ADVERTISEMENT
home / Care
केस पांढरे का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

केस पांढरे का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

वय कितीही वाढले तरी केस कायम काळेभोर आणि सुंदर राहावे असे सगळ्यांनाच वाटते. कारण केस सुंदर असले की, सगळ्यांचे लक्ष सुंदर केसांकडेच जाते. पण काही कारणामुळे केसांच्या तक्रारी फार कमी वयातच लोकांना जाणवू लागतात. केस कोरडे होणे, रुक्ष होणे आणि केसांना फाटे फुटणे या केसांच्या तक्रारी दूर होऊ शकतात. पण केस पांढरे होणे ही केसांची तक्रार डोक्याला फारच तापदायक असते. केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. पण केस पांढरे होण्यामागे खरी वैज्ञानिक कारणे आणि अफवा कोणत्या ते जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया केस पांढरे होण्याची वैज्ञानिक कारणे

वयाआधीच केस पांढरे होत असतील तर जीवनशैलीत करा वेळीच बदल

केस पांढरे होण्याची वैज्ञानिक कारणे

केस पांढरे होण्याची वैज्ञानिक कारणे

Instagram

ADVERTISEMENT

केस पांढरे होण्याची कितीही कारणे तुम्ही याआधी जाणून घेतली असली तरी त्याला वैज्ञानिक आधारांची जोड असणे आवश्यक असते. केस पांढरे होण्यामागे असलेली वैज्ञानिक कारणं जाणून घेऊया.

  •  केस पांढरे होण्यामागे पहिले वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकपणा. जर तुमच्या घरी एखाद्याचे केस खूप लवकर वयात पांढरे झाले असतील तर साधारण त्या काळात तुमचे केसही पांढरे होण्याची शक्यता असते.
  • ब्रिटीश संशोधनानुसार अवेळी केस पांढरे होण्यामागे तणाव हे देखील कारण आहे. आता तणाव तुमच्या केसांना पांढरे करु शकते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ताणतणाव तुमचे आरोग्य बिघडवते. त्यामुळे तुमच्या केसांची मूळ नाजूक होतात आणि त्यामुळे केस पांढरे होतात.
  • केस पांढरे होण्यामागे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मेलनिन अर्थात रंगद्रव्य. मेलनिन तुमच्या त्वचेला आणि केसांना रंग देण्याचे काम करते. मेलनिन ज्यावेळी नव्या पेशी निर्माण करण्याचे काम बंद करते अशावेळी केस पांढरे होतात.
  •  केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या रंगासाठी व्हिटॅमिन B हे फार महत्वाचे असते. व्हिटॅमिन B शरीरात मुबलक प्रमाणात असेल तर मग मेलनिनची निर्मिती करण्यास अजिबात अडथळा येत नाही. जर तुमच्या आहारात त्याची कमी झाली तर तुमचे केस पांढरे होतात.
  • अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असणाऱ्यांनाही अकाळी केस पांढरे होण्याचा त्रास असतो. शरीरात रक्त कमी असल्यामुळे रक्ताचा पुरवठा केसांना होऊ शकत नाही. त्यामुळेही केस पांढरे होतात.
  • मधुमेह असेल तर अशा व्यक्तिंचेही केस लवकर पांढरे होतात. त्यांच्या  शरीरातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळेही केस पांढरे होऊ शकतात.
  • मद्यपान, धुम्रपान,ड्रग्ज  करणाऱ्यामुळेही शरीरातील अनेक अवयवात बदल होत असतात.  त्यामुळेही केस पांढरे होतात.

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

अशी घ्या काळजी

केस लवकर पांढरे व्हावे असे वाटत नसतील तर तुम्ही काही गोष्टींची योग्य वेळी काळजी घ्यायला हवी. केसांची निगा राखताना तुम्ही केसांसाठी आवश्यक असा आहार घेत आहात की, नाही याची काळजी घ्यायला ही विसरु नका. तर तुमच्या आहारात योग्य व्हिटॅमिन्सचा समावेश असायला हवा.

केस पांढरे होण्यामागे ही काही वैज्ञानिक कारणे आहेत. जर तुम्ही या वैज्ञानिक कारणांशी काही छेडछाड करत असाल तर तुमचे केस पांढरे होऊ शकतात.

ADVERTISEMENT

केस गळतीवर वेळीच करा उपचार

04 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT