सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचाराला तेव्हा रंग चढतो जेव्हा त्यामध्ये सेलिब्रिटींना घेतले जाते. म्हणजे आता प्रचाराचा हा नवा फंडा आहे असेच म्हणायला हवे. टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका अनेकांना माहीत असेल. या मालिकेतील अंगुरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे हिला वेगवेगळ्या पक्षाकडून या ऑफर्स आलेल्या आहेत. पण अंगुरी भाभीने त्या साफ नाकारलेल्या आहेत. आता कोणता पक्ष अंगुरी भाभीची मनधरणी करण्यात यशस्वी होते हे पाहायला हवे.
चित्रपटाच्या शुटींगदरम्यान भूमीचा झाला अपघात, वाचा नेमंक काय झाल भूमीसोबत
अंगुरी भाभीने का नाकारल्या ऑफर्स
एका वृत्तपत्राला मुलाखत देताना शुभांगी अत्रे हिने हा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, मला अनेक पक्षांकडून आतापर्यंत प्रचारासाठीच्या ऑफर्स आल्या आहेत. पण मी या सगळ्या ऑफर्स नाकारल्या आहेत,असा खुलासा करत तिने सगळ्यांनाच एक धक्का दिला आहे. तसं पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळातील हे चुनावी जुमले काही नवीन नाही. पण आता स्मॉल स्क्रिन स्टार्सनादेखील यासाठी अप्रोच केले जात आहे हे विशेष. मालिकांमधील टिआरपी पाहता अनेक मराठी कलाकारही या कालावधीत प्रचार फेरीत दिसतात. अमोल कोल्हे देखील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. संभाजी मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अमोलचा फॅन फॉलोविंग पाहताच त्याला देखील पक्षाने अप्रोच केले असावे असे वाटते. आता शुभांगी अत्रेनंतर कोणाचा नंबर लागतो हे पाहायला हवे.
नाही सांगितला पक्ष
शुभांगीने तिला आलेल्या ऑफर्स सांगितल्या खऱ्या. पण तिने कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे आता नेमकं कोणत्या पक्षाने तिला ऑफर दिली याबाबत अधिक माहिती नाही. तिने या ऑफर्स लहान शहारांमधून आल्याचे सांगितले. पण प्रश्न असा येतो की, 6 ऑफर्स नाकारल्यानंतर शुभांगी चांगली ऑफर आली तर स्विकारेल का?, अंगुरी भाभी कुठे तरी प्रचार करताना दिसेल का?
‘तैमूर’ चित्रपटावरुन उठला पडदा, काय म्हणाले मधुर भांडारकर
राजकारणात नाही रस
शुभांगीला या मुलाखतीमध्ये राजकारणाबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मी राजकारणात सक्रिय असलेल्या राजकीय नेत्यांना फॉलो करते. त्यांना ट्विट करुन उत्तर देते. रिट्विट करते. पण याचा हा अर्थ होत नाही की, मला राजकारणाची आवड आहे किंवा मला राजकारणात जायचे आहे. या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. त्यामुळे माझा राजकारणात जाण्याशी काहीच संबंध नाही, असे तिने स्पष्ट केले आहे.
अंगुरी भाभी प्रसिद्ध
शिल्पा शेट्टीने मुलासोबत केला वर्कआऊट,पाहा व्हिडिओ
श्वेता शिंदेनंतर शुभांगी अत्रे हिला अंगुरी भाभीच्या रोलमध्ये कास्ट करण्यात आले. श्वेता शिंदेने साकारलेल्या या पात्राला लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. त्यामुळे श्वेताच्या जागी येणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षक स्विकारतील का? असा प्रश्न होता. पण शुभांगीने देखील हे पात्र इतक्या सुंदर पद्धतीने केले की, कदाचित लोकांना जुनी अंगुरी भाभी आठवणार देखील नाही. आता अंगुरी भाभी म्हटली की, शुभांगी अत्रेच आठवते. या मालिकेचा टिआरपीदेखील शुभांगीमुळे वाढला आहे. या मालिकेमुळे शुभांगी अत्रे चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली आहे.
(सौजन्य- Instagram)