ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
mistakes-you-should-avoid-while-using-aloe-vera-gel-for-skin-in-marathi

कोरफड वापरताना करू नका या चुका

कोरफड ही त्वचेसाठी वरदान मानली जाते. ज्या व्यक्तींना नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घ्यायची असते त्यांना कोरफडचा वापर अधिक करताना आपण पाहतो. विशेषतः थंडपणा आणि त्वचेसाठी उत्तम म्हणून कोरफडचा वापर करण्यात येतो. कोरफड जेल त्वचेवर लावण्यात येते. असं म्हणतात की, कोरफडचा वापर नियमित केल्यास, चेहऱ्यावरील मुरूमं, अॅक्ने अथवा येणारे डाग निघून जाण्यास मदत मिळते. यामध्ये असणारे अंटिएजिंग आणि अँटिऑक्सिडंट्स गुण चेहऱ्याला अधिक काळ सुंदर ठेवण्यास फायदेशीर ठरतात. पण काही जणांना कोरफडचा वापर केल्यानंतरही आपल्याला म्हणावा तसा फायदा मिळत नाही असं वाटतं. पण कोरफड योग्य पद्धतीने न वापरल्यास, त्याचा फायदा मिळत नाही. कोरफड वापरताना तुम्ही या चुका करू नका म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.  

बाजारातून कोरफड विकत घेऊ नका 

Aloe Vera

आजकाल बाजारामध्ये अनेक ब्रँड्सचे कोरफड जेल उपलब्ध आहे. मात्र तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरातच कोरफडचे झाड लावा आणि त्याचे ताजे जेल काढून तुमच्या त्वचेवर वापरा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताजे कोरफड जेल हे त्वचेवर अधिक प्रभावशाली असते. तर बाजारातून मिळणाऱ्या कोरफड जेलमध्ये पूर्ण शुद्धता नसते. त्यामुळे घरातच कोरफड लावा आणि त्याचा तुमच्या त्वचेसाठी वापर करावा. 

लहान पानांचा वापर करू नका 

जेव्हा तुम्ही घरी कोरफड जेल काढता, तेव्हा या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, तुम्ही त्याची लहान पाने तोडू नयेत. नेहमी मोठी आणि पूर्ण वाढलेली कोरफडीची पानेच तुम्ही तोडा आणि त्याचे जेल काढून घ्या. वास्तविक लहान पानांमधील जेल हे पूर्ण तयार झालेले नसते. हे जर तुम्ही त्वचेला लावले तर तुम्हाला त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या होतात. त्यामुळे संपूर्ण तयार असलेल्या पानांमधूनच तुम्ही कोरफड जेल काढून त्याचा त्वचेसाठी वापर करणे योग्य आहे. 

काट्यांकडे करू नका दुर्लक्ष

जेव्हा तुम्ही कोरफड जेलचा वापर करत असाल तेव्हा तुम्ही त्यावरील काटे व्यवस्थित लक्ष देऊन काढा. कारण जेल काढत असताना तुम्हाला या काट्यांचा त्रास होण्याची शक्यता असते. काटे काढल्यानंतर तुम्ही ही पानं मधून कापा आणि नंतर चमच्याने यातील जेल काढा आणि त्याचा चेहऱ्यासाठी वापर करावा. 

ADVERTISEMENT

खराब त्वचेवर वापरू नका 

Aloe Vera For Skin

बऱ्याचदा काही जण जशी त्वचा आहे त्यावर कोरफड जेल काढून वापर करतात. यामुळे आपली त्वचा स्वच्छ होईल असं अनेकांना वाटतं. पण खराब त्वचेवर याचा वापर अजिबात करू नका. याचा तुमच्या त्वचेला कोणताही फायदा मिळणार नाही. तुम्हाला जर याचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही त्वचा स्वच्छ करा आणि मगच याचा वापर करावा. असं केल्यामुळे तुमच्या त्वचेचा आतील भागदेखील चांगला राहातो आणि कोरफड जेलच्या गुणामुळे त्वचेला अधिक लाभ मिळेल. 

स्किन टाईपकडे करू नका दुर्लक्ष 

हे खरं आहे की, कोरफड जेल प्रत्येक स्किन टाईपसाठी उपयुक्त आहे. पण याचा वापर करताना तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. उदाहरणार्थ, तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडासा नारळ तेलाचा वापर करावा. तर तेलकट त्वचा असल्यास, एक पातळसा लेअर त्वचेवर लावा आणि मग रात्रभर तुम्ही चेहऱ्यावर तसंच ठेवा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही याचा प्रत्यक्ष वापर करू शकता. त्यामध्ये काहीही मिक्स करण्याची गरज भासत नाही. 

कोरफड हे त्वचेसाठी नैसर्गिक असा घटक आहे, जो योग्य पद्धतीने वापरल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतोच. त्यामुळे कोरफड जेलचा वापर करत असताना सहसा वरील चुका तुम्ही टाळणंच योग्य आहे. तुम्हीही वापर करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT