ADVERTISEMENT
home / Festival
रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व | Rangpanchami Information In Marathi

रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व | Rangpanchami Information In Marathi

होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी. होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. महाराष्ट्रात या सणाला धुलिवंदन अथवा धूळवड असंही म्हणतात. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून. पिचकारीने रंगाचे पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची पद्धत भारतात आहे. काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो. मोठ्यांना आदराने कपाळावर टिळा लावून आणि समवयस्क आणि लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो. यासाठीच जाणून घ्या रंगपंचमी माहिती (Rangpanchami Information in Marathi) आणि हा सण नेमका कसा साजरा करावा.  

रंगपंचमी तिथी (Panchami Tithi)

 

रंगपंचमी होळी नंतर म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेनंत येणाऱ्या फाल्गुन कृष्ण पंचमीला असते. या वर्षी तिथीनुसार ‘18 मार्च 2022’ ला रंगपंचमी साजरी होत आहे. यंदा रंगपंचमी खेळण्याची तिथी 18 मार्च 2022 ला सुरू होत असून ती 22 मार्च 2022 ला समाप्त होत आहे. या तिथीनुसार रंगपंचमी खेळल्यास राशीमधले दोष कमी होतात अशी मान्यता आहे. यासाठी जाणून घ्या राशीनुसार कोणत्या रंगाने खेळावी होळी. दरवर्षी साधारणपणे मार्च ते एप्रिल या महिन्यातच रंगपंचमी येते. यंदा होळी 17 मार्च, धुलिवंदन 18 मार्च आणि त्यानंतर 22 मार्चला रंगपंचमी आहे. होळी नंतरचे सलग पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमी खेळणं हे ऐश्वर्य, आनंदाचे प्रतिक असलेलं धनदायक मानले जातं. भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो. 

Panchami Tithi

pexels.com

ADVERTISEMENT

रंगपंचमीचे महत्त्व (Significance Of Rang Panchami In Marathi)

 

रंगपंचमी हा सण होळी, धुलिवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीनंतरचा दुसरा दिवस रंगपंचमी साजरी होते तर काही ठिकाणी होळीनंतरचे पाच दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो. या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात. या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असले. तरी रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जात असावा. कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात. झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते. त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते. याचं एक प्रतिक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी. शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते. त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जात असावा. कारण रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचीही पद्धत आहे. असं म्हणतात द्वापारयुगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असतं. तिच प्रथा आजही रंगपंचमीच्या  रूपात पाळली जात आहे. हा सणाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. थोडक्यात सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणाची निर्मिती केली गेली असावी. यासाठी जाणून घ्या होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल खाद्यपदार्थ 

 

रंगपंचमी कशी साजरी केली जाते (Celebrations And Rituals During Rang Panchami In Marathi)

होळी अथवा रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वात आधी भक्तिपूर्वक राधा – कृष्ण आणि घरातील इतर देवतांना रंग लावला जातो. त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो. लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगाचा टिळा लावून अथवा त्यांच्या चरणांवर रंगाचे पोट लावून या सणाला सुरूवात करतात. देवाची पूजा आणि घरातील मोठ्यांना आदरपूर्वक रंग लावल्यावर मग सर्वांसोबत रंगांची उधळण केली जाते. असं म्हणतात की या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देव देवता स्वतः भक्ताला आर्शिवाद देण्यासाठी पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात. कोरडे रंग, गुलाल, अबीर असे रंग उडवत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडत हा सण साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी ते रंगपंचमी दिवशी शिमगोत्सवही साजरा केला जातो. होळी नंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेचा पालखी आणि जत्रोत्सव या दिवसांमध्ये साजरा  केला जातो. घरो घरी येणाऱ्या पालखीचे दर्शन करण्यासाठी चाकरमानी या दिवसांमध्ये खास आपल्या कोकणातील घरी जातात. समा आणि शिमग्यातील पालखी नाचवताना पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.  त्यामुळे निरनिरळ्या ठिकाणी या सणाचे महत्त्व निरनिराळे आहे. रंगपंचमी खेळताना भगवान शिवशंकराला प्रिय असलेले भांग पिण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे थंडाई सारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात. आजकाल या सणाचे स्वरूप काळानुरूप बदलत चालले आहे. त्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी अथवा रंगपंचमीनिमित्त गेट-टुगेदर करत होळीच्या पार्टीचं आयोजन केलं जातं. या रंगपंचमी पार्टीजचे आयोजन मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. या निमित्ताने मग रंगपंचमी खेळण्यासाठी आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व जण एकत्र येतात. हा आनंद साजरा करताना प्रियजनांना द्या या होळीच्या शुभेच्छा संदेश

सुरक्षित रंगपंचमी कशी साजरी करावी (How To Play Rang Panchami Safely)

होळीचा सण हा रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. मात्र मागच्या वर्षभरापासून जगावर कोरोना नामक महामारीचे संकट घोंगावत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झालेला असला आणि  दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असलं तरी यंदा रंगपंचमी खेळताना सावध राहणं गरजेचं आहे. सोशल डिस्टसिंग पाळत कमी लोकांच्या उपस्थितीत रंगपंचमी खेळण्यास काहीच हरकत नाही. मात्र या काही गोष्टी प्रत्येकाने पाळायला हव्या. शिवाय अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घ्या.

ADVERTISEMENT
  • रंगपंचमी खेळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
  • सुरक्षेसाठी केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगाचा वापर करा
  • रंगपंचमी खेळताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या
  • रंगपंचमी खेळण्यापूर्वी अंगाला नैसर्गिक तेल अथवा क्रिम लावा ज्यामुळे तुम्हाला रंगाची अॅलर्जी होणार नाही.
  • लहान मुलं, वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तीसोबत रंगपंचमी खेळू नका
  • कोणलाही जबरदस्तीने रंग लावणे टाळा
  • रंग खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा आणि केस स्कार्फने झाका
  • ओलसर रंगपंचमी जागी खेळणार असाल तर तिथे खेळताना तुमचा पाय घसरला जाणार नाही याची काळजी घ्या
  • स्विमिंग पूल अथवा तलावाजवळ रंगपंचमी खेळणे टाळा
  • रंगपंचमी खेळण्यापूर्वी भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल
  • जास्त काळ पाण्याने ओले झालेले कपडे अंगावर ठेवू नका
  • रंगपंचमी थोड्या वेळासाठीच खेळा आणि नंतर लगेचच स्वच्छ अंघोळ करून केस आणि अंग कोरडे करा
  • सर्दी, खोकला, शिंक येणे अथवा ताप असेल तर रंगपंचमी खेळणे टाळा

देखील वाचा –
होली की हार्दिक शुभकामनाएं और संदेश

16 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT