ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

कोरडी त्वचा अर्थात Dry skin फक्त थंडीमध्ये असेत असं नाही. कोणत्याही ऋतूमध्ये त्वचा कोरडी होऊ शकते. काहींची त्वचा तर कायमस्वरूपी कोरडी असते. गरम हवा आणि सतत बदलत्या हवेमुळे आपली त्वचा आजकाल जास्त प्रमाणात कोरडी पडू लागली आहे. कोरड्या त्वचेमुळे बऱ्याच महिलांना त्रास होत असतो. तुम्हाला प्रश्न पडत असेल या कोरड्या त्वचेसाठी नक्की काय करायचं? तुमची कोरडी त्वचा कशी कायम मऊ आणि मुलायम राहील?  तर त्यासाठी आम्ही तुम्हाला अगदी सोपे आणि सहज करता येणारे घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या रोजच्या कामातून वेळ काढून हे सहज उपाय नक्की करू शकता. शिवाय तुम्हाला त्यासाठी बराच खर्च करण्याचीदेखील गरज नाही.

1. स्क्रब करा

scrub1

ही डेड स्किन आपल्या त्वचेचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकते आणि मॉईस्चराईजरदेखील त्वचेच्या आत यामुळे पोहचू शकत नाही. त्यामुळे अशी त्वचा काढून टाकणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही किमान आठवड्यातून दोनदा तरी बॉडी स्क्रबचा वापर करायला हवा. लक्षात ठेवा की, बॉडी स्क्रब त्वचेवर जोरजोरात रगडू नका. तसं  केल्यास, त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो.

2. Cleanse करा

बाजारात असणाऱ्या साबणांमध्ये अधिकांशवेळा alkaline चं प्रमाण जास्त आढळतं. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होते आणि आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेलदेखील कमी होतं. तसंच यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेलाचं काम सुरु होण्यासाठी साधारण 24 तास लागतात. त्यामुळे तुम्ही ग्लिसरीन असलेल्या बॉडी वॉशचा उपयोग करा. यामुळे तुमची त्वचा अधिक हायड्रेट होते.

ADVERTISEMENT

3. मॉईस्चराईज करा

moisture

आपण नेहमी चेहरा कोरडा करून मग मॉईस्चराईजर लावतो. पण तसं करणं योग्य नाही. जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता. तेव्हा ओल्या चेहऱ्यावरच मॉईस्चराईजर लावणं योग्य आहे. तुम्हाला जर स्पा करून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी चांगला स्पा करून घ्या.

4. मुलायम करा

उन्हाळ्यात त्वचेचं जास्त नुकसान होतं आणि कोरडी होते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाण्याची आवश्यकता आहे. तसंच भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करता. तुमची त्वचा मुलायम करण्यासाठी Dry body-brush चा देखील तुम्ही वापर करू शकता. या सगळ्यानेही तुमची त्वचा कोरडीच राहात असेल तर तुम्ही cellulite cream चा वापर करून पाहा.

5. टॅनिंगची मदत घ्या

टॅनिंग आपल्या त्वचेसाठी नुकसानदायी असलं तरीही काही महिलांसाठी हे खूप चांगलं असतं. टॅनिंगमुळे त्यांची त्वचा अधिक चांगली दिसते. याचा फायदा असा होती की, तुमचे cellulites दिसत नाहीत. त्यासाठी तुम्ही सेल्फ टॅनर्ससारखे ब्रोन्झर्सदेखील वापरू शकता.

ADVERTISEMENT

6. त्वचेवर सनस्क्रिन

sunsreen

केवळ चेहराच नाही तर गळ्याखाली, हात आणि पाय याठिकाणीदेखील सनस्क्रिन लावणं आवश्यक आहे. दिवसातून एकदाच सनस्क्रिन लाऊन काम होत नाही. साधारण 3 तासाने सनस्क्रिन लावायला हवं. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी राहात नाही आणि शिवाय त्याचं व्यवस्थित संरक्षणदेखील होतं.

हे उपाय केल्यास, तुमची त्वचा कायम मऊ – मुलायम आणि चमकदार राहील.

फोटो सौजन्य – Shutterstock

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा

भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

ADVERTISEMENT
26 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT