाणी कमी झालं तरी चालेल पण अती प्रमाणात झाडांना पाणी घालू नका

झाडांना पाणी घालताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर झाडांना पाणी कमी मिळालं तर ती काही काळ जगू शकतात. मात्र अती पाण्यामुळे त्याचे जास्त नुकसान होते. म्हणूनच झाडांना अती पाणी दिलं जाणार नाही याची काळजी घ्या. अती पाण्यामुळे झाडांचं नुकसान टाळण्यासाठी अशा रोपाला दुसऱ्या सुरक्षित कुंडीत आणि कोरड्या मातीत लावा. ज्यामुळे ते पुन्हा जगू शकेल.

योग्य माहिती नसेल तर उगाचच झाडांना खत घालू नका

घरात लावलेल्या इनडोअर प्लांट्सनां खतांची गरज बऱ्याचदा नसते. जर त्यांची वाढ खुंटली असेल तरच त्यांना खत लागू शकते. म्हणूनच जर तुम्हाला खात्रीपूर्वक माहिती नसेल तर झाडांवर खतांचा वापर करणे टाळा. कारण गरज नसताना दिलेल्या खतांमुळे रोप मरण्याची शक्यता अधिक असते. 

रोपांना नेहमी स्थिर आणि पोषक वातावरणाची गरज असते

एकदा तुम्ही एखादे रोप कुंडीत लावले की त्या रोपाला त्या कुंडीत स्थिर जागेची आणि घरातील वातावरणाची सवय होते. म्हणूनच ते जगवण्यासाठी त्याची योग्य निगा राखावी लागते. जेव्हा तुम्ही ते रोप दुसऱ्या जागेत लावण्याचा प्रयत्न करता तेव्हा रोपाला नव्या जागेत रुजण्यासाठी वेळ द्यावा लागतो. योग्य आणि पोषक वातावरणाच्या अभावी ते झाड उन्मळून जाण्याची शक्यता जास्त असते. 

Plant Re-potting Method

Instagram

छोटी रोपं जास्त वेगाने वाढतात

जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी रोप खरेदी कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. लहान रोप मोठ्या रोपांपेक्षा अधिक वेगाने वाढते म्हणून नेहमी लहान रोपेच खरेदी करा. शिवाय मोठ्या रोपांना घरात अॅडजस्ट करणं कठीण जाऊ शकतं. 

कमी प्रकाशाची गरज असलेली रोपं बाथरूममध्ये ठेवा

काही प्रकारच्या रोपांना कमी सुर्यप्रकाशाची गरज असते. अशा वातावरणात त्यांची वाढ चांगली होते. घरापेक्षा घराच्या बाथरूममध्ये सुर्यप्रकाश नक्कीच कमी असतो. म्हणूनच अशा रोपांना घरातील रूमध्ये ठेवण्यापेक्षा बाथरूमध्ये ठेवा. 

रोपावरची सुकलेली आणि पिकलेली पाने काढून वेळीच काढून टाका

रोपांची वाढ सतत होत असल्यामुळे निसर्गनियमानुसार जुनी पानं सुकतात आणि पिवळ्या रंगाची होतात. अशी पाने वेळीच काढून टाकणं गरजेचं असतं कारण त्यामुळे त्याजागी नवीन पालवी फुटते. म्हणूनच रोपाच्या योग्य वाढीसाठी या गोष्टींकडे नीट लक्ष ठेवा. 

घरातील रोपं वेळच्या वेळी स्वच्छ करा

घरात रोपांवर सतत बाहेरून येणारी धुळ आणि माती बसू शकते. यासाठीच नियमित रोप स्वच्छ करणं गरजेचं आहे. पाण्याच्या स्प्रेने ही पाणी शिंपडून तुम्ही तुमची रोपं स्वच्छ करू शकता. ज्यामुळे घरातील रोपं स्वच्छ आणि टवटवीत दिसतील. 

Spider and Monstera Plant Image

Instagram

रोपांसाठी घरीच DIY सेल्फ वॉटरींग प्लांट तयार करा

घरातील बागेसाठी एखादा प्लांट सिटर बसवणे खर्चिक आणि वेळकाढू काम असू शकते. यासाठी घरच्या घरीच काही DIY टिप्स वापरून तुम्ही तुमच्या झाडांना योग्य पद्धतीने आपोआप पाणी मिळेल अशा युक्त्या वापरू शकता. 

कुंड्यांना ड्रेनेज होल असतील याची काळजी घ्या

कुंडीतील माती भुसभुशीत राहण्यासाठी आणि मुळांच्या योग्य वाढीसाठी कुंडीला योग्य ठिकाणी भोक असणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्यातून पाण्याचा योग्य निचरा होईल आणि रोपाला अधिक पाणी सहन करावे लागणार नाही. मातीत हवा खेळती राहण्यासाठी अशी सोय करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे झाडाच्या मुळांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकते. 

घरातील रोपांची वाढ करण्याबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQs

कोणती रोपं कुंडीतील पाण्यात जगू शकतात ?

आधी दिलेल्या माहितीप्रमाणे पोटॉस अथवा मनी प्लांट, आफ्रिकन व्हॉयलेट अशा प्रकारच्या वनस्पतींची मुळं पाण्यातदेखील जोमाने वाढतात. त्यामुळे घराच्या सजावटीसाठी पाण्याच्या बाटल्यांमध्ये ही रोपं लावू शकता. 

कोणतेही रोप घरात वाढवणे सोपे आहे का ?

प्रत्येक झाडाची वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला पोषक आणि योग्य असे वातावरण असणे गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली तर कोणतेही रोप तुम्ही तुमच्या घरातील बागेत नक्कीच जगवू शकता. 

रोपांची मुळं छाटल्यामुळे त्यांची वाढ चांगली कशी होते ?

काही रोपांच्या मुळांची छाटणी केल्यामुळे त्यांना पाणी शोषून घेण्यास जास्त चांगली मदत होते. ज्यामुळे त्यांची वाढ जोमाने होऊ लागते. म्हणूनच काही रोपांच्या योग्य वाढीसाठी त्यांची मुळे वेळोवेळी छाटणे गरजेचे असते. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे (Benefits of Organic Farming In Marathi)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)