ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती आणि विचार | Netaji Subhash Chandra Bose Information And Quotes In Marathi |

स्वातंत्र्य संग्रामात आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव (subhash chandra bose information in marathi) सर्वात आधी येतं. नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा होती, ज्याने अनेक देशप्रेमी तरूणांच्या मनात जोश निर्माण झाला. सुभाषचंद्र बोस हे आपल्या दृढ संकल्प आणि कधीही तडजोड न करणाच्या विचारांनी ओळखले जात असत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती (Subhash Chandra Bose Information In Marathi)

Subhash Chandra Bose Information In Marathi
सुभाष चंद्र बोस माहिती

1920 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची माहिती वाचताना पहिला संदर्भ येतो. तो त्यांनी इंग्लंडमध्ये इंडियन सिव्हील सर्विसची परीक्षा दिली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. पण जेव्हा त्यांना जालियनवाला बाग नरसंहार आणि इंग्रजांच्या क्रूरतेबाबत कळलं तेव्हा आईसीएसचं ट्रेनिंगमध्येच सोडून ते 1921 साली भारतात आले. या काळातच ते महात्मा गांधींच्या आंदोलनात सामील झाले पण काही काळाने वैचारिक मतभेदांमुळे ते महात्मा गांधींपासून दूर झाले. यानंतर नेताजींनी ‘आजाद हिंद फौज’ नावाच्या सेनेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर इंग्रजांना देशातून घालवण्याचा प्रयत्न केला. नेताजींचं जीवन जर तुम्ही जवळून पाहिलंत तर त्यांचा प्रत्येक विचार किती आशादायक आणि उर्जेने भरलेला होता, हे तुम्हाला आढळेल. भारताचं नागरिक असल्याच्या नात्याने आपल्याला सुभाषचंद्र बोस यांची माहिती (subhash chandra bose information in marathi) आणि योगदान माहीत असलंच पाहिजे.

प्रेरणा देणारे सुभाषचंद्र बोस यांचे विचार (Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi)

Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi
Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi

प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या एका काळात प्रेरणेची गरज असते. यावेळी तुमच्यासोबत असतील ते भारतातील काही थोर व्यक्तींचे विचार. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose Inspirational Quotes).

  • संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
  • तडजोडही खूपच अपवित्र गोष्ट आहे.
  • कर्माचं बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे.
  • मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.
  • तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
  • कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.
  • व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.
  • “मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.
  • “एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.”
  • “माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.“

वाचा – बेस्ट विश्वास नांगरे पाटील सुविचार

ADVERTISEMENT

सुभाषचंद्र बोस यांचे कोट्स (Subhash Chandra Bose Quotes In Marathi)

Subhash Chandra Bose Quotes In Marathi
Subhash Chandra Bose Quotes In Marathi

कठीण मार्गावर असताना प्रोत्साहन मिळाल्यास मार्ग नक्कीच सोपा होतो. मग वाचा प्रोत्साहन देणारे सुभाषचंद्र बोस यांचे हे कोट्स (Netaji Subhash Chandra Bose Motivational Quotes).

  • आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे. 
  • यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की. 
  • राष्ट्रवाद  हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे. 
  • एक  खऱ्या सैनिकांसाठी सैन्य आणि आध्यात्म या दोन्हींच्या प्रशिक्षणाची गरज असते. 
  • आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही. 
  • “आईचं प्रेम हे स्वार्थविरहीत आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही.”

वाचा – आंबेडकर जयंती स्टेटस मराठीमध्ये

विद्यार्थ्यांसाठी सुभाषचंद्र बोस यांचे कोट्स (Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi For Students)

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi For Students
Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi For Students

विद्यार्थीकाळात विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य घडू शकतं. 

  • कष्टांचं निसंशय एक आंतरिक नैतिक मूल्य असतं. 
  • श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते. 
  • जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल. 
  • आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की, जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश्य आहे. 

वीर सावरकरांचे कोट्स

ADVERTISEMENT

तरूणांना प्रेरणा देतील सुभाषचंद्र बोस यांचे कोट्स (Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi)

Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi For Youngsters
Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi For Youngsters

स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली बनवलेली आझाद हिंद सेना स्वातंत्र्यासाठी लढली. त्याच सेनानीचे विचार (Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi) तरूणांना नक्कीच प्रेरणा देतील.

  • जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा.
  • सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.
  • आपण नेहमीच संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारेच पुढे जात असतो.
  • चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.

व्हॉटसअपसाठी अण्णाभाऊ साठे स्टेटस

सकारात्मक राहा – सुभाषचंद्र यांचे कोट्स (Be Positive – Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi)

Be Positive - Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi

सकारात्मक विचारांचा परिणाम हा नेहमीच सकारात्मक असतो. मग तुम्हीही सुभाषचंद्र बोस यांचे सकारात्मक कोट्स (Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi) नक्की वाचा. अनेकजण गुरूस्थानी बोस यांना मानत असल्यामुळे गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देताना त्यांचे सुविचार आवर्जून शेअर करतात. 

  • अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.
  • माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती पण कठोर मेहनत टाळण्याचीही प्रवृत्ती माझ्यात कधी नव्हती.
  • एवढं तर तुम्हीही मानत असालच की, एक ना एक दिवस मी तुरूंगातून मुक्त होईन. कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे.
  • फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.

सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्ध घोषणा (Netaji Subhash Chandra Bose Slogan In Marathi)

Netaji Subhash Chandra Bose Slogan
Netaji Subhash Chandra Bose Slogan In Marathi

स्वातंत्र्यकाळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या घोषणा (Netaji Subhash Chandra Bose Slogan) अजरामर झाल्या आहेत.

ADVERTISEMENT
  • तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.. (तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन. )
    आजादी मिलती है नहीं है, हासिल की जाती है…(स्वातंत्र्य मिळत नाही.. मिळवावं लागतं.)
  • याद रखो कि अन्याय और गलत चीजों से समझौता करना सबसे बड़ा अपराध है (लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणं सर्वात मोठा अपराध आहे.)
  • चर्चाओं से इतिहास में कभी वास्तविक बदलाव नहीं आया (फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.)
  • भारत के भाग्य को लेकर आप कभी निराश न होना। दुनिया में ऐसी कोई ताकत नहीं है तो भारत को गुलाम बनाकर रख सके, भारत आजाद होगा और वह भी जल्द। (भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल. भारत लवकरच स्वतंत्र होईल.)

मग तुम्हीही सुभाष चंद्र बोस माहिती (subhash chandra bose information in marathi) आणि त्यांचे विचार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नक्की वाचा आणि शेअर करा.

हेही वाचा –

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार

यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स 

ADVERTISEMENT

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स

कधी कधी रडवणारे कोट्सही देतात आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

09 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT