सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

सेक्स हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. सेक्स लाईफ चांगलं असेल तर एकमेकांबरोबर नातंही अतिशय व्यवस्थित टिकून राहण्यास मदत होते. पण सेक्स करताना नक्की काय करायला हवं अथवा सेक्स करत असताना महिलांना सर्वात पहिले कुठे फिलिंग जाणवतं हे तुम्हाला माहीत आहे का? सेक्स करण्यासाठी आधी सर्वात पहिल्यांदा फोरप्ले करत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्या  जोडीदाराने आपल्याला हात लावल्यानंतर फिलिंग जाणवतं ते स्तनांना अर्थात बुब्सना (Boobes). सेक्स करत असताना स्तनांमध्ये अनेक बदल होत असतात. नक्की हे कोणते बदल असतात. नक्की ते फिलिंग काय असतं? या सगळ्याबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊया. आम्ही इथे बुब्सबद्दल होणारे काही बदल आणि फिलिंग्ज तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हालाही या फिलिंग्ज जाणवतात का हे तुम्ही लेख वाचताना नक्की स्वतःला तुम्हाला हा अनुभव येतो की नाही हे जाणून घ्या. 

1. आकार वाढतो -

Shutterstock

सेक्स दरम्यान शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. हेदेखील खरं आहे की, आपला योनिमार्ग हा इतर दिवसांच्या तुलनेत दुप्पट वाढलेला असतो. पण याचवेळी सर्वात पहिला परिणाम अथवा फिलिंग जाणवतं ते बुब्सना. आपल्या जोडीदाराचा पहिला स्पर्श झाल्यानंतर सेक्स चढायला सुरुवात होते आणि स्तन साधारण 20 टक्क्यांनी वाढतात. अर्थात स्तनांचा आकार हा मोठा होतो. ऑर्गेजमचा सर्वात पहिला परिणाम हा बुब्सवर होतो. तुम्हालाही हे जाणवतं ना? 

2. एरियोलाचाही आकार वाढतो

एरियोला अर्थात तुमच्या निप्पलच्या बाजूला असणारी लहानशी गोलाकार रेषा असते. सेक्स दरम्यान केवळ आपले बुब्स नाहीत तर एरियोलाचा आकारही वाढलेला दिसतो. तुम्हाला सेक्स करताना जेव्हा निप्पल्स ताठ झालेले जाणवतात त्याचं कारणही हेच आहे. एरियोलाचा आकार वाढलेला असल्यामुळे निप्पल्स वर येतात आणि ताठ होतात. 

3. दिसतात अधिक आकर्षक

Shutterstock

सेक्स करताना केवळ स्तनांचा आकार वाढत नाही तर ते अधिक आकर्षक दिसतात. सेक्स करताना स्तनांचा जो आकार वाढतो त्यामुळे ते अधिक आकर्षक दिसातत. त्यामुळे जोडीदारालाही सेक्स करताना मजा येते आणि तुम्हालाही. आकर्षक स्तनांमुळे सेक्सचा आनंद लुटण्याची एक वेगळीच मजा असते. स्तन आकर्षक दिसतात तेव्हा जोडीदाराला अधिक सेक्स चढतो हे तुम्हालाही माहीत असेल. 

4. पहिल्यापेक्षाही अधिक संवेदनशील होतात

सेक्सचं फिलिंग जाणवायला लागल्यावर स्तन हे पहिल्यापेक्षा अधिक संवेदनशील होतात. स्पर्श अधिक जाणवतो आणि स्पर्शातील अर्थही स्तनांना लगेच जाणवायला लागतो. सेक्स चढायला लागल्यानंतर स्तनांना केलेला स्पर्श हा एक वेगळाच अनुभव देतो. यावेळी अंगावर रोमांच उभे राहतात आणि या संवेदनेने स्तन अधिक रोमांचित होतात. 

सेक्स करताना पुरुष पाहतात स्तनांचा आकार? वाचा नेमकं काय वाटतं पुरुषांना

5. निप्पलमध्येही होतं इरेक्शन

खरं तर निप्पल इरेक्शन हे सेक्सशिवायसुद्धा होऊ शकतं. पण सेक्स करताना निप्पल इरेक्शन हे नक्कीच होतं. सेक्स करताना एरियोलाचा आकार वाढतो आणि त्याच कारणाने निप्पलमध्येही इरेक्शन होतं. याचा अनुभव सेक्स करताना प्रत्येक महिलेला होत असतो. 

6. मेंदूला देतो सिग्नल

Shutterstock

सेक्सदरम्यान स्तनांवर येणारा दबाव हा मेंदूला ऑक्सिटोसिन रिलीज करण्याचा सिग्नल पाठवायला सुरुवात करतो. वास्तविक ऑक्सिटोसिन एक स्वरूपाचं हार्मोन असतं ज्याला लव्ह हार्मोन असंही म्हणतात. हे हार्मोन तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील एकांताचे क्षण अधिक रोमांचक बनवण्यास मदत करतात. 

स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती

7. वेगळा सुगंधी वास

होय तुम्ही योग्य वाचलं आहे. सेक्स दरम्यान तुम्हाला येणाऱ्या घामाचा एक वेगळा सुगंध असतो. जो तुमच्या जोडीदारासाठी खास असतो. त्याला त्या सुगंधाची सवय होते. तुम्हाला घाम आला आहे की नाही याची कदाचित कल्पना येत नाही. पण तुमच्या शरीराचा एक सुगंध असतो आणि हा सुगंध स्तनांना अधिक प्रमाणात येत असतो. ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याकडे अधिक आकर्षित होत असतो. 

8. रंग बदलतो

Shutterstock

तुम्हाला सेक्स करताना जर तुमच्या स्तनांच्या बाजूला गुलाबी रंग दिसत असेल तर तुम्ही घाबरू नका. हा तुमच्या शरीरातील अॅस्ट्रोजनच्या मिश्रणामुळे तयार झालेला रंग असतो. सेक्स करताना स्तन अतिशय जास्त प्रमाणात सक्रिय होतात. अशावेळी तुमच्या जोडीदाराचा हलकासा झालेला स्पर्शही जादूप्रमाणे भासतो. त्यावेळी स्तनाच्या आजूबाजूला गुलाबी रंग दिसतो. काही वेळा हा रंग निळाशारही असतो. निळा रंग दिसतो तेव्हा तुमच्या शरीरातील नसा या फुगलेल्या असतात त्यामुळे तसा रंग असतो. स्तनांचा आकार वाढल्याने असा रंग दिसून येतो. 

9. आत्मविश्वास वाढतो

सेक्स दरम्यान स्तनांचा वाढता आकार हा तुमच्यामधील बदल स्वीकारून आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो. तसंच स्तनांमुळे तुमच्या शरीराची आणि चेहऱ्यावरील सौंदर्यता वाढवण्यासही मदत होते. तुम्हाला कधी स्वतःबद्दल काही वेगळं जाणवत असेल अथवा तुम्ही अतिशय लो फील करत असाल तेव्ही तुम्ही असे घालवलेले क्षण आठवा जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळेल. तुमचे स्तन तुम्हाला अधिक आत्मविश्वास नक्कीच मिळवून देतात. 

सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

10. ऑर्गेजम आणि तुमच्यामधील दुवा

तुमचे स्तन हे ऑर्गेजन आणि तुमच्यामधील दुवा ठरतात. कारण निप्पल आणि योनीदरम्यान एक आंतरिक जोड असते. ही जोड तुम्हाला परमोच्च आनंद देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी स्तनांचा अधिक प्रमाणात उपयोग होतो. कारण काही महिलांना स्तनांना केलेला स्पर्श अथवा निप्पल चोखल्याने पटकन सेक्स चढतो आणि सेक्सचा परमोच्च आनंदही त्यातूनच मिळतो. त्यामुळे स्तन हा भाग सेक्स करताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.