घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमीच पैसे वाचवण्याचा आणि साठवण्याचा सल्ला देतात. मात्र आजकालची जीवनशैलीच अशी आहे की आपले शॉपिंगवर खूपच पैसे खर्च होतात. विशेषतः मुलींना शॉपिंगची फार आवड असते. ज्यामुळे त्यांच्या जमा खर्चाचं गणित नेहमीच फसतं. विंडो शॉपिंगच्या नावाखाली फिरत फिरता सहज अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. आणि मग घरी आल्यावर या गोष्टी आता खरेदी केल्या नसत्या तरी चाललं असतं वाटू लागतं. शॉपिंग मॉल आणि दुकानांमधून मिळणारं सेलचं प्रलोभन तुम्हाला सतत शॉपिंगसाठी प्रोत्साहित करत असतं. मात्र खरेदी आणि शॉपिंग कितीही महत्त्वाची असली तरी पैसे साठवणंही तितकंच गरजेचं आहे. कारण गरजेला तुम्हाला हेच पैसे उपयोगी पडतात. सध्या ख्रिसमस आणि न्यु एअरच्या खरेदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे तुमचं खर्चाचं बजेट कधी घसरेल हे सांगणं नक्कीच कठीण आहे. यासाठीच शॉपिंगवेड्या लोकांसाठी खरेदी करताना पैसे वाचवण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स शेअर करत आहोत.
शॉपिंगवर होणारा खर्च वाचवण्यासाठी सोप्या टिप्स –
विनाकारण शॉपिंगवर तुमचे पैसे सतत खर्च होत असतील तर या टिप्स फॉलो करा.
तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड नेहमी घरीच ठेवा –
मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला नक्कीच सांगु शकते की हातात डेबिट आणि क्रेडिट कार्ड असली की पैसे सहज खर्च होतात. शिवाय यामुळे तुम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्तच खरेदी करता. यासाठीच खरेदीला जाताना नेहमी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड घरीच ठेवा. जितकं बजेट ठरलं असेल तितकेच पैसे कॅश स्वरूपात घेऊन खरेदीला जा. म्हणजे तुम्ही अती शॉपिंग करणार नाही.
Shutterstock
सेल आणि प्रमोशन ऑफर्सकडे लक्ष ठेवा –
सेल आणि प्रमोशन ऑफर्समध्ये शॉपिंग करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. कारण अशा ऑफर्समध्ये मिळणाऱ्या डिस्काऊंटमुळे तुमचे पैसे नक्कीच वाचू शकतात. काही ब्रॅंडेड वस्तू आणि मॉलमध्ये काही विशिष्ठ काळात भरघोस डिस्काऊंट देणारे सेल लागतात. अशा वेळी ठरवून शॉपिंग करा. ज्यामुळे तुमचे पैसे नक्कीच वाचतील. शिवाय तुम्हाला मनाप्रमाणे खरेदीदेखील करता येईल.
खरेदीला जाण्याआधी विकत घ्यायच्या वस्तूंची यादी तयार करा –
बऱ्याचदा आपण न ठरवता शॉपिंगला जातो आणि नको असलेल्या अनेक वस्तू विकत घेतो. मात्र जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर असं मुळीच करू नका. जेव्हा तुम्ही खरेदीचं बजेट ठरवता तेव्हा तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी तयार करा. त्या यादीनुसार तितक्याच वस्तू खरेदी करा. ज्यामुळे बिनगरजेच्या आणि खर्च वाढवण्याऱ्या गोष्टी तुम्ही खरेदी करणार नाही.
शॉपिंगसाठी वेगळं बजेट ठेवा –
तुमच्या महिन्याच्या खर्चामध्ये तुमचं ठराविक बजेट फक्त शॉपिंगसाठीच ठेवत जा. जरी तुम्ही एखाद्या महिन्यात शॉपिंग केली नाही तरी ते पैसे एखाद्या वेगळ्या ठिकाणी अथवा पिगी बॅंकेत जमा करून ठेवा. ज्यामुळे शॉपिंगला जाताना तुमच्याकडे व्यवस्थित बजेट नक्कीच असेल. महिन्याच्या इतर खर्चाचे पैसे यामुळे शॉपिंगसाठी खर्च केले जाणार नाहीत.
खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची किंमत एक ते दोन ठिकाणी पाहा –
बऱ्याचदा एकाच प्रकारच्या वस्तूचे निरनिराळ्या मॉल आणि दुकानात निरनिराळी किंमत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत तुमच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर नक्की पाहा. ज्यामुळे तुम्ही कमी पैशात हवी ती वस्तू खरेदी कराल.
Shutterstock
खरेदी करण्यापूर्वी ती गोष्ट तुमच्याकडे आधी नाही याची खात्री करा –
बऱ्याचदा मुलींना कपडे, कॉस्टमेटिक्स आणि मेकअपचं साहित्य सतत घेण्याची सवय असते. कधी कधी शॉपिंग केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की ही गोष्ट तर माझ्याकडे आधीही होतीच. ज्यामुळे एकाच प्रकारच्या दोन वस्तू त्यांच्याकडे जमा होतात. असं होऊ नये यासाठी ती गोष्ट तुमच्याकडे आधी आहे की नाही हे आधीच तपासून घ्या. ज्यामुळे तुमचे पैसे विनाकारण नक्कीच खर्च होणार नाही.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स
तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे
#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे