ADVERTISEMENT
home / Sex Advice
सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

सेक्स हे केवळ तुमच्या सेक्स लाईफसाठीच चांगलं नाही तर तुमचं शरीर हेल्दी आणि फिट राखण्यासाठीही याची मदत होत असते. फिजिकल रिलेशन अर्थात सेक्स करणं हे सर्वांसाठीच एक गरज असते, ही गोष्ट नक्कीच सगळ्यांना मान्य असते. पण रोज सेक्स करायला हवं का असा प्रश्नही कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येऊन गेलेला असतो. खरं तर सेक्स केल्याने अनेक फायदे होतात. पण त्याची माहिती बऱ्याच जणांना नसते. एका रिसर्चनुसार, सेक्स केल्याने आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजारांशी लढण्याची प्रतिकारक्षमता अधिक वाढते. महिलांसाठी तर सेक्स करण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करणं असो अथवा चेहऱ्यावर अधिक चमक आणायची असो यामध्ये सेक्स तुम्हाला बराच फायदा करून देत असतो. सेक्सचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया –

वजन करतं कमी

Shutterstock

सेक्स म्हणजे एक आनंद तर आहेच पण त्याचबरोबर शरीरासाठी ही एक कार्डियो व्यायाम आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. तुम्ही जर अर्धा तास दिवसातून सेक्स केलं तर तुमच्या साधारण 85 कॅलरी बर्न होतात आणि प्रति तास साधारण 170 कॅलरी बर्न होते. सेक्स हा एक व्यायाम आहे आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सेक्स दरम्यान जी शारीरिक प्रक्रिया करण्यात येते त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी बर्न करण्यास मदत होते. तसंच याचा परिणाम तुमच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी होतो.

ADVERTISEMENT

तणावापासून मिळेल सुटका

GIPHY

सेक्समुळे केवळ तन आणि मनालाच समाधान मिळतं असं नाही तर सेक्स दरम्यान मिळणारा परमोच्च आनंद हा तुमच्या शरीरात चांगले हार्मोन्स निर्माण करतो आणि त्यामुळे तुम्हाला तणावापासून सुटका मिळते. कारण सेक्स केल्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सीटॉक्झिन रिलीज होतात जे तुमच्या शरीरावर येणाऱ्या तणावासाठी जबाबदार असतात. सेक्स केल्याने यातून मुक्तता मिळते. 

हेल्दी आणि तजेलदार त्वचेसाठी –

ADVERTISEMENT

GIPHY

सेक्समध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स असतात. सेक्स करताना तुमच्या शरीरातील मांसपेशी या पोझिशन्स मजबूत बनवतात. ज्यामुळे तुम्ही निरोगी तर राहताच. शिवाय तुमची त्वचा अधिक तजेलदार होते. तुमचं शरीर निरोगी राहण्यासाठी तुम्ही सेक्स करत राहण्याची गरज आहे. पण अर्थातच याची अतिशयोक्ती करू नये. तुमच्या शरीराला आवश्यक तितकंच सेक्स करावं आणि सेक्स करताना कोणतीही जबरदस्ती असू नये तर त्याचा आनंद घेऊनच सेक्स करता यायला हवं. तसंच नेहमी एकच पोझिशन्स करत राहू नका. आपल्या जोडीदाराबरोबर तुम्ही वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्सचा आनंद घेत राहिलात तर तुमच्या शरीरासाठी त्याचा फायदा होतो. 

त्रासातही मिळतो आधार

GIPHY

ADVERTISEMENT

असं म्हटलं जातं की, सेक्स हा त्रासावरील नैसर्गिक उपचार आहे. डोकंदुखी असो अथवा पाठदुखी असो सेक्स केल्याने ऑक्सिटॉक्झिन रिलीज झाल्यावर असणारे हे त्रासही निघून जातात. शिवाय सेक्स करताना आपल्याला त्रासाचा विसरही पडतो. त्यामुळे सेक्स करणं फायदेशीर ठरतं.

सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव –

Shutterstock

सेक्सनंतर ऑर्गजमपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत महिलांना सर्व्हायकल कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळते. वास्तविक पुरूषांमधील इजेक्युलेशन प्रोस्टेट कॅन्सरपासून वाचवण्यास मदत करतं. तर महिलांमधील इजेक्युलेशन सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव करण्यास फायदेशीर ठरतं. त्यामुळे सेक्स करण्याची गरज आहे. पुरुष आणि महिला दोघांच्याही शरीरारा याची गरज भासते.

ADVERTISEMENT

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते

Shutterstock

एका रिसर्चमध्ये दिल्याप्रमाणे नियमित स्वरूपात सेक्स केल्यास, तुमचा रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते. तसंच तुमच्या हृदयाशी संबंधित आजारदेखील सेक्स करण्याने दूर होतात. तसंच तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते आणि शरीरातील रोगांपासून दूर राखण्यासाठीही सेक्सची मदत होते.

हेदेखील वाचा

ADVERTISEMENT

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

तुमचा ‘सेक्स मूड’ तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

जगभरातील अशी शहरं जिथे सेक्स लपून नाही तर केला जातो खुलेआम

18 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT