शरीरावरील नको असणारे केस कोणालाही आवडत नाहीत. विशेषतः स्त्रियांना सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिन्याला हे केस अंगावरून काढून टाकावेच लागतात. शरीरावरील नको असलेले हे केस हटवण्यासाठी बरेच उपाय असतात – वॅक्सिंग, शेव्हिंग, रेझर किंवा हेअर रिमूव्हल क्रीम. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुमच्या त्वचेसाठी तुम्ही नक्की कोणता पर्याय निवडता. बाकी शरीराच्या भागांपेक्षा अंडरआर्म्सची स्वच्छता ठेवणं खूपच गरजेचं असतं. अंडरआर्म्सची त्वचा ही अतिशय नाजूक असते आणि या ठिकाणी केसही जास्त प्रमाणात येत असतात. त्यामुळेच हे केस वेळोवेळी काढून टाकणं गरजेचं आहे. नाहीतर हे दिसायला अतिशय वाईट दिसतं. तुम्हाला जर उन्हाळ्याच्या दिवसात स्लिव्हलेस कपडे घालायचे असतील तर तुम्हाला नेहमीच तुमची काख अर्थात अंडरआर्म्स स्वच्छ ठेवायला हवेत. आजकाल तर मुलंदेखील आपल्या अंडरआर्म्समधील केस काढून टाकायला लागले आहेत. वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसात अति घामाने हे केस टोचतात शिवाय शरीराला घामाचा वासही येतो. त्यामुळे हल्ली मुलंही अंडरआर्म्स करतात. आम्ही तुम्हाला काही अशा युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी अंडरआर्म्स स्वच्छ करू शकता.
अंडरआर्म वॅक्सिंगचे फायदे (Benefits of Underarms Waxing)
तसं तर तुम्ही शेव्हिंग, रेझर अथवा हेअर रिमूव्हल क्रीमद्वारे अंडरआर्म्स करून तुमचे केस काढून टाकू शकता. मात्र या सगळयामधून उत्कृष्ट नक्की काय हे जाणून घ्यायची वेळ येते तेव्हा सर्वात चांगला पर्याय असतो तो म्हणजे वॅक्सिंग. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अंडरआर्म्स करत असताना क्रीम लावणं अथवा शेव्ह करण्यापेक्षा वॅक्सिंग हा उत्कृष्ट पर्याय आहे. कारण वॅक्स केल्यामुळे अंडरआर्म्स काळे पडत नाहीत. वॅक्सिंगने काखेखालचे सर्व केस निघण्यास मदत होते. वॅक्सिंग करत असताना तुम्हाला काही सेकंदासाठी त्रास सहन नक्कीच करावा लागतो मात्र हे केस अगदी मुळासकट निघतात आणि लवकर परत येत नाहीत. शिवाय वॅक्सिंग केल्यामुळे अंडरआर्मच्या ठिकाणी आलेला काळेपणादेखील निघून जातो आणि तुमची त्वचा साफ दिसू लागते. बाजारामध्ये रेग्युलर, चॉकलेट, रिका, अॅलोव्हेरा इत्यादी बरेच वॅक्सिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे निवडू शकता. पण त्याआधी कोणतं वॅक्स कसं फायदेशीर आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.
काखेतील घामाची दुर्गंधी काढण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Underarm Smell In Marathi)
रेग्युलर वॅक्स
लिंबू आणि साखरेच्या मिश्रणाने तयार होणारं हे वॅक्स कितीतरी वर्षांपासून प्रचलित आहे. या वॅक्समुळे केस मुळापासून तर निघतात मात्र या वॅक्सिंगमध्ये जास्त त्रास होतो. हे वॅक्स केल्यानंतर तुमच्या त्वचेवर लाल रॅशेस आणि पुळ्या येण्याचीही शक्यता असते. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, हे वॅक्स केल्यानंतर दोन ते तीन दिवस तुम्हाला आफ्टर इफेक्ट्स जाणवत राहतात. रेग्युलर वॅक्स हे पातळ आणि लहान केस अगदी सहजरित्या साफ करू शकत नाहीत. त्यामुळे सतत तुमच्या केस असलेल्या भागामध्ये हे वॅक्स लावावं लागतं. कारण एकाच वेळी योग्य परिणाम या वॅक्समधून मिळत नाही.
चॉकलेट वॅक्स
चॉकलेट वॅक्स हे कोको, सोयाबीन तेल, बदाम तेल, ग्लिसरीन, ऑलिव्ह ऑईल आणि विटामिन्ससारख्या तत्त्वांच्या मिश्रणाने तयार करण्यात येतं. आजकाल याची जास्त चलती आहे. शरीराच्या नाजूक त्वचेवर याचा वापर करण्यात येतो. शिवाय याचा वापर केल्यानंतर तुमच्या त्वचेवर अजिबात जळजळ अथवा लाल रॅशेस येत नाहीत. शिवाय लहान आणि कमी ग्रोथ होणाऱ्या केसांना हटवण्यासाठीही या वॅक्सची मदत होते. या वॅक्समुळे सनटॅनही निघून जातं. यामध्ये असलेल्या तेलाच्या मात्रेमुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी उपयोगी ठरतं. याशिवाय हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. अगदी तुमची त्वचा संवेदनशील असली तरीही याचा उपयोग करता येऊ शकतो. हा मात्र रेग्युलर वॅक्सपेक्षा चॉकलेट वॅक्स हे थोडं महाग असतं. त्यामुळे चॉकलेट वॅक्स करण्यापूर्वी तुम्ही तुमचं बजेट किती आहे याचा अंदाज पहिले नक्की घ्या.
रिका वॅक्स
रिका वॅक्सला व्हाईट चॉकलेट वॅक्स असंही म्हटलं जातं. हे मेड इन इटली वॅक्स भाज्यांचं तेल आणि हिरव्या पानांपासून बनवलं जातं. तारपिन हा एक चिकट पदार्थ असतो जो पाईन आणि स्प्रूस या झाडांपासून तयार होतो. साधारणतः वॅक्समध्ये हा पदार्थ असतो. यामुळे बऱ्याच जणांना अॅलर्जीचा आणि लाल चट्ट्यांचा त्रास होऊ शकतो. पण रिका वॅक्समध्ये हा पदार्थ अजिबात नसतो. हे वॅक्स रेग्युलर वॅक्सप्रमाणे जास्त गरम करावं लागत नाही. त्यामुळे त्वचेवर याचा परिणाम तितकासा वाईट होत नाही. शिवाय याबरोबरच त्वचा स्वच्छ करण्यासाठी एक प्रीवॅक्स जेलदेखील मिळते, जी त्वचेच्या आतपर्यंत जाण्यासाठी मदत करते. हे वॅक्सदेखील सर्व तऱ्हेच्या त्वचेसाठी सूटेबल आहे. जास्त संवेदनशील त्वचेवरही हे वापरण्यासाठी काहीच अडचण येत नाही. रिका वॅक्स त्वचेला अधिक चमकदार आणि मुलायम बनवतं. हे रेग्युलर वॅक्सपेक्षा अधिक किमतीचं असून हे वॅक्स इटलीवरून आयात करण्यात येतं.
वाचा – चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
घरी वॅक्स कसं बनवायचं (How to make wax at home)
1. एका पॅनमध्ये दोन कप साखर, 1/4 कप पाणी, 1/4 कप मध आणि 1/4 कप ताज्या लिंबाचा रस घ्यावा. आता पॅन गॅसवर ठेऊन अगदी लहान आचेवर हे सर्व उकळवावे. त्यानंतर साधारण अर्धा तास तरी हे उकळत ठेवावं. अर्ध्या तायानंतर हे मिश्रण साधारण घाऱ्या रंगाचं झाल्याचं दिसतं. त्यानंतर पॅन उतरवून हे मिश्रण थंड करायला ठेवा. तुमचं वॅक्स तयार आहे.
2. पाव भाग ऊसाचा रस घेऊन त्यामध्ये साधारण दोन भाग लिंबाचा रस मिसळावा. त्यानंतर त्यामध्ये मध आणि कॉर्नफ्लोअर मिसळून काखेत लावून लक्ष देऊन स्ट्रिपच्या सहाय्याने वॅक्सिंग करावं.
वॅक्सिंगची प्रक्रिया (Waxing Procedure)
आपल्यासाठी वॅक्स निवडल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी कोणत्या प्रकारचं वॅक्सिंग करता येऊ शकतं हे माहीत असणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला वॅक्सिंग करण्याच्या काही प्रक्रिया इथे सांगणार आहोत.
1. सर्वात पहिले तुम्ही तुमचे अंडरआर्म्स धुऊन कॉटनचं कापड वा टॉवलच्या मदतीने संपूर्ण सुकवून घ्या. जेणेकरून तुमच्या काखेमध्ये अजिबात घाम राहता कामा नये.
2. आता तुमच्या अंडरआर्मवर तुम्ही पावडरचा उपयोग करावा. आम्ही तुम्हाला इथे बेबी पावडर वापरण्याचा सल्ला नक्कीच देऊ कारण अंडरआर्म्सच्या ठिकाणची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. शिवाय शरीराच्या इतर भागांपेक्षा ही त्वचा जास्त संवेदनशील असते. तसंच पावडर लावल्यामुळे अंडरआर्म्समध्ये अतिरिक्त तेल जमा झालेलं असल्यास, काढून टाकण्यास मदत होते.
वाचा – म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय
3. आता धार नसलेल्या चाकूने किंवा चमच्याचा मागच्या भागाच्या मदतीने हे वॅक्स अंडरआर्म्सवर लावा. लक्षात ठेवा की, वॅक्स केसांच्या वाढीच्या दिशेने लावा, त्याच्या विरुद्ध बाजूने लावू नका.
4. आता यावर वॅक्स स्ट्रीप लाऊन नीट त्यावर चिकटवा आणि मग हाताने ती स्ट्रीप चोळून घ्या.
5. आता केसवाढीच्या विरुद्ध दिशेने वॅक्स स्ट्रीप एका झटक्यात खेचून काढा. यावेळी त्वचा अतिशय घट्ट पकडून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्वचेवर कोणतीही सुरकुती पडता कामा नये. याशिवाय स्ट्रीपदेखील अतिशय झटक्यात खेचून काढावी लागते. तुम्ही ही स्ट्रीप जोरात खेचली नाही तर वॅक्सबरोबर सर्व केस नीट निघणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागेल.
6- आता अंडरआर्म्स एखाद्या ओळ्या कपड्याने अथवा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि त्यावर मॉईस्चरायझर अथवा नारळाचं तेल लावा.
शेव्ह करून कसे हटवावे केस (How to clean Underarms hair with shave)
असं बऱ्याचदा होतं की, एखादा प्लॅन होतो पण त्यावेळी वॅक्सिंग करायला जाण्याइतका वेळ नसतो आणि घाईघाईत आपल्याला शेव्ह करावं लागतं. तसं तर अंडरआर्म्स शेव्ह करण्यासाठी फारच कमी वेळा सल्ला दिला जातो. कारण यामुळे अंडरआर्म्सची त्वचा ही यामुळे काळी पडायला लागते. मात्र जेव्हा वॅक्सिंग करण्याचा वेळ नसतो, तेव्हा अशा वेळी कोणालाही याचा विचार करत बसायला वेळ नसतो. त्यामुळे माध्यम कोणतंही असो तेव्हा फक्त अंडरआर्म्सचे केस हटवणं इतकंच महत्त्वाचं असतं.
त्यासाठीच आम्ही तुम्हाला अंडरआर्म्स शेव्हिंग करण्यासाठी काही विशिष्ट स्टेप्स कराव्या लागतात. याच्या मदतीने तुम्ही अंडरआर्म्सच्या त्वचेला नुकसान न पोहचवता शेव्ह करू शकता.
कोरड्या त्वचेवर शेव्हिंग करू नका
अंडरआर्म्स शेव्हिंग हे कधीही कोरड्या त्वचेवर करू नये, कारण त्यामुळे त्वचा फाटण्याचे आणि त्रास होण्याचा चान्स जास्त असतो. वास्तविक कोरड्या त्वचेवर शेव्हिंग केल्यामुळे आणि रेझरच्या ब्लेड्सने केस पटकन निघत नाहीत. त्यामुळे ब्लेड जास्त प्रमाणात त्वचेवर घासावं लागतं. त्यामुळे तुम्ही यावेळी शेव्हिंग जेल अथवा क्रीमची मदत घ्यावी. यामुळे तुमच्या अंडरआर्म्सवरील केस मऊ होऊन पटकन निघतात. नेहमी त्याच जेल अथवा क्रीमचा वापर करा जे विशेषतः अंडरआर्म्स करण्यासाठीच बनवले गेले आहेत. कारण अंडरआर्म्सचे पीएच (Ph) लेव्हल वेगळ्या स्वरुपाचे असतात आणि हे जेल अथवा क्रीम त्याच स्वरुपात तयार करण्यात येतं.
स्क्रब करा
शेव्हिंग करण्यापूर्वी तुमची त्वचा एक्सफोलिएट नक्की करून घ्या. त्वचा एक्सफोलिएट करणं म्हणजे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकणे. त्यामुळे तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर शेव्हिंग करत असाल, तर सर्वात पहिले त्वचा एक्सफोलिएट करणं अतिशय गरजेचं आहे. अंडरआर्म्स शेव्हिंग करण्यासाठी सर्वात पहिले सौम्य स्वरुपाचा स्क्रब करून त्वचा एक्सफोलिएट करून घ्या. त्यामुळे त्वचेवर असणारे डेड सेल्स अर्थात मृत पेशी नष्ट होतात आणि शेव्हिंग करणं अतिशय सोपं होतं.
वाचा – पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स
रेझरचा वापर कसा करावा
अंडरआर्म्स शेव्हिंगसाठी कोणत्या प्रकारचा रेझर वापरावा याची माहिती असणंदेखील गरजेचं आहे. रेझर मल्टीब्लेडवाला असावा असाच प्रयत्न करा. त्याशिवाय रेझरला रबरचे हँडल असायला हवे. त्यामुळे शेव्ह करताना कोणत्याही अँगलने नीट फिरवून अंडरआर्म्समधील केस काढून टाकण्यास सोयीस्कर होऊ शकेल. असं रेझर असल्यास, त्वचा कापायचे चान्स कमी असतात आणि तुम्हाला अतिशय स्मूथ आणि क्लीन शेव्ह करता येऊ शकतं.
डिओड्रंट अथवा परफ्युमचा वापर करू नये
शेव्हिंग केल्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा खूपच संवेदनशील होते. त्यामुळे शेव्ह केल्यानंतर लगेच कधीही अंडरआर्म्सवर डिओड्रंट अथवा परफ्युमचा वापर अजिबात करू नका. त्यामुळे तुमच्या नाजूक त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते. तसंच रात्रीच्या वेळीच शेव्ह शक्यतो करावा. त्यामुळे तुमच्या त्वचेला रात्रभर व्यवस्थित आराम मिळतो.
क्रीमने कसे स्वच्छ करावेत केस (How to clean Underarms hair with cream)
वॅक्सिंग आणि शेव्हिंगव्यतिरिक्त बाजारामध्ये केस हटवण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीमचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. अनेक हेअर रिमूव्हल ब्रँड बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे व्हीट आणि एनफ्रेंचच घेता येतं. या क्रीमचा वापर करून तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये आणि मेहनतीशिवाय तुमचे केस काढून टाकू शकता. हे क्रीम त्वचेवर लावण्यासाठी एक टूल स्पॅचुला मिळतो. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या त्वचेवर क्रीम लावून नको असणारे केस पटकन काढून टाकता येतात. मात्र लक्षात ठेवा की, या हेअर रिमूव्हल क्रीमनेदेखील तुमची त्वचा हळूहळू काळी पडायला लागते. त्यामुळे अगदीच गरज असेल तेव्हा या क्रीमचा वापर करावा.
हेअर रिमूव्हल क्रीमचा वापर करण्यापूर्वी अंडरआर्म्स नीट साफ करून टॉवेलने सुकवून घ्या. त्यानंतर क्रीम स्पॅचुलाच्या मदतीने केसांची वाढ होत असलेल्या दिशेने लावावं. अंडरआर्म्ससाठी तुम्ही एकाचवेळी सर्व एरिया कव्हर करू शकता. त्यानंतर क्रीम तुमच्या त्वचेवर साधारण पाच ते सहा मिनिट्स प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे लावून ठेवा. त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने केस काढून टाका. ही प्रक्रिया संपूर्ण दुखापत विरहीत आहे. शिवाय काही मिनिट्समध्ये तुम्ही तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ करू शकता. मात्र या क्रीममुळे केस मुळापासून निघत नाहीत, तर केवळ त्वचेवर दिसणारे केस साफ होतात. त्यामुळे वॅक्सिंगच्या तुलनेत क्रीम लावल्यानंतर अंडरआर्म्स लवकर केस येतात. शिवाय तुम्ही क्रीमचा जास्त वापर केल्यास, तुमची त्वचा काळी पडण्याची शक्यता जास्त असते.
फोटो सौजन्य – Shutterstock