ADVERTISEMENT
home / International Travel
दुबईला गेल्यावर मुळीच करू नका ‘या’ गोष्टी

दुबईला गेल्यावर मुळीच करू नका ‘या’ गोष्टी

दुबईला ‘सिटी ऑफ गोल्ड’ या नावाने ओळखलं जातं. पर्यटन, शॉपिंग, बिझनेस, नोकरीनिमित्त देशविदेशातून अनेक लोक या शहरात येतात. मात्र दुबईत जायचं असेल तर तिथले काही कठीण नियम प्रत्येकाला पाळावेच लागतात. म्हणूनच दुबईत असताना जर तुमच्याकडून चुकूनही या काही गोष्टी घडल्या तर तुम्हाला ते नक्कीच महागात पडू शकतं. दुबईतील गुन्हेगारीचा दर शुन्य टक्के आहे. तिथे गेल्यावर काही गोष्टींबाबत कठोर नियम पाळणं गरजेचं आहे. यासाठी दुबईत गेल्यावर कोणत्या गोष्टी जाणिवपूर्वक करू नयेत हे जरूर वाचा.

दुबईत कोणत्या गोष्टी करू नये –

वाहतुकीचे नियम न पाळणे –

जर तुम्ही दुबईमध्ये गेलात तर तुम्हाला वाहतुकीचे नियम पाळायलाच हवे. रस्तावरून वाहने चालवताना आणि चालताना जर तुम्ही नियम पाळले नाहीत तर तुम्हाला कठीण शिक्षा भोगावी लागू शकते. म्हणूनच दुबईमध्ये प्रवास करताना वाहतुकीचे नियम चुकूनही मोडू नका. 

Instagram

ADVERTISEMENT

सार्वजनिक मद्यपान करणे –

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दुबईत एक खूप मोठा गुन्हा मानला जातो. म्हणूनच जर तुम्ही वेकेशनवर असताना ड्रिंक करायचा प्लॅन करत असाल तर सावध राहा. कारण दुबईत तुम्ही ते मुळीच करू शकत नाही. कारण दुबईत रस्त्यावर मद्यपान करणे आणि दारू पिऊन गोंधळ घालण्यावर बंदी आहे. 

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे –

जर तुम्ही दुबईत आहात तर तुम्हाला रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यास मनाई आहे. हातात हात घालून फिरणं, मिठी मारणं, किस करणं अशा गोष्टी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मुळीच नाही करू शकत. असं करताना जर तुम्ही दिसला तर कदाचित तुम्हाला यासाठी शिक्षा भोगावी लागू शकते. 

सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे –

दुबईत असताना  तुम्हाला तुमच्या उच्चार आणि आचार या दोन्ही गोष्टींबाबत सावध राहायला हवं. विशेषतः जेव्हा तुम्ही तिथल्या स्थानिक नागरिकांसोबत बोलत असता तेव्हा तु्म्ही त्यांच्यासोबत नम्रपणेच बोलायला हवं. कारण जर तुम्ही तिथे शिवीगाळ अथवा चुकीच्या पद्धतीने बोलला तर तुम्हाला थेट तुरूंगात जावं लागू शकतं. 

इतरांची परवानगी न घेता फोटो काढणे –

दुबईमध्ये फिरताना तिथलं वातावरण आणि सुंदर सुंदर गोष्टी पाहून तुम्हाला तिथे फोटोसेशन करण्याचा मोह नक्कीच होईल. आजकाल सेल्फी काढण्याचा जमाना आहे. मात्र सेल्फी घेताना तुमच्यासोबत इतर कोणाचाही चेहरा येत नाही आहे याची दक्षता घ्या. कारण दुबईमध्ये इतरांच्या परवानगी शिवाय तुम्ही त्यांचे फोटोसेशन करू शकत नाही.

ADVERTISEMENT

दुबईतील राजघराण्याचा अनादर करणे –

जर तुम्ही पहिल्यांदाच दुबईला जात आहात तर ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही तिथलं राजघराणं, कायदे, राजकारण, स्थानिक लोक यांच्याबद्दल अनादर करून नाही बोलू शकत. कारण हा तिथे खूप मोठा गुन्हा समजला जातो. 

लग्नाआधी एकत्र राहणे –

आजकाल लग्नाआधी एकत्र राहणं अथवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं फारच सामान्य झालं आहे. मात्र जर तुम्ही दुबईत जाणार असाल तर तुम्ही लग्नाआधी एकत्र राहू शकत नाही. शिवाय दुबईत हॉटेलमध्येदेखील अविवाहित मुलामुलींना एकत्र राहण्यासाठी परवानगी मिळत नाही. 

सार्वजनिक नृत्य करणे –

तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका मात्र दुबईत सार्वजनिक ठिकाणी डान्स करण्यास बंदी आहे. तुम्ही परवानाधारक क्लब अथवा घरात नाचू शकता. मात्र सार्वजनिक ठिकाणी तुम्ही डान्स नक्कीच करू शकत नाही. त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी संगीत, नृत्य  अशा गोष्टी तुम्ही दुबईत नाही करू शकत. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

दुबईत या ठिकाणी करा मनसोक्त शॉपिंग

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT