ADVERTISEMENT
home / आरोग्य
acute mountain sickness

उंच प्रदेशात ट्रेकिंगला जाताय, मग हे माहित असायलाच हवे 

सध्या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक लोक थंड प्रदेशात, बर्फाळ प्रदेशात तसेच हिल स्टेशन्सना फिरायला जातात.  अनेक लोक डोंगराळ प्रदेशात ट्रेकिंगसाठी जातात. तसं पाहिलं तर मैदानी प्रदेशाच्या तुलनेत डोंगराळ प्रदेशात प्रवास करणं खूप आव्हानात्मक आहे. विशेषत: ज्यांना जास्त चढाईची सवय नाही त्यांच्यासाठी तर हा अनुभव थोडासा त्रासदायक असू शकतो.उंचावरच्या ठिकाणी जाताना काहींना तीव्र माउंटन सिकनेसची समस्या उद्भवू शकते. अशा समस्या कधी कधी गंभीर स्वरूप धारण करतात. चारधामला जाताना किंवा डोंगरावर गिर्यारोहण करताना काळजी घेतल्यास या समस्या बर्‍याच अंशी टळू शकतात. Acute Mountain Sickness म्हणजे काय आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या. 

ऍक्यूट माउंटन सिकनेस म्हणजे काय?

अल्टिट्यूड सिकनेस, ज्याला तीव्र माउंटन सिकनेस देखील म्हणतात, तेव्हा उद्भवतो जेव्हा तुमचे शरीर कमी-दाब, कमी-ऑक्सिजन असलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास असमर्थ असते. जेव्हा आपण समुद्रसपाटीपासून सुमारे 8,000 फूट उंचीवर किंवा त्याहून अधिक उंचावरच्या ठिकाणी जातो तेव्हा हा त्रास होऊ शकतो. यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर अनेक लक्षणे उद्भवू शकतात जी अत्यंत सौम्य ते जीवघेणी देखील असू शकतात.

Acute Mountain Sickness

ऍक्यूट माउंटन सिकनेसचे कारण काय 

जास्त उंचीवर गेल्यास हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हवेतील दाब वाढतो. जर तुम्ही खूप वेगाने चढत असाल, तर तुमच्या शरीराला जास्त उंचीवर आढळणाऱ्या कमी ऑक्सिजनयुक्त हवेशी जुळवून घेण्यास वेळ मिळणार नाही. अशावेळी तुम्हाला लवकरच थकवा येतो आणि आपण आपोआपच अधिक वेगाने श्वासोच्छवास करू लागतो. ऑक्सीजन कमी पडल्यास चक्कर येणे, डोकेदुखी आणि उलट्या अशी हँगओव्हर सारखी लक्षणे दिसू शकतात.

ऍक्यूट माउंटन सिकनेसची लक्षणे

थकवा, डोकेदुखी, मळमळणे, उल्टी होणे, धाप लागणे, झोपेची समस्या ही ऍक्यूट माउंटन सिकनेसची लक्षणे आहेत. उंचावरच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही तासांत तुम्हाला ही लक्षणे सहसा जाणवतील. तुमचे शरीर उंचीशी जुळवून घेत असताना ही लक्षणे सहसा स्वतःहून निघून जातात. परंतु अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये असे घडते की आपण उच्च उंचीवर पोहोचल्यानंतर शरीर समायोजित करू शकत नाही.आणि ही लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. तुमच्या मेंदू किंवा फुफ्फुसात कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला कोऑर्डिनेशनमध्ये गोंधळ झाल्यासारखा वाटत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो आहे. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तुमच्या फुफ्फुसावर सूज असू शकते.तुमच्या फुफ्फुसात जास्त द्रव जमा होते. आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे.

ADVERTISEMENT
Acute Mountain Sickness

ही समस्या टाळण्यासाठी काय करावे

कमी ऑक्सिजन, कमी तापमान असताना शरीरात पुरेशी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अधिक कॅलरीजची आवश्यकता असते, कारण जितके जास्त उंचावर आपण जातो तितकी आपली ऊर्जा पातळी कमी होते. अशावेळी आपण हाय प्रोटीन आणि पुरेसे फॅट व कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी म्हणजे दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. माउंटन सिकनेस टाळण्यासाठी सुकामेवा हे उपयुक्त अन्न आहे. प्रवासादरम्यान थकवा येऊ नये म्हणून प्रवासाच्या सहा आठवडे आधी आहारात लोहाचे सेवन वाढवावे. दमा असलेल्या रुग्णांनी शक्यतोवर अशा ठिकाणी जाणे टाळावे. ऍलर्जी, थंड हवा, हायपोक्सिया आणि हवेची घनता यासह अनेक पर्यावरणीय घटक दमा, श्वास लागणे किंवा फुफ्फुसाच्या आजाराच्या इतर लक्षणांवर नकारात्मक परिणाम करतात. जर तुम्हाला चढताना दम लागत असेल तर अशा स्थितीत चढणे थांबवा आणि विश्रांती घ्या. जर आराम मिळाला, तरच पुढे हळू हळू चढायला सुरुवात करा. तसेच प्रकृती बिघडल्यास, शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. 

अशा प्रकारे उंचावरील ठिकाणी गेल्यास काळजी घ्यावी.

Photo Credit – shutterstock, istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
06 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT