विराट-अनुष्का (#Virushka) ‘ह्या’ खास जागी साजरा करणार लग्नाचा वाढदिवस

विराट-अनुष्का (#Virushka) ‘ह्या’ खास जागी साजरा करणार लग्नाचा वाढदिवस

एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही ना. अगदी काल झाल्यासारखं वाटतंय ना आपला आवडता विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) याचं लग्न. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला (Virat-Anushka 1st wedding anniversary) विराट-अनुष्काने खास प्लॅन ही केलाय. हे जोडपं मस्त सुट्टी घेऊन जाणार आहे एका खास जागी. खास तर असणारच कारण लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना. विरूष्काने या वर्षभरात सगळे सण अगदी छान साजरे केले.


43148584 347193055845028 4886947305065643871 n


करवाचौथ असो वा पहिली दिवाळी हे लव्हबर्डस एकमेकांबरोबरचा प्रत्येक क्षण मस्त एन्जॉय करत आहेत. मग लग्नाचा वाढदिवस त्याला अपवाद कसा असेल. 


36756808 2069834993090952 3217137294494400512 n
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ह्याचं लग्न मागच्या वर्षी 11 डिसेंबरला झालं होतं. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघंही जाणार आहेत ऑस्टेलियाला. ऑस्ट्रेलिया निवडायचं कारण म्हणजे विराट कोहली हा टीम इंडीयाच्या ऑस्ट्रेलिया सीरीजमुळे सध्या तिकडेच आहे.तर अनुष्काही आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तिकडे जाणार आहे आणि मग हे लव्हबर्डस आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. अनुष्का ही सध्या तिच्या शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif )बरोबरच्या आगामी झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण प्रमोशनमधून थोडे दिवस वेळ काढून ती ऑस्टेलियाला जाणार आहे.


25016979 198615144019475 7844215848645427200 n


सूत्रानुसार, अनुष्काने काही महिनेआधीच ही सुट्टी प्लॅन केली होती. झिरो (Zero) च्या टीमलाही माहीत होतं की, डिसेंबरमध्ये अनुष्का लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर जाऊ शकते. टीम इंडिया जेव्हा अॉस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच खेळेल तेव्हा अनुष्का विराटला चीअर करण्यासाठी तिथे असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिली टेस्ट 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर चालणार आहे. त्यानंतर पुढची मॅच 14 डिसेंबरला असेल. त्यामुळे विराटकडे ही वेळ असेल. तेव्हा दोघंही 11 डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतील.  अनुष्का लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून झाल्यावर अनुष्का परत येऊन झिरो चित्रपटाचं प्रमोशन करेल.


24839114 1986400394962403 6613529236680474624 n


या लव्हबर्डसचं लग्न मागच्या वर्षी इटलीतील टस्कनीमध्ये खासगी आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं होतं. लग्नामध्ये अगदी पारंपारिक पध्दतीने दोघंही छान तयार झाले होते. लग्नात नेहमी वापरल्या जाणाऱ्या रंगांपेक्षा वेगळे रंग दोघांनी सजावटीसाठी आणि कपडयांसाठी निवडले होते. नंतर या दोघांनी दिल्ली आणि मुंबई येथे शानदार रिसेप्शन दिली होती. ज्याला क्रिकेट आणि बॉलीवूड जगतातील सेलिब्रिटीजनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या दोन्ही रिसेप्शन लुकची खूप चर्चा झाली होती. लग्नानंतर हे लव्हबर्डस एकमेंकासोबत वेळ घालवण्यासाठी खास इंग्लंड टूरवरही गेले होते. त्यावेळीही टीम इंडिया इंग्लंड टूरवर होती. तेव्हा दोघांना लंडनमध्ये एकत्र बघण्यात आलं होतं आणि सोशल मीडीयावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.


27578527 146651216139953 6127659781420220416 n


सुई-धागाच्या यशानंतर अनुष्का शर्मा सध्या शाहरूखबरोबरच्या झिरो मध्ये व्यस्त आहे. जब तक है जान ह्या चित्रपटानंतर दुसऱ्यांदा ती शाहरूख आणि कतरिनासोबत दिसणार आहे.  तर दुसरीकडे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडियासुद्धा मस्त खेळतेय.


फोटो सौजन्य : Instagram