ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका ‘या’ गोष्टी

चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका ‘या’ गोष्टी

अनेकवेळा एखादा चांगलं फळ किंवा पदार्थ आपण चुकीच्या वेळी खातो आणि त्यामुळे होतो उलटा परिणाम. कारण अनेक खाद्यपदार्थांमध्ये अॅसिडची मात्रा इतकी जास्त असते की, जर त्या रिकाम्या पोटी खाल्ल्या तर शरीराला फायद्याऐवजी नुकसान होतं. अशावेळी लक्षात घ्या की, तुम्ही काय खात आहात आणि कोणत्यावेळी खात आहात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी अजिबात खाऊ नका.

1 – चहा किंवा कॉफी

823905 206

बरेच जणांना सकाळी उठल्याउठल्या रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. पण हे करणं योग्य नाही. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडीटी वाढते. ज्यामुळे पूर्ण दिवस तुम्हाला जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. यामधील निकोटीन आणि कॅफीनमुळे अॅसिड तयार होते. जे रिकामं पोट असल्यास अजून वाढते. त्यामुळे तुमचं पचनाचं तंत्र बिघडू शकतं. जर तुम्हाला सकाळी चहा किंवा कॉफी घ्यायची असल्यास त्यासोबत काहीतरी खाणं आवश्यक आहे. जर काही खायला नसल्यास निदान चहा-कॉफी घेण्याआधी एक ग्लास पाणी नक्की प्या.

2 – तिखट किंवा मसालेदार खाणं

cf78eb cf8bbf15bb1c4c169b40fd8d9cef0422

ADVERTISEMENT

जर तुम्ही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण यामध्ये नॅचरल अॅसिड असतं जे तुमचं पचन बिघडवतं. यामुळे पोटात दुखणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. तर काहींना जुलाबही होऊ शकतात.

3 – मेडीसीन

vitamin-tablets

तुम्हााला माहीतचं असेल की, डॉक्टर सकाळी-सकाळी (काही औषधं सोडल्यास ) रिकाम्या पोटी औषधं घेण्यास मनाई करतात. रिकाम्या पोटी औषधं घेतल्याने पोटात अॅसिडची समस्या जाणवते, ज्यामुळे जळजळ किंवा आंबट ढेकरा यांसारखे त्रास जाणवतात. काहीवेळा जास्त त्रासही होऊ शकतो.  

4 – गोड पदार्थ

536975153

ADVERTISEMENT

पोट स्वच्छ झाल्यामुळे काय फायदे होतात

सकाळी उठल्याउठल्या गोड पदार्थ खाणं म्हणजे  डायबिटीजला आमंत्रण देणं आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ले तर  तुमच्या शरीरातील ब्लड शुगरची लेव्हल हाय होईल. जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची खूप ईच्छा असेल तर आदी पाणी प्या आणि मग काहीतरी गोड खा.

5 – केळं

image

केळ्याला सुपरफूड असं म्हणतात. पण तज्ज्ञांनुसार चुकीच्या वेळी केळ खाल्ल्यास शरीराला नुकसानदायक ठरू शकतं. केळ्यामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमची मात्रा जास्त असते. जी रक्तामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे असंतुलन निर्माण करते. त्यामुळे रिकाम्या पोटी कधीच केळ खाऊ नये.

ADVERTISEMENT

6 – आंबट फळ

167226562 XS

आंबट फळ योग्य वेळी खाल्ल्यास खूप फायदेशीर ठरतात पण जर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास ती नुकसान करतात. रिकाम्या पोटी आंबट फळं खाल्ल्यास शरीरामध्ये अॅसिड निर्माण होते जे आपल्या पचनाची क्रिया बिघडवते.

7 – दही

download %282%29

जर तुम्ही रिकाम्या पोटी दही खाल्लं तर पोटातील अॅसिडज यामुळे अजूनच अॅसिडीक बनतात. दह्यातील लॅक्टीक अॅसिड बॅक्टेरियाचा यामुळे काहीच फायदा होत नाह. त्यामुळे जर सकाळी उठल्यावर दही घातलेली कोणतीही डीश खाऊ नये. कारण यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

8 – टोमॅटो

2962762666 1237ff6eb4 o

टोमॅटोमध्ये अॅसिडची मात्रा अधिक असते त्यामुळे रिकाम्या पोटी याचं सेवन केल्यास शरीराला अपाय होतो. ज्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. तसंच गॅस्ट्रीक अल्सर होण्याचाही धोका असतो.

लक्षात ठेवा,  नेहमी सकाळी उठल्यावर शक्य असल्यास रिकाम्या पोटी आधी निदान एक ग्लास पाणी प्या आणि मगच नाश्ता किंवा चहा-कॉफी घ्या.

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

01 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT