ADVERTISEMENT
home / ज्योतिष
personality-traits-of-tuesday-born-people-in-marathi

मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींचे व्यक्तिवैशिष्ट्य काय आहे, घ्या जाणून

घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर अनेक ठिकाणी काही दिवसांनंतर त्याच्या जन्मवेळेनुसार कुंडली बनवून घेण्यात येते. बाळाच्या जन्मदिवस आणि जन्मवेळेनुसार, ज्योतिषशास्त्रात त्याचे भविष्य कसे असेल हे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्र हा एक अभ्यास आहे. तसं तर जन्मवेळेप्रमाणेच जन्मदिवसही महत्त्वाचा असतो. मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींचे करिअर, आयुष्य कसे असेल याचा अभ्यास या लेखातून आम्ही देत आहोत. तुमचा अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मंगळवारी जन्म झाला असेल तर नक्की वाचा. 

आयुष्यात कधीही अपयशाला घाबरत नाहीत 

मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींचा ग्रह मंगळ असून या व्यक्ती थोड्या रागीट स्वभावाच्या असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीतूनही दिसून येतो. मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती या थोड्या कडक स्वभावाच्या असतात. तसंच या अत्यंत तेज असतात आणि त्यामुळे पटापट कामाचा उरक यांना असतो. तसंच आयुष्यात कधीही हार न मानता या व्यक्ती अपयशाला कधीही घाबरत नाहीत. तसंच कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा स्वीकार या व्यक्ती करत नाहीत. हे मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. या व्यक्ती अत्यंत इमानदार असून कोणत्याही लहानसहान चुकांकडेही दुर्लक्ष करत नाहीत. 

स्वभाव असतो रागीट 

मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींची स्टाईल ही अत्यंत रॉयल असते, तसंच त्यांना शाही जीवन जगायला आवडते. खर्च करण्याची यांची प्रवृत्ती असते. मात्र गरजेच्या वस्तूच या व्यक्ती खरेदी करतात. या व्यक्तींना चांगले कपडे घालण्याची आवडत असते. दुसऱ्या व्यक्तींवर प्रभाव पाडण्यात या व्यक्ती अत्यंत माहीर असतात. सर्व गोष्टींवर आपले वर्चस्व सहजपणे या व्यक्ती करू शकतात. मात्र या व्यक्ती अतिशय रागीट असतात, त्यामुळे अनेकदा त्यांचे नुकसानही होते. रागीट स्वभावामुळे समोरच्या व्यक्ती बरेचदा लांब राहणेच पसंत करतात. कारण या व्यक्तींचे स्वतःच्या रागावर अजिबात नियंत्रण राहत नाही. असे असले तरीही मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांशी संबंध जपण्यास या व्यक्ती पुढे असतात. या व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासी आणि बिनधास्त असातत. कोणताही निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. जितक्या लवकर या व्यक्तींना राग येतो तितका लवकर त्यांचा राग शांतही होतो.

जबाबदारी योग्यरित्या पार पाडतात 

मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती या शारीरिक आणि मानसिक रूपाने अत्यंत मजबूत असतात. आरोग्यासंबंधित या व्यक्तींना जास्त तक्रारी नसतात. तसंच या व्यक्ती बऱ्यापैकी शरीरयष्टीने मजबूत असतात. या गोष्टीमुळे सुरक्षारक्षक, पोलीस, सेना, पत्रकार अशा पद्धतीच्या करिअरमध्ये या व्यक्ती दिसून येतात. तसंच खेळ आणि तांत्रिक क्षेत्रातही या व्यक्ती पुढे असतात. मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती या अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि जबाबदार असतात. याच कारणामुळे कार्यालय असो वा घर दोन्ही गोष्टी या व्यक्ती अत्यंत जबाबदारीने आणि हुशारीने सांभाळतात. काम कोणतेही असो या व्यक्तींच्या हातून पूर्ण होणारच हा विश्वास या व्यक्तींच्या बाबतीत सर्वांनाच असतो. 

ADVERTISEMENT

प्रेमात स्वतःला झोकून देणाऱ्या व्यक्ती 

मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींचे प्रेम आणि वैवाहिक आयुष्य हे अत्यंत सुंदर आणि अप्रतिम असते. या व्यक्तींचा जोडीदारही चांगला असतो आणि या व्यक्ती कुटुंबाला खूपच महत्त्व देतात. म्हणूनच या व्यक्तींना घरातूनही सर्वांकडून महत्त्व मिळते. रागीट स्वभाव बाजूला केला तर या व्यक्तींसारखा दुसरा माणूस नाही असं म्हटलं जातं. मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्तींनी एखाद्यावर प्रेम केले तर त्या व्यक्तीला कधीही फसवत नाहीत, धोका देत नाहीत. आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे या व्यक्ती व्यक्त करतात. कधी कधी रागामुळे प्रेमात दुरावा निर्माण होऊ शकतो वा मतभेद होऊ शकतात. मात्र यातून सुटका मिळविण्यासाठी या व्यक्तींनी ध्यान आणि योगाचा अभ्यास नियमित आपल्या जीवनात करावा असे सांगण्यात येते. 

तुमचा अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जन्म मंगळवारी झाला असेल तर तुम्ही तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना वा नातेवाईकांना नक्की हा लेख पाठवा आणि त्यांना टॅग करा. 

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT