ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
हाताचा स्पर्श सांगतो

तुमच्या हाताचा स्पर्श सांगतो तुमच्याविषयी अधिक

तुमच्या हाताला तुम्ही कधी स्पर्श करुन पाहिला आहे का? तुमच्या हाताचा स्पर्श (Palm Touch) तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. आताच तुमच्या हाताला स्पर्श करुन पाहा. ज्याप्रमाणे तुमच्या हातांच्या रेषा या तुमच्याबद्दल काही गोष्टी सांगत असतात. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या हाताचा स्पर्श हा देखील तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. आज आपण या गोष्टीची अधिक माहिती घेणार आहोत. तुमच्या हाताचा स्पर्श कसा आहे त्यावरुन तुम्हाला कोणत्या गोष्टी सहज मिळतील आणि कोणत्या गोष्टी मिळवताना कष्ट करावे लागेल याचा अंदाज बांधला जातो. चला जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती

कडक हात (Hard Palm)

हाताचा स्पर्श सांगतो बऱ्याच गोष्टी

खूप जणांच्या हाताचा स्पर्श हा एकदम हा एकदम कडक असतो. असा हात हातात घेतल्यानंतर तो खरखरीत लागतो. असे म्हणतात की, ज्यांच्या हाताचा स्पर्श हा खूप खरखरीत असतो. अशा लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी सहजगत्या मिळत नाही. उदा. पैसा हा त्यांच्याकडे सहज मार्गाने येत नाही.त्यांना त्यासाठी अगदी खूप मेहनत करावी लागते. जर तुमचा हात कडक असेल तर तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शिवाय कोणतेही नवीन काम हाती घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पटकन यश मिळेल अशीही खात्रीही देता येत नाही. त्यामुळे अजिबात निराश होऊ नका. थोडी मेहनत करा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. थोडा धीर धरा. कोणतेही काम करताना निराश होऊन जाऊ नका.  कारण कष्टाने मिळवलेल्या गोष्टीचा आनंद हा जगातील सगळ्या आनंदापेक्षा मोठा असतो.

मऊ हात (Soft Palm)

खूप जणांनी कितीही काम केले तरी देखील त्यांच्या हाताचा स्पर्श हा एकदम मुलायम असतो. असे म्हणतात की, अशा हाताच्या व्यक्तिंना यश मिळवण्यासाठी फार धडपड करावी लागत नाही. त्यांना अगदी सहजगत्या सगळे मिळते. मऊ हात असलेल्या व्यक्ति या आकर्षक असतात. त्यांचा हात छान गुबगुबीत असतो की, त्यांचा हात पाहूनच अनेक जण त्यांच्या प्रेमात पडतात. हाताचा आकार आणि रंग गुलाबी असेल तर त्यांचा रक्तपुरवठा चांगला असतोच. पण अशा व्यक्तिंना वडिलोपार्जित गोष्टी अगदी सहज मिळतात. कोणताही वाद न घालता त्यांना जे हवे ते आयुष्यात पटकन मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुमचा हात मऊ असेल तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला असा अनुभव नक्की येईल.

*  अनेकदा हाताच्या स्पर्शावर जरी सगळ्या गोष्टी अवलंबून असल्या तरी देखील काही गोष्टी या तुमच्या मेहनतीवरही अवलंबून असतात. केवळ माझ्या हाताचा स्पर्श मऊसूत आहे किंवा माझे हात सुंदर आहेत म्हणून तुम्हाला सगळे काही अगदी सहज मिळेल असे नाही. त्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत घेणे खूपच जास्त गरजेचे असते. त्यामुळे कोणतेही काम करताना मेहनत करा. त्या कामासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करा. तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळण्यास मदत मिळेल.  

ADVERTISEMENT

हाता तुमच्या हाताचा स्पर्श करा आहे. त्यानुसार कामाला लागा आणि यश संपादन करा. 

26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT