सेक्सचे अनेक फायदे आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहे. सेक्समुळे कॅलरीज बर्न होतात. त्याशिवाय आपले हृदय चांगले राहते, त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. तसंच आपल्या वैवाहिक जीवनात सेक्स एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. पण बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या सेक्सला तितकंसं महत्त्व देत नाहीत, जितकं द्यायला हवे. त्यामुळे अशा महिलांना मेनोपॉज लवकर येतो असं म्हटलं जातं. पण हे कितपत खरं आहे आणि यामधील नक्की तथ्त्य काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. खरंच महिला जर कमी प्रमाणात सेक्स करत असतील तर त्यांना वयाच्या आधी मेनोपॉज येतो का? असा प्रश्न नेहमी बऱ्याच जणांना असतो तर त्याबद्दल अधिक माहिती मिळणंही अपेक्षित आहे. त्यामुळे आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
वैवाहिक जीवनात महिला सेक्समध्ये कमी स्वारस्य दाखवतात
Shutterstock
वैवाहिक जीवनामध्ये सेक्स हे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. सेक्स करण्यात पुरूष जितके अॅक्टिव्ह असतात तितक्या महिला आळशी असल्याचे बऱ्याच अभ्यासातूनही दिसून आले आहे. त्यामुळे याबाबतही अनेक ठिकाणी अभ्यास करण्यात आला आहे. यापैकी एक अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे की, 35 वर्षांच्या वर ज्या महिला सेक्स्शुअली कमी अॅक्टिव्ह असतात त्यांना मेनोपॉज लवकर येतो. अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, नियमित सेक्स करणाऱ्या महिलांना अगदी योग्य वयात मेनोपॉज येतो. त्यांना लवकर याचा त्रास होत नाही. मात्र ज्या महिला आठवड्यातून एकदा सेक्स करतात त्यांना महिन्यातून केवळ एकदा सेक्स करणाऱ्या महिलेपेक्षा तुलानात्मक 28% मेनोपॉज लवकर येण्याची शक्यता कमी असते. सेक्स व्यवस्थित न केल्यामुळे शरीराला अत्यंत तोटे होतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमची मासिक पाळी वयाच्या आधी लवकर जाण्यावर होतो. यामुळेच तुमच्या शरीराला आणि बदलत्या हार्मोन्समुळे तुम्हाला जास्त त्रास होतो.
सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना
मेनोपॉज होण्याची कारणे
Shuttestock
रिसर्चनुसार हे सिद्ध झाले आहे की 35 वर्षांवरील महिला या सेक्स करत नाही त्यामुळे त्यांचे शरीर ओव्युलेशनचे बंद करण्याचे संकेत देऊ लागते. ज्यामुळे मेनोपॉज होऊ लागतो. वास्तविक शरीर तुम्हाला एक सिग्नल देत असतो की आता प्रजनन प्रक्रियेसाठी अंड्यांची गरज नाही. त्यामुळे ओव्युलेशन बंद होते आणि मेनोपॉज येऊ लागतो. या अभ्यासात किमान 3 हजार महिलांवर अभ्यास करण्यात आला असून ओव्युलेशन दरम्यान महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळेच साधारण 35 नंतर महिला जास्त प्रमाणात आजारी पडतात ज्या सेक्स करण्याकडे दुर्लक्ष करतात.
तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स
महिलांनी काय करावे
Shutterstock
तुम्हाला जर वाटत नसेल की, मेनोपॉज लवकर यावा तर तुम्ही नेहमी सेक्स्शुअली अॅक्टिव्ह राहणं गरजेचे आहे. तुम्ही जितके अॅक्टिव्ह राहाल तितके तुम्ही मेनोपॉजपासून वाचू शकाल. तुम्हाला जर तुमचे आरोग्य निरोगी हवे असेल तर तुम्ही तुमच्या सेक्स लाईफचा आनंद हा घ्यायलाच हवा. अन्यथा तुम्हाला अनेक शारीरिक त्रासाला सामोरं जावे लागण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा कोणताही आळशीपणा अथवा सुस्तपणा न करता तुम्ही तुमचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी सेक्स करायला हवा. त्यामुळेच तुमचा मेनोपॉज योग्य वयात येऊन तुम्हाला इतर त्रासापासून सुटका मिळू शकेल.
सेक्स करण्याचे नक्की फायदे काय
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा