ADVERTISEMENT
home / फॅशन
या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने (Saree Draping Styles In Marathi)

या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने (Saree Draping Styles In Marathi)

तुमच्या मैत्रिणीचं लग्न जर अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं असेल आणि तुम्ही साडी नेसायचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सध्या तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसू शकता. साडी ही आता केवळ पारंपरिक न राहता फ्युजन प्रकारातही मोडते. याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आणि लुक्स आहेत आणि बॉलीवूड सेलिब्रिटीजदेखील सध्या वेगवेगळ्य स्टाईल्सने साडी नेसून समोर येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण, सोनम कपूर, उर्वशी रौतेला, तमन्ना आणि क्रिती सनॉनसह अशा अनेक अभिनेत्री ज्या या नव्या साडीचा ट्रेंड फॉलो करत आहेत. असं असताना आपण तरी कशाला मागे राहायचं नाही का? या लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या साडीलाही फ्यूजन लुक द्या आणि आपल्या स्वतःच्या घरचे सेलिब्रिटी बना.

साडी ड्रॅपिंगच्या प्रत्येक शैलीला माहित असणे आवश्यक आहे (Different Saree Style)

प्लाझो साडी (Plazo Saree)

Plazo Sari
कदाचित आपलं आयुष्य कधीच परफेक्ट नाही असू शकत पण साडी…ती तर नक्कीच परफेक्ट असू शकते…अशा कॅप्शनसह सोनम कपूर आणि रिया कपूरने प्लाझो साडी नेसून आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. या साडीला ‘मिठाई प्लाझो साडी’ असं नाव देण्यात आलं असून दोन्ही कपूर सिस्टर्सने ब्लाऊजच्या जागी ‘मोतीचूर क्रॉप टॉप’ घातला आहे. त्यासह साडीवर त्यांनी सँडलच्या जागी पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. तुम्हाला हवं असेल तर प्लाझो साडीसह तुम्ही सँडलदेखील वापरू शकता.

वाचा – साडी नेसताना या ’14’ चुका टाळा

साडी गाऊन (Saree Gown)

Saari Deepika
तुम्ही कधी साडी आणि गाऊन एकत्र घालण्याबद्दल विचार तरी केला आहे का? कदाचित नसेलच.  पण दीपिका पादुकोणची ही साडी जरा नीट बघा. डिझाईनर अनामिका खन्नाच्या या साडी गाऊनला दीपिकाने अतिशय सुंदर तऱ्हेने कॅरी केलं आहे. एखाद्या परीकथेप्रमाणे पांढऱ्या रंगाची ही साडी दिसायला अतिशय स्टायलिश दिसते.

ADVERTISEMENT

वाचा – Blouse Back Designs In Marathi

ऑनिक्स पँट साडी (Onix Pant Saree)

Urvashi Saari

Also Read Mistakes To Avoid While Draping A Saree In Marathi

हा साडी ट्रेंड अतिशय युनिक ट्रेंड आहे. उर्वशी रौतेलाने या साडीमध्ये पेटीकोटऐवजी टाईट पँट घातली आहे आणि प्लेट्सदेखील अतिशय आकर्षकरित्या काढल्या आहेत जे तिने घातलेल्या पँटला योग्य तऱ्हेने मॅच होत आहे. या काळ्या रंगाच्या साडीवर उर्वशीने सिल्व्हर रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. तुम्ही तुमच्या नेहमीच्या पारंपरिक साडीमध्ये कंटाळून गेला असाल तर, या लग्नाच्या हंगामात तुम्ही हा नवा लुक नक्की करून पाहू शकता.

ADVERTISEMENT

पँट साडी (Pant Saree)

Saari Tamanna
रंगबेरंगी अर्थात मल्टीकलरमधील ही पँट साडी खूपच स्टायलिश आहे. तमन्नाने याला वेगळा लुक देण्यासाठी कमरेवर गुलाबी रंगाचा बेल्टही लावला आहे. तसंच खांद्यावर एक स्कार्फदेखील घातला आहे. पँट साडीमध्ये तमन्नाचा हा ओव्हरऑल लुक एकदम वेगळाच अनुभव देतो. तुम्हाला जर स्कार्फ घ्यायला आवडत नसेल, तर घेऊ नका. साडीचे ड्रेसही करू शकता. स्कार्फशिवायदेखील या साडीचा लुक नक्कीच चांगला आणि स्टायलिश दिसतो.

Also Read : साडीचे प्रकार

फ्रिंज्ड पँट साड़ी (Fridge Pant Saree)

Kriti Saari
‘साडी विथ ए ट्विस्ट…’ क्रिती सनॉनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कंटेम्प्रररी इंडियन लुकिंग साडीला हीच कॅप्शन दिली आहे. या साडीमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी क्रितीने फ्रिंज्ड पँट घातली आहे, ज्यामध्ये विविध लेअर्स आहेत. या काळ्या आणि लाल रंगाच्या साडीला अधिक वेगळं बनवण्यासाठी त्यामध्ये बोल्ड प्रिटिंगही करण्यात आली आहे. तुम्हीसुद्धा घरात लग्न असल्यास, अशा प्रकारची स्टाईल करून पाहू शकता. विश्वास ठेवा, साडी नेसण्याची ही बोल्ड पद्धत लग्नाच्या कार्यक्रमात तुम्हाला नक्कीच वेगळा लुक मिळवून देईल.

फोटो सौजन्य – instagram

ADVERTISEMENT
18 Dec 2018
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT