ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
tips-to-make-homemade-garam-masala-at-home-for-health-in-marathi

गरम मसाला बनविण्याची घरगुती पद्धत, येईल पदार्थांना अधिक स्वाद

अन्नपदार्थांमध्ये अनेक मसाले वापरले जातात. मात्र गरम मसाला हा अत्यंत कॉमन आहे. पण काही जणांना गरम मसाल्याची भाजी ही पोटाला मानवत नाही. त्यामुळे पोट खराब होणं आणि जंत होणंसारख्या समस्याही होतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि साधारणतः पावसाळ्याच्या हंगामात गरम मसाल्याचे पदार्थ जास्त खाल्ले जात नाहीत. पण चाट खाण्याची मजा तर वरून गरम मसाला घालून खाण्यातच आहे. असं असेल तेव्हा तुम्ही बाहेरच्या गरम मसाल्यापेक्षा घरच्या घरी गरम मसाला तयार करा आणि तो वापरा. कारण घरात बनवलेल्या मसाल्यामुळे तुमच्या शरीराला तितकेसे नुकसान पोहचत नाही आणि घरगुती गरम मसाला तयार करणे सोपेदेखील आहे. 

गरम मसाल्याचा वापर (Use of Garam Masala)

आमटी असो वा शाही पनीर, पुलाव असो वा बिर्याणी, गरम मसाल्यांचा वापर यामध्ये करण्यात येतो आणि यामुळे या पदार्थांचा स्वाद अप्रतिम होतो. पण बाजारात मिळणारे गरम मसाले आजकाल अनेक मिसळयुक्त असे मिळतात. त्यामुळे या गरम मसाल्याच्या स्वादावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होते. कारण या मसाल्यामुळे पोटात दुखणे अशा समस्येला सामोरे जावे लागते अथवा शरीराला अधिक गरम पडण्याची शक्यता असते. पण घरी बनविण्यात आलेला गरम मसाला (Homemade Garam Masala) तुम्ही वापरलात तर त्याचा दुष्परिणाम होत नाही. कारण घरात बनविण्यात आलेल्या मसाल्यामध्ये योग्य प्रमाणात मसाले मिसळ्यात येतात. त्यामुळे जर घरात गरम मसाला बनविता येत असेल तर बाहेरून बनविण्याची काहीच गरज नाही. कशा पद्धतीने गरम मसाला बनवायचा ते आपण जाणून घेऊया. 

गरम मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि बनविण्याची पद्धत 

  • दीड कप जिरे 
  • अर्धा कप धणे 
  • अर्धा कप मोठी वेलची 
  • पाव कप काळी मिरी 
  • पाऊण कप हिरवी वेलची 
  • 7-8 दालचिनीच्या काड्या 
  • पाव कप लवंग
  • 1 कप जायपत्री 
  • 20-25 तेजपत्ता 
  • 2 जायफळ 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवा आणि त्यात वरील सर्व सुके मसाले घाला
  • हे व्यवस्थित भाजून घ्या
  • अत्यंत मंद आचेवर हे सर्व मसाले भाजा जेणेकरून याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या. गॅसची आच जास्त असल्यास, मसाले जळण्याची भीती असते 
  • 5 मिनिट्सनंतर एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्या 
  • थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्या आणि याची पावडर करून घ्या, ज्याला गरम मसाला असं आपण म्हणतो
  • ही पावडर अर्थात गरम मसाला थंड झाल्यावर एका एअर टाईट डब्यात भरून ठेवा

हा गरम मसाला साधारणतः दोन महिने आपल्याला भाजी अथवा अन्य पदार्थांमध्ये वापरता येतो हे लक्षात ठेवा. तुम्ही योग्य प्रमाणात याचा वापर करावा. कोणत्याही पदार्थांमध्ये अति प्रमाणात गरम मसाल्याचा कधीही वापर करू नये. साधारण 4-5 माणसांसाठी अर्धा ते एक चमचा मसाला योग्य ठरतो. चमच्याचा आकार किती आहे त्यानुसार अंदाजाने तुम्ही याचा वापर करावा. गरम मसाला आरोग्याला उष्ण ठरतो. गरम मसाला रोज आहारात वापरू नये. पण बदल म्हणून नक्कीच तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT