ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
how-to-find-out-if-your-partner-has-had-an-orgasm-in-marathi

Sex Education: संभोग केल्यावर जोडीदार समाधानी आहे की नाही कसे कळेल

सेक्स (Sex) हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे सेक्सबाबत अजूनही व्यवस्थित बोलले जात नाही. तसंच एखाद्या जोडप्यामध्ये संभोग व्यवस्थित होत आहे की नाही अथवा आपला जोडीदार अर्थात विशेषतः महिला जोडीदार समाधानी आहे की नाही हे पटकन विचारायला काही जण धजावत नाहीत किंवा सेक्सनंतर तुला समाधान मिळालं आहे की नाही हे विचारणं काही जणांना थोडं विचित्रही वाटतं. सेक्स तर केले जाते. पण आपला जोडीदार आपल्याबरोबर केलेल्या सेक्सनंतर समाधानी आहे की नाही हे न विचारता कसे कळेल हे तुम्हाला माहीत असायलाच हवे. Orgasm हा सेक्समधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सेक्स हे चरमसुखप्राप्तीसाठीच करण्यात येते. सेक्सचे फायदेही आहेत. पण संभोग केल्यानंतर आपल्याला तर समाधान मिळालंय पण जोडीदाराबाबत विशेषतः महिलांना सुख मिळालं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाची माहिती. 

शरीर देते वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया 

संभोग सुख अर्थात (Sex Orgasm) प्राप्त झाल्यानंतर महिलांच्या शरीरात थोडासा बदल दिसून येतो. सेक्स झाल्यानंतर अनेक महिला स्वतःला आखडून घेतात आणि अचानक थकतात. सेक्स करताना हे बदल होत नाहीत, पण जेव्हा त्यांना समाधान मिळतं, तेव्हा त्यांच्या शरीरातील बदल तुम्हाला जाणवतो. तेव्हाच त्या समाधानी झाल्या आहेत हे समजून जा. 

योनी संकुचित होते

सेक्सदरम्यान महिलांची योनी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. योनीबाबत माहिती आपल्या सर्वांना असते. पण जेव्हा तुमच्या जोडीदाराला Orgasm प्राप्त होत असतो तेव्हा महिलांची योनी संकुचित होऊ लागते. ज्याप्रमाणे पुरूषांचे लिंग सेक्स चढल्यावर ताठ होते. त्याचप्रमाणे महिलांची योनीदेखील सुख मिळाल्यानंतर संकुचित झालेली कळते. याचाच अर्थ त्यांना सेक्स प्राप्तीचे सुख पूर्ण मिळाले आहे असा होतो. 

लक्ष लागत नाही

संभोग झाल्यानंतर जर महिलांना सुख मिळालं असेल तर बरेचदा महिला या पुरूषांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवतात अथवा डोळे घट्ट बंद करून घेतात. घट्ट डोळे बंद करून घेतले असतील अथवा तुम्हाला घट्ट पकडले असेल तर तुम्ही समजून जावे की तुमच्या जोडीदाराला परमोच्च सुखाची प्राप्ती झाली आहे. बरेचदा काही महिलांची सेक्स करताना परमोच्च सुख मिळालं की हालचालही बंद होते हेदेखील लक्षात घ्या. 

ADVERTISEMENT

शरीर अधिक संवेदनशील होते 

सेक्स करताना महिलांचे शरीर खूपच संवेदनशील असते पण परमोच्च सुख प्राप्तीनंतर महिलांचे शरीर अधिक संवेदनशील होते. जर त्यांना सुख मिळाल्यानंतरही सेक्सची प्रक्रिया सुरू असेल तर त्या अधिक आक्रमकतेने प्रतिक्रिया देतात. कारण त्यांना अधिक संवेदनी जाणवल्याने त्यांना अधिक सेक्स चढतो आणि मग अधिक प्रतिक्रिया दिल्या जातात. कारण यावेळी त्यांना अधिक सुख मिळते आणि कदाचित काही महिलांना यावेळी योनीमध्ये त्रासही होतो. 

मूडमधून येईल कळून 

बरेचदा महिला ऑर्गेजम न मिळाल्यास चिडचिड करतात. पण जर त्या समाधानी असतील तर त्यांचा सेक्स मूड अत्यंत चांगला राहतो. तर एकदा सेक्स केल्यानंतर पुन्हा काही वेळातच त्या तुमच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना पहिल्यांदा व्यवस्थित समाधान मिळाले आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. जेव्हा दोघांनाही एकदम प्लेजर अर्थात समाधान मिळते तेव्हा सेक्स अर्थात संभोग अधिक चांगल्या पद्धतीने झाला आहे असं समाजावे. 

सेक्स हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासह याबाबत व्यवस्थित बोलायला हवे. तुम्ही तुमच्या भावना व्यवस्थित व्यक्त केल्यास, तुमचे सेक्स लाईफ अधिक चांगले राहू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT