#POPxoTurns5 आणि Luxeva च्या लॉंचपार्टीचं आयोजन

#POPxoTurns5 आणि Luxeva च्या लॉंचपार्टीचं आयोजन

POPxo ला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्लीत एका ग्रॅंड सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं. आकर्षक रंगसंगतीची सजावट, आल्हाददायक वातावरण, फोटो बूथ, इन्स्टाग्राम-वर्थी बॅकड्रॉप, बलून्स आणि मनमोहक फुलांच्या सजावटीने दिल्लीतील Qla चं रुफटॉप दुपारीच सजलं होतं.


POPxo Party 1 Marathi


पार्टीसाठी Jacob’s Creek sparkling wine चं कॉकटेल ड्रिंक सर्व्ह करण्यात येत होतं. जॅझचं सॉफ्ट संगीत आणि पार्वती मोहनाकृष्णन यांच्या मधुर आवाजाने या ब्रंच पार्टीला अधिकच रंगत आली. POPxo ला शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमधील अनेक सेलिब्रेटींजनीं या पार्टीला उपस्थिती लावली होती..


POPxo Party 2 marathi


 


सेलिब्रेटीजनी दिल्या POPxoला शुभेच्छा


फॅशन डिझाईनर रोहीत गांधी, मालिनी रामानी, गौरी करण, सिद्धार्थ टायटलर, मयूर गिरोत्रा, ईशा राजपाल, नित्या बजाज आणि श्यामा शेट्टी POPxo च्या या यशामध्ये सहभागी झाले.


Mayyur Girotram Prerna Subba  Kunal Walia POPxo Party Turns 5 for marahi


उद्योग क्षेत्रातून IDG चे करन मोहला आणि गुगल इंडीयाचे एम.डी राजन आनंदन POPxo ला सपोर्ट करण्यासाठी आले होते. शिवाय पार्क हॉटेल इंडस्ट्रीच्या कॉर्पोरेट डायरेक्टर, कम्यूनिकेशन्स आणि पी.आर रुचिका मेहता, ऑबेरॉय ग्रूप्सच्या कॉर्पोरेट कम्यूनिकेशन्स वाईस प्रेसिडंट सिल्की सेहगल आणि उद्योगपती आशिश देव कपूरदेखील या पार्टीसाठी उपस्थित होते. ब्युटी इंडस्ट्रीमधून ब्युटी एक्स्पर्ट वसुधा राय आणि Plixxo च्या श्रेया जैन यांनी POPxo च्या टीमचं कौतुक केलं. एवढंच नाही तर भारतातील टॉपचे टेक जर्नलिस्ट राजीव मखनी आणि माजी भारतीय क्रिकेटर  मुरली कार्तिकदेखील या पार्टीसाठी दाखल झाले होते.


318-POP xo 5th Year Rajiv Makhni Archana Vijaya Priyanka Gill POPxo Birthday for marathi


350-POP xo 5th Year Malini Ramani Priyanka Gill POPxo Party for marahi


 Luxeva Launch Party Take It Up A POP 5th Birthday POPxo  for marathi


Louis Vuitton च्या कंट्री मॅनेजर सुनैना क्वात्रा आणि को-होस्ट अर्चना विजय आणि चांदनी कुमारी सिंग यांनी POPxo च्या यशाचे कौतुक केले.


popxo party marathi 123


POPxo च्या सीईओ आणि फाऊंडर ‘प्रियंका गिल यांनी केली एक ग्रॅंड अनाऊंमेंट


POPxo चा कोणताही इंव्हेंट POPxo च्या सीईओ आणि फाऊंडर ‘प्रियंका गिल’ यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या प्रसंगी प्रियंका गिल यांनी एका फेसबूक पेजपासून सुरू झालेल्या  आणि आता 39 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेल्या, भारतीय महिलांसाठी सर्वात मोठी कम्युनिटी झालेल्या POPxo ची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. POPxo ला एवढ्या कमी वेळात मिळालेल्या या प्रचंड यशाबद्दल ऐकून उपस्थितांनी कंपनीचे कौतुक करत एकच जल्लोष केला. एवढंच नाही आता हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू भाषेतही POPxo उपलब्ध झालं आहे हेही यावेळी घोषित करण्यात आलं. शिवाय कंपनीची नवी टॅग लाईनची अर्थात Take It Up A POP देखील यावेळी जाहीर करण्यात आली.

Subscribe to POPxoTV

फॅशन, ब्युटी, रिलेशनशिप किंवा करिअर यापैकी काहीही असो POPxo नेहमीच महिलाच्या मदतीसाठी तत्पर आहे हे यातून दिसून आलं. POPxo च्या माध्यमातून महिलांना आता आनंदी जीवन जगण्यासाठी नक्कीच एक युनिक प्लॅटफॉर्म निर्माण झालं आहे. या पार्टीच्या निमित्ताने Luxeva.com चं अधिकृत लॉंच करण्यात आलं. प्रियंका गिल यांनी यासाठी Pudit च्या पी.आर अर्चना जैन आणि Platoon Advisory नेहा लीडर यांचे आभार व्यक्त केले.


PG  popxo party new for marathi


कंटेट फ्लॅटफॉर्म ही लक्सेव्हा लिमिटेडची तिसरी ऑफर आहे. मीडिया टेक कंपनीमध्ये आधीपासून POPxo आणि Plixxo या भारतातील सर्वात मोठ्या डिजीटल ब्रॅन्डचा समावेश झालेला आहे. Luxeva.com च्या माध्यमातून आता  लवकरच स्टाईल, वेलनेस, ब्युटी, ट्रॅव्हल, फूड, होम आणि कल्चरवर नवनवीन टीप्स आणि ज्ञान महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. चाहत्यांनी या नव्या अनाऊंसमेंटचंदेखील अगदी मनापासून स्वागत केलं. आतापर्यंतची यशस्वी कारकीर्द आणि पूढील कामाचा नवा जोश यामुळे ही सक्सेस पार्टी अविस्मरणीय ठरली. पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांचं The Body Shop च्या भेटवस्तू आणि Chez Papillon चॉकलेट्सची गुडी बॅग गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आलं.


अधिक वाचा


अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट


आज थुकरट वाडीत रंगणार 'रात्रीस खेळ चाले'चा थरार


प्रेमाचा निखळ अनुभव सांगणारं ‘अजुन अजुन’ गाणं