ADVERTISEMENT
home / केस
tips-to-deal-with-oily-scalp-and-hair-in-marathi

चिकट केसांची समस्या ठरतेय त्रासदायक, तर वापरा सोप्या टिप्स

प्रत्येकासाठी केस किती महत्त्वपूर्ण असतात हे काही वेगळं सांगायला नको. सौंदर्यामध्ये केसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला लुक हा केसांमुळे वेगळा दिसू शकतो. प्रदूषण असो अथवा कोणताही शारीरिक आजार असो त्याचा सर्वात पहिला दुष्परिणाम होतो तो म्हणजे केसांवर. जसजसं वय वाढतं तसतसं केसांच्या समस्या अधिक वाढत जातात. सगळ्यात जास्त खर्च जर सौंदर्याच्या बाबतीत कशावर होत असेल तर केसांवर हे कोणीच नाकारणार नाही. पण यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे, स्काप्लच्या हायजीनची काळजी न घेणं. केसांसह आपल्याला आपल्या त्वचेहीही काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सर्वात जास्त असणारी समस्या म्हणजे चिकट केस (Oily Hair). चिकट केसांची समस्या ही केवळ केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही हानिकारक ठरते. याचा प्रभाव चेहऱ्यासह पाठ, खांदा आणि छातीवरही दिसून येतो. घाणेरडे, तेलकट आणि इन्फेक्टेड स्काल्पमुळे अॅक्ने, मुरूमं, फंगल अॅक्ने अथवा डर्मेटायटिसचे कारण बनू शकतो. तुम्हालादेखील ही समस्या असेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करायला हवा. सर्वात आधी केस कसे धुवावे जाणून घ्या. 

केस धुण्याची पद्धत 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं होऊ शकतं की, शँपू तुमच्या पूर्ण स्काल्पपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे केस धुण्यासाठी शँपू घेताना त्यात तुम्ही पाणी मिक्स करा आणि मग त्याने तुमचे केस धुवा. वास्तविक पाण्यात शँपू मिक्स करण्यामुळे हा थोडा ओलसर आणि पातळ होतो आणि स्काल्पर्यंत अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहचतो. ज्यामुळे केसात साठलेली धूळ आणि घाण निघून जाण्यास मदत मिळते आणि डोकं व्यवस्थित स्वच्छ होते. त्यात घाण साचून राहात नाही. तुम्ही केस धुतल्यावर प्रत्येक वेळी केसातील तेल निघून जाईलच असं नाही. त्यामुळे तुमच्या हाताच्या बोटाने तुम्ही स्काल्प रगडण्याची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा हातावर शँपू घ्या आणि तो हळूहळू रगडा जेणेकरून फेस येईल. त्यानंतर तुमच्या स्काल्पला लावा आणि मग बोटांनी चंपी करा. स्काल्पमध्ये प्रत्येक ठिकाणी असं करा आणि मग स्वच्छ पाण्याने केस धुवा. केसांना नवी चमक येण्यासाठी याचा वापर करा.

या टिप्समुळे होईल तुमच्या चिकट केसांची समस्या दूर 

शँपू लावताना घाई करू नका (Don’t Use Shampoo in Hurry)

शँपू लावताना थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी घ्या. घाईघाईत केसांना शँपू केल्यास केसात तेल तसेच राहते. शँपू लावल्यावर त्याचा परिणाम केसांवर होण्यासाठीही वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा शँपू केसांवर लावाल तेव्हा तो काही मिनिट्स तसाच राहू द्या. किमान 2-3 मिनिट्स शँपू तसाच ठेवणे गरजेचे आहे आणि नंतर पाण्याने केस धुवा. 

योग्य पद्धतीने लावा कंडिशनर (Use Conditioner With Perfect Steps)

बरेचदा असं म्हटलं जातं की, कंडिशनर हे केसांना लावलं जातं मात्र स्काल्पला नाही. मात्र काही लोक स्काल्पलाही कंडिशनर लावण्याची चूक करतात. याशिवाय कंडिशनर लावण्यापूर्वी केस तुम्ही सोडून हातावर कंडिशनर घ्या आणि वरून खाली अशा पद्धतीने लावा.  स्काल्पमध्ये कंडिशनर लावणे हे चिकट केसांच्या समस्येचे कारण ठरते. त्यामुळे कंडिशनर लावताना योग्य काळजी घ्यावी. 

ADVERTISEMENT

किती दिवसाने केस धुवावेत (How Many Times You Can Wash Hair)

काही जण रोज केसांवरून आंघोळ करतात तर काही जण एक दिवस आड केस धुतात. केस चिकट होत असतील तरीही केस रोज धुण्याची गरज नाही. उन्हाळ्यात मात्र याची काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात प्रदूषण, घाम आणि धूळ या कारणांमुळे केस अधिक चिकट आणि तेलकट होतात. त्यामुळे किमान एक दिवस आड केस धुणे योग्य आहे. 

केस चिकट होण्याची समस्या असेल तर या टिप्स तुम्ही नक्की वापरून पाहा आणि आम्हाला तुमचा अनुभव नक्की सांगा. केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

08 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT