‘मणिकर्णिका’ची घोडदौड बॉक्स ऑफिसवर सुरू

‘मणिकर्णिका’ची घोडदौड बॉक्स ऑफिसवर सुरू

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. कंगनाच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाचे चांगलेच गिफ्ट मिळाले आहे असे म्हणावे लागेल. कंगनाचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत असून बॉक्स ऑफिसवरदेखील पहिल्याच दिवशी या चित्रपटाने यश मिळवले आहे. आतापर्यंत राणी लक्ष्मीबाईची कथा ही लहान पडद्यावर आली होती. पण आता मोठ्या पडद्यावरही दमदार अभिनयासह हा चित्रपट कंगनाने आणला आहे. पहिल्या दिवशीच मणिकर्णिकाने 8 कोटीची दणदणीत कमाई केली तर विकेंडनंतर आता तीन दिवसांची कमाई  53 कोटींच्या वर गेली आहे. कंगनाने पुन्हा एकदा आपणच बॉलीवूडची क्वीन असल्याचं सिद्ध केलं आहे. कोणत्याही अभिनेत्याशिवाय पुन्हा एकदा कंगनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. याआधीदेखील कंगनाने एकहाती ‘क्वीन’मधून दमदार अभिनय करत बॉलीवूडवर साम्राज्य गाजवलं होतं.

विकेंडची कमाई 53 कोटी


चित्रपट समीक्षक तरण आदर्शनुसार कंगनाच्या मणिकर्णिकाने चांगलाच गल्ला जमवायला सुरुवात केली आणि त्याने ट्विट केल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी साधारण आठ कोटीच्या पुढे या चित्रपटाने कमाई केली. ओपनिंगच्या दिवशीच मणिकर्णिने बॉक्स ऑफिसवर ८.७५ रोची रूपये कमावले. 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' २५ जानेवारीला बऱ्याच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला असून  तीन भाषांमध्ये हा चित्रपट आला आहे. या चित्रपटामध्ये कंगना राणौतशिवाय पहिल्यांदाच अंकिता लोखंडेदेखील आहे. अंकिताचा हा पहिलाच बॉलीवूडमधील चित्रपट असून अंकिताने झलकारीबाईची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. समीक्षकांकडून अंकिता आणि कंगना दोघांचंही काम चांगलं झाल्याचा प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडत आहे. शिवाय अतुल कुलकर्णी, जिशु सेनगुप्ता,सुरेश ओबेरॉय, डॅनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


कंगना चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शकही


कंगनाने याआधीदेखील कट्टी बट्टी या चित्रपटामध्ये दिग्दर्शन केलं होतं. मात्र या चित्रपटाचं केवळ दिग्दर्शनच नाही तर कंगना निर्मातीदेखील आहे. अगदी भव्यदिव्य असा चित्रपट यावेळी कंगनाने बनवला असून राणी लक्ष्मीबाईची भूमिकाही तिनेच साकारली आहे. कंगनाने पहिल्यांदी ऐतिहासिक चित्रपट केला असून तिने कामही पहिल्यांदाच केलं आहे. राणी लक्ष्मीबाईची भूमिका कंगनाने उत्कृष्ट साकारली असून प्रेक्षकांनाही तिचं काम आवडत आहे. 


manikarnika


हिंदीव्यतिरिक्त दोन भाषांमध्ये प्रदर्शित


कृष्ण, जगररलामुडी आणि कंगना राणौत यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तीन भाषांमध्ये अर्थात हिंदी, तेलुगू आणि तामिळमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढाईत सर्वात पहिले नाव घेतले जाते ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे. याच झाशीच्या राणीच्या स्वातंत्राच्या लढाईची ही गाथा या चित्रपटामधून मांडण्यात आली आहे. आता पुढच्या आठवड्यातही मणिकर्णिकाची घोडदौड अशीच सुरु राहणार का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम


हेदेखील वाचा 


‘भारत’चं टीझर प्रदर्शित, यावर्षी देशभक्तीपर चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी


सिद्धार्थ - मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा


आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा