ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मंजिरी नथ

प्रसाद ओकची पत्नी हिच्या नावाने ओळखली जाणार नथीचा हा प्रकार

 मराठीतील एक प्रसिद्ध आणि पावर कपल म्हणजे प्रसाद आणि मंजिरी ओक. प्रसाद ओकला त्याच्या दिग्दर्शनाच्या कामात मदत करण्याचे काम मंजिरी अगदी सक्षमपणे करते. असे करताना आता ती फॅशनच्या चमचमच्या दुनियेत आपला एक वेगळा ठसा उमटवताना दिसत आहे. मंजिरी अनेक लहान- मोठ्या ब्रँडचे ब्रँडीग करताना तिच्या इन्स्टावरुन दिसते. तिचे फोटो पाहत ही मॉडेलपेक्षा कमी नाही असे मत आल्यावाचून राहणार नाही. सध्या मंजिरीच्या शिरपेचात आणखी मोरपंख खोवले गेले आहे. तिच्या नावाने नखीचा एक प्रकार सध्या ओळखला जाणार आहे. ही मंजिरी नथ आहे तरी काय घेऊया जाणून

इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

प्रसाद ओकेने केले बायकोचे अभिनंदन

प्रत्येक पुरुषासाठी त्याची पत्नी ही त्याचा कणा असते. तिच्या मदतीनेच तो आपली पुढील वाटचाल करत असतो. प्रसाद ओकच्या पत्नीने तिच्या नवऱ्याची चांगलीच साथ दिलेली आहे. त्याच्यासोबत काम करताना तिने अनेक छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन दिलेले आहे. असे करताना तिच्या मेहनतीचे फळ म्हणून की काय तिच्या नावाने आता एक नथ ओळखली जाणार आहे. प्रसादने तिचे अभिनंदन करण्यासाठी एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट मंजिरीला प्रोत्साहन देणारी आहे. मंजिरीने केलेल्या कामाचे कौतुक करुन त्याने कोणाचाही विचार करु नकोस. तू पुढे जा अशा स्वरुपाची त्याने एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट खरंच एखाद्या पत्नीसाठी फारच महत्वाची आहे.

ओटीटीवर येणार ‘पुष्पा’ भेटीला, हिंदीत पाहायला मिळणार चित्रपट

ADVERTISEMENT

प्रसाद ओक यांनी पोस्टमध्टे म्हटंले आहे की, आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलं आहेस. या निरपेक्ष हेतूंचे फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला तुझं नाव लागलंय. “मंजिरीनथ” आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली… तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत…या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️ 𝐒𝐎𝐎𝐎𝐎 𝐏𝐑𝐎𝐔𝐃 𝐎𝐅 𝐘𝐎𝐔..!! #love #proud #proudhusband #keepitup #फालतूलोकांकडेदुर्लक्षचकर #godblessyou 

दिग्दर्शक विजू माने यांची सोनालीबद्दल केलेली ती पोस्ट चर्चेत

मंजिरीचे फोटो असतात खूपच सुंदर

मंजिरी इन्स्टाग्रामवर सध्या चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती वेगवेगळे फोटो तिच्या पेजवर शेअर करत असते. तिचा मराठमोळा साज हा सुंदरच असतो. तिने अनेक लहान लहान उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ती त्यांचे फोटोशूट करत असते. ज्यामध्ये तिचा साज पाहून अनेकांना एक वेगळी प्रेरणा मिळते. तिचे नाव ज्या नथीला देण्यात आले आहे ती नथ देखील खूपच सुंदर आहे. ही नथ रोजच्या नथीसारखी नाही तर ती थोडी वेगळी आहे. गोलाकार आकाराच्या या नथीमध्ये मोती आणि मण्यांची गुंफण दिसते. ही नथ गोलाकार आकाराची आहे. ती ओठांवर इतकी छान येते की, ही नथ मंजिरीला फारच छान दिसते. तुम्हालाही लग्नामध्ये अशी नथ नक्कीच वापरता येईल.

मंजिरीच्या या नव्या यशामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळेल हे नक्कीच

ADVERTISEMENT
13 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT