शरीरारील अनावश्यक केस तुमच्या सौंदर्यात बाधा आणतात. अंगावरील केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करणं हे नेहमीच त्रासदायक काम असतं. शिवाय वॅक्सिंगसाठी पार्लरमध्ये बराच वेळदेखील द्यावा लागतो. रेझर अथवा हेअर रिमूव्हल क्रीम सर्वांनाच सूट होतंच असं नाही. आजकाल बाजारातील वॅक्समध्ये अनेक केमिकल्स वापरण्यात येतात ज्यामुळे वॅक्स केल्यावर तुमच्या त्वचेला खाज येते अथवा पुरळ उठतं. यासाठी शरीरावरील हे अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही घरीच काही उपाय करू शकता. आम्ही तुम्हाला घरी वॅक्सिंग करण्याच्या काही सोप्या टीप्स आणि वॅक्स तयार करण्याची सोपी पद्धत सांगत आहोत जी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
नैसर्गिक मॉश्चराईझिंग वॅक्स
हा नैसर्गिक वॅक्स तुम्ही तुमच्या घरीच तयार करू शकता. शिवाय या वॅक्समुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम देखील होते.
कसा तयार कराल वॅक्स
एका पॅनमध्ये एक कप साखर, अर्धा कप मध आणि एका लिंबाचा रस घ्या. मंद आचेवर हे मिश्रण गरम करा. साखर विरघळ्यानंतर आणि मिश्रणाचा रंग बदलू लागल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ते एका वाटीत काढून घ्या. हे मिश्रण तुम्ही काही दिवस टिकवून ठेवू शकता. वापरण्यापूर्वी ते परत थोडं गरम करा.
वापर कसा कराल
तुम्ही हे मिश्रण इतर वॅक्स प्रमाणे वापरू शकता. ज्या भागावर तुम्हाला वॅक्स करायचे आहे त्या भागावर थोडा मैदा अथवा कॉर्नफ्लॉवर लावा. चाकूच्या मदतीने वॅक्स त्या भागावर पसरा. वॅक्स स्ट्रिप त्या भागावर लावून प्रेस करा आणि उलट दिशेने ती स्ट्रिप ओढा. या वॅक्समुळे तुमच्या अंगावर कोणतीही खाज अथवा पुरळ येणार नाही. शिवाय तुम्हाला पार्लरमध्ये बराच वेळ द्यावा लागणार नाही. घरीच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करू शकता.
शुगरिंग वॅक्स
जर तुम्हाला वॅक्समध्ये कराव्या लागणाऱ्या ओढाताणीची भिती वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने वॅक्स करू शकता. जास्त त्रास न होत असल्यामुळे बिकनी वॅक्ससाठीदेखील तुम्ही हे वॅक्स वापरू शकता. शिवाय इतर वॅक्स प्रमाणे हे फार चिकटदेखील नसते.
कसा तयार कराल वॅक्स
चार कप साखर, अर्धा कप पाणी आणि अर्धा कप लिंबाचा रस एक पॅनमध्ये टाकून साखर विरघळेपर्यंत गरम करा. हे मिश्रण सतत ढवळत रहा कारण असे न केल्यास साखर पॅनला चिकटू शकते. मिश्रण उकळू लागल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्याची Consistency चेक करा. मिश्रण अती पातळ अथवा अती घट्ट असता कामा नये. मधाप्रमाणे त्याची Consistency असल्यास ते व्यवस्थित झालं आहे असं समजा. हे मिश्रणदेखील तुम्ही काही दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेऊ शकता. वापरण्यापूर्वी ते मायक्रोवेव्ह अथवा गॅसवर पुन्हा गरम करा.
वापर कसा कराल
वॅक्स करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करा. कारण त्यावर जर एखादे क्रीम अथवा सिरम असेल तर केस निघणार नाहीत. त्वचेवर एखादी बेबी पावडर लावा. कोमट मिश्रण त्वचेवर लावा. केसांच्या ग्रोथच्या उलट्या दिशेने ते ओढून काढा. ज्यामुळे तुमचे अनावश्यक केस निघून जातील. या मिश्रणामुळेदेखील तुम्हाला मऊ आणि मुलायम त्वचा मिळू शकते.
वॅक्स करताना केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने वॅक्स स्ट्रिप ओढा ज्यामुळे तुम्हाला फार त्रास होणार नाही. वॅक्स केल्यावर त्वचेवर गुलाबपाणी अथवा बर्फ लावा ज्यामुळे त्वचेची मोकळी झालेली छिद्रं पुन्हा बंद होतील. असे न केल्यास त्या छिद्रांमध्ये धुळ जाऊन तुम्हाला त्वचा समस्यांना सामोरं जावं लागू शकता.
अधिक माहिती साठी घरीच वॅक्स कसे करावे याबाबत POPxo चा हा व्हिडीओ जरूर पहा.
अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी
अनावश्यक केस काढून आणा चेहऱ्यावर Natural Glow! (How To Remove Facial Hair In Marathi)
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक