ADVERTISEMENT
home / Family
असा आणा सासू-सुनेच्या नात्यात गोडवा, फॉलो करा या सोप्या टिप्स

असा आणा सासू-सुनेच्या नात्यात गोडवा, फॉलो करा या सोप्या टिप्स

सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको असं म्हणतात. सासू सुनेच्या नात्याची विळी भोपळ्याची तुलना केली जाते. कारण सासू सुनेचं कधीच पटत नाही. वास्तविक कोणतंही नातं प्रेम, विश्वास आणि तडजोड करून सांभाळता येऊ शकतं. कठीण असलं तरी या नात्यात गोडवा आणणं अशक्य नक्कीच नाही. तुम्ही दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टी करून सासू सुनेचं नातं बेस्ट करू शकता. जर आईचं मुलावर आणि बायकोचं नवऱ्यावर मनापासून प्रेम असेल तर सासू सुनेच्या नात्यातही आपोआप गोडवा येतो. कारण नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांची असते. यासाठीच जाणून घ्या सासूसोबत नातं चांगलं करण्यासाठी काही सोप्या टिप्स

एकत्र बसून समस्या सोडवा

नात्यामधील दुरावा हा संवाद कमी झाल्यामुळे आणि गैरसमजातून निर्माण होत असतो. यासाठीच नातं कोणतंही असो एकत्र बसून चर्चा करून समस्या सोडवणं नेहमीच चांगलं ठरू शकतं. घरातील कोणत्याही समस्येवर बसून शांतपणे चर्चा करून तोडगा काढता येतो. न बोलण्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज अधिक वाढतील आणि नात्यात दुरावा वाढेल. म्हणूनच सासूसोबत बसून तुमच्या समस्या चर्चा करून सोडवा.

फॅमिली वेकेशनवर जा

दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कामाचा कंटाळा, ताणतणाव सहन करावा लागत असतो. यामध्ये तुमच्या कौटुंबिक समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा घरातील वयस्कर मंडळींना त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही असं वाटत असतं. यासाठी वर्षातून एक फॅमिली पिकनिक मस्ट आहे. जेव्हा तुम्ही एकत्र फिरायला जाता, एकमेकांसोबत गप्पा मारता, नव्या ठिकाणी जाऊन काही क्षण एकत्र घालवता तेव्हा तुम्ही नकळत एकमेकांजवळ येत असता. त्यामुळे फॅमिली पिकनिकमुळे तुमच्या नात्यात जास्त गोडवा निर्माण होतो.

खरेदीचा प्लॅन बनवा 

महिलांचा शॉपिंग हा अतिशय आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे खरेदीसाठी तुमच्या सासूसोबत जा. सासू-सुनेचा छान बॉंड तयार होण्याचा हा एक छान पर्याय आहे. एकमेकांना समजून घेण्याचा, विचारांशी मिळतं जुळतं घेण्यासाठी एकत्र खरेदी करणं नक्कीच फायद्याचं ठरतं. कारण कोणत्याही वयातील स्त्री साडी, दागिने खरेदी करताना एकमेंकींसोबत नेहमीच आनंदी असते, दोघींचे विचार पटकन जुळतात. विशेष म्हणजे या अॅक्टिव्हिटीमुळे तुमच्या नात्यातील बंध आपोआप घट्ट होत जातात. शिवाय सुनेने खास आपल्यासाठी शॉपिंग केल्याचा आनंद निराळाच असतो.

ADVERTISEMENT

योग्य प्रतिसाद द्या

आपल्या जनरेशनला कोणत्याही गोष्टीला पटकन प्रतिक्रिया देण्याची सवय असते. याचा फायदाही आहे आणि काही प्रमाणात तोटेही आहेतच. असं पटकन सडेतोड उत्तर देण्यामुळे जुन्या पिढीपासून आपण दुरावले जातो. मागच्या पिढीसोबत जुळवून घ्यायचं असेल तर पटकन प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक प्रतिसाद द्या. तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तरी ती शांतपणे सासूला समजून सांगा. ज्यामुळे तिला तुमचे म्हणणे जरी पटले नाही तरी ती त्याबद्दल तक्रार करणार नाही.

जास्त विचार करू नका

सासू आणि सून हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळे माहेरी गेल्यावर, जिवलग मैत्रिणीला भेटल्यावर सासूने सुनेबद्दल बंरवाईट बोलण्याचा आणि सुनेने सासूचं गाऱ्हाणं मांडण्याचा कार्यक्रम नक्कीच रंगात येतो. मात्र लक्षात ठेवा यामुळे फक्त इतरांचं मनोरंजन होतं तुमच्या मात्र मनावर यामुळे नकळत ताण येतो. कारण तुम्ही काही झालं तरी तुमचं सासूशी अथवा सुनेशी असलेलं नातं नाही बदलू शकत. तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर याबद्दल जास्त विचार करणं सोडून द्या. जसे आपल्या आईचे विचार कधी कधी आपल्याला पटत नाहीत तसंच सासूचेही पटू शकत नाहीत. सासूने सुनेकडे मुलीप्रमाणे पाहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा हा सोपा मार्ग आहे.

28 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT