ADVERTISEMENT
home / Ayurveda
Yoga For Glowing Skin In Marathi

ही योगासनं केलीत तर हमखास मिळेल चमकदार त्वचा (Yoga For Glowing Skin In Marathi)

 

चमकदार त्वचा हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. त्यासाठी अगदी कितीही काळजी घ्यावी लागली तरी तेवढी मेहनत आपण नक्कीच घेतो. ब्युटी प्रोडक्टस, घरगुती फ्रूट फेसपॅक वेगवेळ्या स्किन ट्रिटमेंट्सने तुमची त्वचा सुंदर होत असेल यात काही शंका नाही. पण त्याचा परिणाम हा काही काळासाठीच असतो. त्याचा परिणाम संपला की, त्वचा पूर्ववत तशी होते. पण त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर राहावी असे वाटत असेल तर तुम्ही ‘योगसाधना’ करु शकता. प्रत्येक योगासनं ही वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर असतात. शरीराचा बांधा, वजन कमी करणे, शरीर निरोगी ठेवणे असे त्यांचे काही विशेष आहेत. पण काही योगासनांच्या मदतीने तुमच्या त्वचेला ग्लो मिळतो. अशी योगासनं तसेच प्राणायम तुम्ही तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा वेळ काढून केली तरी तुमची त्वचा ही अधिक चमकदार दिसू लागेल. आता कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला चमकदार त्वचा (Skin Glowing Tips In Marathi) हवी असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेली काही योगासनं नक्की करु शकता. जाणून घेऊया ही योगासनं

त्चचेवर ग्लो आणतील योगासनं (Yoga For Glowing Skin In Marathi)

त्चचेवर ग्लो आणतील योगासनं

Instagram

 

त्वचेवर ग्लो आणणाऱ्या आसनांची माहिती. चेहऱ्यावर ग्लो कसा आणाल येईल ते शिका. ते आसन करण्याचा विधी आणि त्याचे फायदे आता आपण जाणून घेणार आहोत. या आसनांची माहिती मिळाल्यानंतर योग्य पद्धतीने तुम्ही ही आसन करणं फारच गरजेचे आहे. 

हलासन (Halasana)

हलासन (Halasana)

Instagram

ADVERTISEMENT

 

त्वचेवर ग्लो आणणारे पहिले आसन म्हणजे ‘हलासन’ (Plough pose) हे आसन दिसायला जरी कठीण असले तरी एकदा सवयीने हे आसन अगदी सहजपणे करता येते. हलासनासाठी तुमचे शरीर लवचिक असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला हे आसन अगदी पटकन करता येईल. नव्याने योगा सुरु करणाऱ्यांना कदाचित हे आसन पहिल्यांदाच करताना थोडा अडथळा येईल. पण सवयीने तुम्हाला हे आसन अगदी सहज करता येईल.

आसन करण्याचा विधी : (How To Do It):

  • एक योगामॅट घेऊन त्यावर पाठीवर झोपा.
  •  दोन्ही हात कंबरेच्या बाजूला सरळ ठेवून द्या. 
  • आता दोन्ही पाय एकमेकांना चिकटवून वर काटकोनात उचलून घ्या. त्यानंतर तेथून जितकं शक्य असले तितकचे डोक्याच्या मागे पायाचे बोट लागेल इतका ताण द्या. 
  • साधारण 2 ते 5 मिनिटांसाठी तुम्ही या आसनात राहा. आसन सोडण्यासाठी कोणतीही घाई करु नका. हळुहळू पाय पुन्हा एकदा काटकोनात आणा आणि मग खाली जमिनीवर ठेवा.
  • हे आसन करताना तुम्हाला तुमच्या पोटाजवळ नक्कीच ताण जाणवेल.

फायदे (Benefits): 

हलासन हे आसन अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. या आसनामध्ये आपोआपच पोटावर ताण पडतो. पोटावर ताण पडल्यामुळे तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असतो तो दूर होतो. पोट साफ असेल तर त्वचा अर्थातच चमकदार आणि चांगली दिसू लागते. त्वचेसोबतच पोट कमी करण्यासाठीही हलासन हे आसन फारच फायदेशीर आहे. 

ADVERTISEMENT

                                                                                                                        वाचा – Benefits Of Yoga In Marathi

सर्वांगासन (Sarvangasana)

सर्वांगासन (Sarvangasana)

Instagram

 

सर्वांगाचा उपयोग करुन जे आसन केले जाते ते म्हणजे ‘सर्वांगासन’ (Shoulder Stand Pose) हे आसन करण्यासाठी शरीराचे वजन पेलण्याची क्षमता असायला हवी. योग करताना शरीराची नवी ओळख आपल्याला होते. शरीराचा भार आपण कसा पेलू शकतो याचे उत्तम उदाहरण देणार हे आसन आहे. या आसनामुळेही त्वचेला ग्लो मिळतो. हे आसन नेमके कसे करायचे आणि या आसनाचे फायदे काय ते जाणून घेऊया.

Diet Chart For Weight Loss In Marathi

ADVERTISEMENT

आसन करण्याचा विधी : (How To Do It):

  • मॅटवर पाठीवर झोपून घ्या. काटकोनात दोन्ही पाय उचला. पाय अजिबात दुमडू नका.
  • दोन्ही हात कंबरेच्या वरच्या बाजूला पकडा असे करताना हाताची चार बोट पाठीवर आणि अंगठा हा पुढील बाजूस असायला हवा आणि कोपर 90 अंशाच्या कोनात जमिनीवर टेकायला हवे. 
  • आता शरीराचा भार कोपऱ्यावर उचलून खांद्यापर्यंत शरीर उचलायचे आहे. हे आसन करताना अगदी नावाला डोकं हे जमिनीवर राहतं. पण उरलेले सगळे शरीर हे केवळ कोपऱ्यांच्या मदतीने उचलले जाते. 
  • अशा आसनाच्या स्थितीत किमान 2 ते 3 मिनिटं राहा. त्यानंतर हात काढून अंग जमिनीवर टेकवा. पाय हळुवारपणे खाली आणा.

फायदे (Benefits) :

उत्तम रक्तपुरवठा होण्यासाठी हे आसन एकदम उत्तम आहे. सर्वांगासनामध्ये चेहऱ्याच्या दिशेने रक्तपुरवठा होतो. तुमची त्वचा डल झाली असेल किंवा त्वचेवर सुरकुत्या आल्या असतील तर तुमच्या त्वचेचा पोत सुधारुन तुमच्या त्वचेला अधिक सुंदर करण्याचे काम हे आसन करते. 

वाचा – Pranayam Benefits In Marathi

ADVERTISEMENT

मत्स्यासन (Matsyasana)

मत्स्यासन (Matsyasana)

Instagram

 

माशासारखे आसन म्हणजे ‘मस्त्यासन’ (Fish Pose) हे आसन दिसायला फार कठीण असे वाटले तरी रक्तपुरवठा करत शरीराची लवचिकता वाढवण्याचे काम हे आसन करते. मस्त्यासन हे आसन करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे आसन अगदी पहिल्याच प्रयत्नात करता येईल असे नाही. कारण काहींना हे आसन करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. शरीराची लवचिकता आणि व्यायामाची सवय यावर हे आसन करता येईल की नाही हे अवलंबून असते. पण चांगली त्वचा हवी असेल तर हे आसन योग्यपद्धतीने करायला शिका.

आसन करण्याचा विधी : (How To Do It):

  • पाठीवर झोपून घ्या. पायांना पद्मासनाच्या स्थितीत आणा. हाताने पायांची बोट पकडा.
  • आता संपूर्ण शरीर डोक्याच्या मदतीने उचला. डोक्याच्या वरील भागावर हा ताण काही काळ जाणवतो. शिवाय पोटाकडेही हा ताण जाणवतो.
  • आसन साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवा. आसनातून बाहेर येताना हळुहळू मान खाली करा. एकदम झटका देऊ नका. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.
  • पाठ टेकवून मग हात सोडा आणि पायांचे पद्मासन सोडून आराम करा.

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT

मत्स्यासनामध्ये सगळ्या शरीराचे स्ट्रेच खूप चांगल्या पद्धतीने होते. विशेषत: पोटाकडील भाग हा चांगलाच ताणला जातो. त्यामुळे पचनाचे कार्य सुधारते. पिरेड्सच्या दरम्यान येणारा थकवा आणि पोटदुखीदेखील यामुळे कमी होते. मत्स्यासनाच्या नियमित करण्यामुळे त्वचेवर चांगला ग्लो येऊ लागतो. त्वचेच्या अन्य समस्या जसे की, पिंपल्स, पुरळ, पुटकुळ्या यादेखील कालांतराने कमी होण्यास मदत मिळते.

वाचा – Yoga Quotes and status in marathi

त्रिकोणासान (Trikonasana)

त्रिकोणासान (Trikonasana)

Instagram

 

पाहायला गेले तर त्रिकोणासन (Triangle Pose) हे सगळ्यात सोपे आसन वाटते. पण तसे मुळीच नाही. त्रिकोणासन हे हे सोपे असले तरी ते योग्य पद्धतीने केल्यास त्याचे योग्य फायदे आपणास मिळतात. त्रिकोणासन हे हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. पण हे आसन करण्याची एकच पद्धत प्रमाण मानली जाते. योग्य पद्धतीने त्रिकोणासन कसे करायला हवे ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • सगळ्यात आधी ताठ उभे राहा. दोन पायांमध्ये अंतर घ्या. (हे अंतर फारही असायला नको. खांद्यासमान घेतलेले अंतरही यासाठी पुरेसे आहे)
  • ज्या बाजूला वाकणार आहे तो हात कानाशी घेऊन कंबरेतून डाव्या बाजूला आधी त्रिकोणासनात झुकायचे आहे. आणि दुसरा मोकळा हात हा पायांना लावायचा आहे. ही झाली एक पद्धत पण या व्यतिरिक्त तुम्ही ज्या बाजूने वाकणार आहात त्या बाजूकडील हात पायांवर दुसरा हात हवेत सरळ उंच आणि त्याच दिशेने तुम्हाला तुमची मान ठेवायची आहे.
  • असे करताना तुम्हाला हात आणि मान या दोन्हीवर नक्कीच ताण येतो. पण तो सहन करण्यासारखा नसेल आणि तुम्हाला मानेच्या काही व्याधी असतील तर तुम्ही हेआसन एक्सपर्टच्या अध्यक्षतेखाली करा.

फायदे (Benefits) :

त्रिकोणासन या आसनामुळे ह्रदयाचे कार्य सुधारते. ह्रदयाला लागणाऱ्या ऑक्सिजनची अधिक निर्मिती होते. ऑक्सिजन हे त्वचेसाठी फारच गरजेचे असते. हा पुरवठा वाढला की, त्वचा दिवसेंदिवस सुंदर आणि चमकदार दिसू लागते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते. या शिवाय या आसनामुळे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळेही त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

शीर्षासन (Sirsasana)

शीर्षासन

Instagram

ADVERTISEMENT

 

शीर्ष अर्थात डोक्यावर केले जाणारे आसन म्हणजे ‘शीर्षासन’ (Headstand) वर वर पाहता हे आसन सगळ्यांनाच नेहमी कठीण वाटते. पण सवयीने हे आसन अगदी कोणत्याही वयातील व्यक्तिला सहजपणे करता येऊ शकते. हे आसन कठीण आसनांमध्ये असले नित्य करण्यामुळे शीर्षासनाचे शरीराला अनेक फायदे होतात. शीर्षासना करण्याचा विचार करत असाल तर योग्य पद्धतीने त्याची सुरुवात करा. तोल जाईल असे अनेकवेळा या आसन करताना सतत वाटत राहते. त्यामुळे कोणासोबत असतानाच हे आसन करा.

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • आसनासाठी तुम्हाला सुरुवातीला भितींचा भाग लागेल. कारण त्याच्या मदतीने तुम्हाला तुमचा तोल राखता येईल.
  • डोक मॅटवर ठेवून डोक्यावर हाताची एक वाटी तयार करा. आता पायाने शरीर भिंतीवर न्यायचा प्रयत्न करा.
  • सुरुवातीला भिंतीचा आधार घेण्यास काहीच हरकत नाही. सवयीने तुम्ही हे आसन कसल्याही मदतीशिवाय करु शकता.
    आसन सोडताना हळूच पाय खाली आणा आणि वज्रासनात या.
  • या आसनात तुम्ही सुरुवातीला किमान 1मिनिटंभर राहण्याचा प्रयत्न करा.

फायदे (Benefits) :

खाली डोकं वर पायं असं हे आसन असल्यामुळे चेहऱ्याकडे अधिक प्रमाणात याचा रक्तपुरवठा होतो. फारच क्वचित प्रसंगी असा रक्तपुरवठा हा चेहऱ्याला मिळतो. त्यामुळे हे आसन त्वचेला ग्लो मिळण्यास फायदेशीर ठरते.

ADVERTISEMENT

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन ( Bhujangasana)

Instagram

 

भुजंगासन (Cobra Pose) हे आसन स्ट्रेचिंगसाठी फारच चांगले आहे. या आसनामुळे शरीराला ताण मिळतो. पोट आणि पाठीच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी असे आसन आहे. शिवाय या आसनामुळे तुमची चयापचय क्रियाही सुधारते. भुजंगासनात फार मेहनत घ्यावी लागत नाही. पण या आसनामुळे अपेक्षित असलेली त्वचा तुम्हाला नक्कीच मिळते. हे आसन नेमके कसे करावे ते जाणून घेऊया.

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • पोटावर झोपून घ्या. दोन पायांमध्ये थोडेसे अंतर असू द्या.
  • हात छातीकडे ठेवून हातावर दाब देऊन अंग पूर्ण वर उचला.
  • मानेवर ताण जाणवण्यासाठी आकाशाकडे बघा.
  • आसन सोडताना मान खाली करा मग अंग खाली आणा आणि थोडे रिलॅक्स व्हा.

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT

भुजंगासनामुळे शरीलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे शारीरिक थकवा दूर होतो. शिवाय शरीराला अधिक ऑक्सिजन मिळत राहतो. ऑक्सिजनचे प्रमाण शरीरात वाढल्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसू लागते.

वाचा – Kambar Dukhi Sathi Yoga In Marathi

ताडासन (Tadasana)

ताडासन (Tadasana)

Instagram

 

एका जागी स्थिर उभे राहून केले जाणारे आसन म्हणजे ताडासन (Mountain Pose) या आसनामध्ये शरीराला एक वेगळाच ताण मिळतो. शरीराला रिफ्रेश करण्याचे काम ताडासन करते. त्यामुळेच ताडासन हे त्वचेसाठी फारच चांगले ठरते. ताडासन करण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल त्यापद्धतीने तुम्ही हे आसन करु शकता.

ADVERTISEMENT

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • एका जागी ताठ उभे राहा. हात हवेच्या दिशेने उंचवा.
  • टाचांवर उभे राहा. असे करताना तुम्ही हाताची बोटं एकमेंकामध्ये गुंतवून ठेवा.
  • आसन सोडताना टाचांवरुन खाली या. हात खाली घ्या
  • या आसनांमध्ये साधारण 2 मिनिटं राहा.

फायदे (Benefits) :

ताडासन करताना शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळते. श्वसानाचा पॅटर्न बदलल्यामुळे शरीरातून दूषित घटक बाहेर पडते. त्यामुळे तुमची त्वचा ग्लो होण्यास मदत मिळते. ताडासनामुळे त्वचेवर आलेली सूज, डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते.

पवनमुक्तासन (Pawanmuktasana)

पवनमुक्तासन

Instagram

ADVERTISEMENT

 

पोटासंदर्भात असलेले आणखी एक आसन म्हणजे ‘ पवनमुक्तासन’ (wind Relieving pose).या आसनाच्या नावच इतके विनोदी आहे की, याचाआसनाचा अर्थ हा सगळ्यांनाच माहीत आहे. या आसनामुळे पोटाचे विकार कमी होण्यास मदत मिळते. आसनांमध्ये पवनमुक्तासन या आसनाचा अगदी हमखास समावेश असतो. या आसनाचे त्वचेशी निगडीतही फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही हे आसन करायलाच हवे.

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • योगा मॅटवर पाठीवर झोपा. दोन्ही पाय पोटाशी घेऊन ते हाताने धरुन ठेवा.
  • असे करताना तुमचे कुल्हे हे हवेत उचलले जातात. आणि पोटावर ताण पडतो.
    त्यामुळे पोटात असलेला गॅस बाहेर पडतो.
  • या आसनाचे उद्दिष्ट पोटातून वायू बाहेर उत्सर्जित करणेच असते.

फायदे (Benefits) :

पवनमुक्तासनाचे अनेक फायदे आहेत. पाय, मांड्या, नितंब यांचा थुलथुलीतपणा कमी करते. पण महत्वाचे म्हणजे पोटातील गॅस बाहेर काढण्याचा मार्ग उपलब्ध करुन देते. त्यामुळे त्वचेची कांती सुधारण्यास मदत होते. म्हणूनच सगळ्यात शेवटी हे आसन हमखास केले जाते.

ADVERTISEMENT

उष्ट्रासन (Ustrasana)

उष्ट्रासन (Ustrasana)

Instagram

 

उष्ट्रासन (Camel Pose) हे आसन  करणे  सोपे आहे. या आसनामुळे तुमच्या पाठीला चांगलाच ताण मिळतो. पोट आणि पाठीला चांगला ताण मिळतो. शिवाय संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा मिळतो. त्यामुळे हे आसन चेहरा,केस यासाठी चांगले असते. उष्ट्रासन हे आसन करताना तुम्हाला मानेचे आणि पाठीचे विकार असतील तर तुम्ही मुळीच करु नका किंवा तुम्ही हे आसन करताना डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

  • गुडघ्यावर बसून घ्या. दोन्ही हात टाचेला लावण्यासाठी तुम्ही एक शरीलाचा बाक तयार करायचा आहे.
  • मान ही मागच्या बाजूला न्यायची आहे. हे आसन सोडताना तुम्हाला सगळ्यात आधी मान वर करायची आहे. त्यानंतर वज्रासनात यायचे आहे.
  • हे आसन केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल.

फायदे (Benefits):

ADVERTISEMENT

उष्ट्रासन या आसनामुळे तुमच्या त्वचेच्या सेल्सना ऑक्सिजनचा सप्लाय जास्त होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले घटक मिळतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो मिळण्यास मदत मिळते. 

उत्तांसन (Uttanasana)

उत्तांसन ( uttanasana)

Instagram

 

उत्तांसन हे आसन देखील लवचिकतेचे आसन आहे. तुम्हाला हे आसन पटकन जमेल असेल सांगता येत नाही. कारण डोकं गुडघ्याला लागणे फार कठीण असते. उत्तांसनामुळेही त्वचेला चांगला ग्लो येतो. कारण उत्तांसन पहिल्यावेळी करता येत नसेल तर तुम्ही हळुहळू हे आसन योग्यपद्धतीने करा. तुम्हाला नक्कीच योगासनाचे फायदे मिळतील.

आसन करण्याचा विधी : (How To Do It) :

ADVERTISEMENT
  • मॅटवर उभे राहा. दोन्ही हात हवेत उंचावून दोन्ही हात चवड्याच्या दिशेने न्या.
  • तुम्हाला गुडघ्याला डोकं टेकवायचे असेल. तर जोरात खाली यावे लागेल. तरच तुमचे डोकं गुडघ्याला टेकेल.
  • असे करताना तुमच्या पोटाला ताण मिळेल आणि तुमच्या त्वचेला इच्छित रक्तपुरवठा मिळेल.

फायदे (Benefits) :

त्वचेल अधिक ऑक्सिजन देण्याचे काम हे आसन करते. वार्धक्याच्या खूणा शरीरावर वाढवण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात. त्या घटकांना कमी करण्याचे काम करुन त्वचेला अधिकाधिक रक्तपुरवठा करण्याचे  काम हे आसन करते. त्यामुळे तुमची त्वचा ही अधिक चांगली आणि चमकदार होण्यास मदत मिळते. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. योगामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते का?

योगाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच हा एक अत्यंत महत्वाचा असा फायदा आहे. योगामुळे चयापचय क्रिया सुधारते. अर्थात त्यामुळे पोटासंदर्भातील सगळे विकार दूर होण्यास मदत मिळते. सुधारलेली पचनक्रिया आणि शरीराला होणारा योग्य रक्तपुरवठा यामुळे त्वचाच नाही संपूर्ण शरीराला एक चांगला ग्लो येण्यास मदत मिळते. फक्त योगासन तुम्ही योग्यवेळी आणि योग्यपद्धतीने करायला हवीत.

2. फेस योगा हा प्रकार खरंच फायदेशीर आहे का?

वर सांगितलेल्या योगासनांसोबत फेस योगा नावाचा प्रकारही आहे. यामध्ये डोळे, ओठ, गाल यांच्या ठराविक हालचाली केल्या जातात. फेस योगा केल्यामुळे वार्धक्याच्या खुणा कमी होण्यास मदत मिळते. फेसयोगा हा कुठेही बसल्या जागी अगदी सहज पद्धतीने करता येतो. याचा बदल तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर काहीअंशी लगेचच दिसून येतो.

3. घामामुळे त्वचा अधिक चांगली दिसते का?

घाम हा त्वचेसाठी फारच महत्वाचा असतो. घामाच्या माध्यमातून शरीरातील अशुद्धता बाहेर काढण्यास मदत होते. त्वचेवर बारीक बारीक पोअर्स असतात. दिवसभर त्यामध्ये धूळ जात असते. पण जर तुम्ही वर्कआऊट करत असाल किंवा चालत असाल आणि तुम्हाला घाम आला की, तुमची त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. त्वचेसाठी आवश्यक असलेले डिटॉक्स घामाच्या माध्यमातून होते. आता हमखास ट्राय करा ही योगासनं आणि मिळवा सुंदर, चमकदार त्वचा. टॅग करायला विसरु नका तुमच्या अशा मैत्रिणीला जिला आहे या माहितीची गरज.

09 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT