ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ब्युटी हॅक्स अजिबात करु नका ट्राय

हे ऑनलाईन ब्युटी हॅक अजिबात करु नका ट्राय, होईल त्वचेचे नुकसान

 हल्ली सगळ्यांच्या हातात फोन असल्यामुळे खूप जणांचा तासनतास त्यावर जात असतो. त्यातच सोशल मीडियावर असे काही हॅक व्हिडिओ असतात. जे आपल्याला करायची इच्छा होणार नाही असे होत नाही, हे व्हायर व्हिडिओ ट्राय करायची इच्छा आपल्याला अनेकदा असते. काही हॅक हे नक्कीच कामी येतात. पण काही हॅक हे अजिबात कामाचे नसतात. ब्युटी हॅक संदर्भात तुम्ही अधिक सजग असायला हवे. याचे कारण असे की, काही हॅक हे जरी तुम्हाला चांगली त्वचा मिळवून देण्यासाठी असले तरी देखील त्वचेचे नुकसान करण्यासाठी असे हॅक (Online Beauty Hack) कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे असे कोणते हॅक आहेत जे करताना तुम्ही विचार करायला हवा ते जाणून घेऊया.

बर्फाचे पाण्याची बाफ

आईस मसाज

मध्यंतरीच्या काळात आईस बकेट चॅलेंज आलं होतं. या चॅलेंजमध्ये तुम्हाला अंगावर बर्फाचे पाणी ओतायचे असे हे चॅलेंज होते. पण आता त्वचेसाठी आलेले हे नवे हॅक त्वचा चिरतरुण ठेवण्यास मदत करते. यामध्ये तुम्हाला एका भांड्यात पाणी आणि बर्फाचे खडे घालून त्यामध्ये काही वेळ चेहरा बुडवून ठेवायचा असतो. बर्फामुळे त्वचेवरील पोअर्स बंद होतात. इतकेच नाही तर त्वचेच्या इतर काही समस्या दूर होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते. पण हा हॅक करताना तुम्ही किती वेळासाठी करायला हवा हे देखील माहीत असायला हवे. बर्फ हे जरी थंड असले तरी देखील त्याचा स्थायीभाव हा उष्ण आहे. त्यामुळे जास्त वेळ जर चेहरा बर्फात बुडवून ठेवला तर त्यामुळे चेहऱ्यावर बर्नचे म्हणजेच लालिमा येण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहरा काही काळासाठी झोंबू शकतो. त्यामुळे हा प्रयोग करताना या गोष्टीही लक्षात ठेवा. आईस फेशिअल करतानाही काही काळजी घ्यावी लागते

मॉश्चरायझर किंवा सनस्क्रिन चोळून लावणे

चेहऱ्यावर कशाप्रकारे सनस्क्रिन लावायचे किंवा मॉश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत कोणती? असे जर सोशल मीडियावर शोधाल तर तुम्हाला त्याचे 100 व्हिडिओ तरी अगदी हमखास मिळतील.अनेक ठिकाणी सध्या मॉश्चरायझर आणि सनस्क्रिन एकत्र करुन लावल्याने त्याचे फायदे मिळतात असे दाखवणारे अनेक व्हिडिओ पोस्ट होत आहेत. पण डॉक्टरांच्या माहितीनुसार असे करणे फार चुकीचे आहे. असे केल्यामुळे दोन क्रिम्सचे पोषण तुम्हाला मिळते असा गैरसमज जर असे तर असे अजिबात नाही. असे केल्यामुळे काहीही फरक पडत नाही. शिवाय घर्षणामुळे ती क्रिम गरम होण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे शक्यतो हा प्रयोग काही केल्या करु नका. 

ॲलोवेरा जेल ( AloeVera Gel)

ॲलोवेरा जेल

त्वचेसाठी ॲलोवेरा जेल ही जरी चांगली असली तरी देखील तिच्यावर प्रक्रिया करणे फार जास्त गरजेचे असते. हल्ली असे व्हिडिओ दाखवले जातात. ज्यामध्ये तुम्ही घरी ॲलोवेरा आणून त्याला सोलून त्याचा गर चाकूने काढून तो चांगला फेटून त्वचेला लावला तर त्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. पण असे अजिबात नाही. कोरफडीचा गर काही जणांच्या त्वचेला अजिबात चालत नाही. काहींना यामुळे त्वचेवर रॅशेशही येतात. इतकेच काय तर पिंपल्स येण्याची शक्यताही असते. त्यामुळे असा कच्चा गर केवळ हॅकमध्ये दाखवण्यात आला आहे म्हणून अजिबात करु नका. 

ADVERTISEMENT

आता हे ऑनलाईन ब्युटी हॅक करताना एकदा तरी विचार करा. 

10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT