जर तुम्ही लवकरच आई होणार असाल तर ब्रेस्टफिडींगबाबत तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. कारण तुमच्या मुलाच्या निरोगी आयुष्याच्या सुरूवातीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ब्रेस्टफिडींग म्हणजे स्तनपान हे प्रत्येक मुलाच्या निरोगी आयुष्याचा पाया आहे. ईश्वराने स्तनपानाला नैसर्गिकरित्या मातृत्वाचा सुखद अनुभव देण्यासाठी बनवलं आहे. प्रत्येक बाबतीत स्तनपान हे आई आणि मुल दोघींसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण तरीही याबाबत अनेक गैरसमज आहेत. ज्याबद्दल जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. या लेखात आम्ही तुम्हाला स्तनपान म्हणजेच ब्रेस्टफिडींगशी निगडीत काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.
आईच्या दुधाला पर्याय नाही
तुम्हाला माहीत आहे का, जागतिक आरोग्य संघटना सल्ला देते की, नवजात शिशूला कमीत कमी 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध दिलं पाहिजे. हो फक्त आईचं दूध आणि काही नाही. याला विशेषतः ब्रेस्टफिडींग किंवा स्तनपान असं म्हटलं जातं.
जागतिक आरोग्य संघटना असा सल्ला देते की, मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी सप्लिमेंट्ररी फूडसोबत स्तनपान कमीतकमी 2 वर्षांपर्यंत केलं पाहिजे. हेच कारण आहे की, सर्व जागतिक संस्था याबाबत गंभीर आहेत. आईच्या दुधामुळे मुलाचं पायाभूत पोषण होतं आणि हे दूध अँटीबॉडीजयुक्त असतं. जे जन्मभर मुलाला निरोगीपणा देतं.
हो, आपल्याला मुलांच्या सर्व फॉर्म्युला ब्रँड्सबाबत माहीती असतं, पण आईच्या शरीरात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक दूधाची बरोबरी कोणत्याही लॅबमध्ये बनणाऱ्या फूड फॉर्म्युलाशी होऊ शकत नाही आणि मुलांच्या फॉर्म्युलाच्या तुलनेत हे पचायला ही सोपं असतं.
मुलं आणि आई दोघांसाठी ब्रेस्टफिडींगचे अगणित फायदे
ब्रेस्ट मिल्क हे मुलाला कोणत्याही व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्याची ताकद देतं.
ब्रेस्टफिडींगमुळे मुलांना अस्थमा आणि अॅलर्जी होण्याचा धोका कमी असतो.
यासोबतच कोणत्याही फॉर्म्युलाशिवाय सुरूवातीच्या 6 महिन्यांपर्यंत ब्रेस्टफिडींग म्हणजेच स्तनपान करणाऱ्या मुलांमध्ये कानाचा संसर्ग, श्वास किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाईनल आजार किंवा डायरिया होण्याची शक्यता कमी असते.
कोणतीही दुसरी गोष्ट अशी प्रतीरोधक क्षमता विकसित करू शकत नाही, जी ब्रेस्टमिल्कला शक्य आहे.
ब्रेस्टफिडींग म्हणजेच स्तनपान केल्यामुळे महिलांना स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
ब्रेस्टफिडींग किंवा स्तनपान हे विशेषतः महिलांच्या मानसशास्त्रासाठी फायदेशीर आहे, कारण याच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या भावनिकरित्या मुलाशी जोडल्या जातात.
टॉप ब्रेस्टफिडींग टीप्स
1. डिलेव्हरीच्या एक तासातच मुलाला ब्रेस्टफिडींग नक्की करा. या वेळात तुमच्या स्तनांमध्ये कोलोस्ट्रम किंवा पहिलं दूध तयार होतं. हे वास्तवतः लिक्वीड गोल्ड असतं, याला तुम्ही कमी मात्रेत जास्त पोषणयुक्त पॅक समजू शकता. एका नवजात अर्भकासाठी हे आवश्यक अन्न असतं, कारण त्याच पोटही छोटंच असतं ना.
2. मुलाला दुधाचं मिळणारं प्रमाण वाढवण्यासाठी मुलाला अनेकवेळा फीड करा. यामागे एक सामान्य नियम आहे, तुम्ही मुलाला जितकं कमी दूध पाजाल तितकं तुमच्या शरीरात कमी प्रमाणात दूध निर्माण होतं. एक लक्षात ठेवा की, तुम्ही चांगलं डाएट घ्या आणि चांगला आराम करा. तुम्हाला दोघांनाही त्याची गरज असते कारण आपलं शरीर आपल्या कॅलरीजना दूधामध्ये बदलतं.
3. हे निश्चित करा की दूध पितेवेळी बाळाचं तोंड बंद राहील. त्याच्या तोंडात तुमच्या स्तनाचा गडद रंग असलेला भाग जास्तीतजास्त असला पाहिजे. बाळ हे दुग्ध नलिकांमधून दूध खेचतं आणि त्याचं भागातून दूध निघतं. जर तुमचं बाळ फक्त स्तन चोखत राहिलं तर तुम्हाला त्रास होईल आणि दुखेलही. तसंच तुमचं बाळंही आवश्यक तितकं दूध चोखण्यास अपयशी राहील.
4. दुसऱ्या स्तनातून दूध प्यायला देण्यास घाई करू नका. पहिल्या स्तनाचं दूध पिण्याचं काम आपल्यावर बाळावर सोडा आणि मग दुसऱ्या स्तनाचं दूध द्या. काही बाळं दोन्ही स्तनांचं थोडं थोडं दूध पितात. त्यामुळे बाळाच्या बाबतीत हट्ट धरू नका आणि घाबरूही नका.
ब्रेस्टफिडींग पंप
आजकाल ब्रेस्टफिडींगसाठी ब्रीस्टफिडींग पंपाचा खूप वापर केला जातो. जर तुम्ही काही कारणामुळे बाळाला सरळरित्या स्तनपान करण्यात सक्षम नसाल तर या पंपाचा वापर करून तुमच्या बाळाला तुमच्या अनुपस्थितीतही तुम्ही ब्रेस्ट मिल्क पाजू शकता. याच्या वापरामागील कारणं बरीच आहेत. जसं ब्रेस्टमधून दूध येण्याची समस्या, बाळाचं प्रयत्न कऱण्यात असमर्थ होणं किंवा स्तनांना सूज किंवा त्यांचा आकार वाढणं किंवा निप्पलमध्ये अशक्तपणा किंवा वेदनाही असू शकतात. स्तनपानावेळी काही कारणास्तव बाळांपासून लांब असल्यासही याची गरज पडू शकते. अशा परिस्थितीत ब्रेस्ट फिडींग पंपाची फारच मदत होते. ज्यामुळे दूधही वेदनेशिवाय आरामात निघतं आणि तुम्ही हे दूध स्टोर करून नंतरही बाळाला देऊ शकता. लक्षात ठेवा की, असा पंप निवडा जो बाळाला आरामात दूध पाजण्यासाठी डिजाईन करण्यात आला असेल.
बाळाचा अधिकार
स्तनपान किंवा ब्रेस्टफिडींग तुमच्या बाळाचा अधिकार आणि हे दीर्घ काळासाठी कायम राहावं याची जवाबदारी संपूर्ण कुटुंबाची आहे. अनेकदा महिला योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा अपुऱ्या व्यवस्थेमुळे स्तनपान देणं सोडून देतात. ज्यामुळे मुलाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आजकाला ब्रेस्टफिडींगच्या बाबतीत प्रत्येक तऱ्हेची मदत उपलब्ध आहे. डॉक्टरांशी याबाबत बोला आणि माहिती घ्या. आपल्या बाळाला ब्रेस्टफिडींगचा अधिकार नक्की द्या.
(फिलिप्स इंडियाच्या लॅक्टेशन कंसल्टंट डॉ. मीमांसा मल्होत्राशी केलेल्या चर्चेवर आधारित)
हेही वाचा –
आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून
‘प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा’ यासारखे काही गैरसमज आणि त्यामागील तथ्य