ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स

हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स

सर्वात जास्त कामाचा परिणाम होतो तो आपल्या हातावर. आपला हाताचा तळवा फारच नाजूक असतो. पण भांडी घासणं, कपडे धुणं आणि इतर कामांमुळे बऱ्याचदा आपल्या हातावर परिणाम होत असतो. इतकंच नाही बदलणारं  वातावरण, पाणी आणि moisture ची कमतरता यामुळेदेखील फरक पडतो. शिवाय आपल्याला रोज काम करणं तर भागच असतं. चेहऱ्यावरील काही कमतरता आपण मेकअपने लपवू शकतो. पण हाताचं काय? आपल्याला बऱ्याचदा लोकांना हात मिळवावा लागतो. तेव्हा अशा हाताने कोणाला शेक हँड करणंदेखील लाजिरवाणं वाटतं. पण तुम्हाला जर नेहमी तुमचा हात मऊ आणि मुलायम ठेवायचा असेल तर तुम्ही नेहमी आम्ही देत असलेल्या 10 सुपर ट्रिक्सचा वापर नक्की करा. यामुळे तुम्हाला नक्कीच मऊ आणि मुलायम हातांचा अनुभव येईल.

1. ऑलिव्ह ऑईल अथवा नारळाचं तेल लावा

rosemary oil

हे तेल केवळ केसांसाठीच नाही तर तुमच्या हातांसाठीदेखील वरदान आहे. जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे तेल वापरू शकता आणि हातांना लावल्यावर हातावर हे तेल असंच राहू द्या. एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला जास्त काम नसेल किंवा तुम्ही फ्री असाल तेव्हाच हे तेल हातांना लावा म्हणजे त्याचा योग्य परिणाम हातांवर दिसू शकतो.

निलगिरीच्या तेलाबद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

2. गरम पाण्याने हात धुऊ नका

गरम पाणी आपली त्वचा कोरडी बनवतो आणि त्यामुळे हातातील त्वचेमधील moisture कमी होतं. शरीराच्या तुलनेत आपल्या हाताला पाणी जास्त लागतं. कारण आपण भरपूर वेळा हात धुत असतो. त्यामुळे हात धुताना गरम पाण्याने हात धुऊ नका. हात साफ करण्यासाठी थंड पाण्याचा अथवा कोमट पाण्याचा वापर करा.

3. योग्य साबण वा हँडवॉशचा वापर करा

face wash

तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका, पण साबण आपल्या हातांना सर्वात जास्त नुकसान पोहचवतो हे खरं आहे. त्यामुळे असाच साबण वापरा ज्यामध्ये नैसर्गिक घटक आहेत अथवा साबण organic असेल वा साबणावर “moisturizing” अथवा sensitive त्वचा असे लेबल असतील.

तसेच मेहंदी कशी काढायची तेही वाचा

ADVERTISEMENT

4. Sanitizer चा नक्की वापर करा

बऱ्याचदा आपल्याला हात धुण्याची गरज नसते तरीही आपण हात धुतो. अशावेळी तुम्ही sanitizer चा  वापर करा. कारण तुम्ही सॅनिटायझर वापरलंत तर पाण्याची गरज तुम्हाला भासत नाही. सारखे हात धुत राहिल्यास, त्यातील नैसर्गिक मॉईस्चराईजर निघून जातं. पण sanitizer तुमच्या हातातील त्वचेला कोरडेपणा न देता योग्य ओलावा मिळवून देतं. पण sanitizer चा वापरदेखील जास्त प्रमाणात करू नका.

5. हात धुतल्यानंतर मॉईस्चराईजर नक्की लावा

moisturise

जेव्हा तुम्ही हात धुवाल तेव्हा तुम्ही ही गोष्ट नक्की करा! कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण तुम्ही तुमच्या कामातून फक्त 2 मिनिट्स काढा आणि हात धुतल्यावर तुमच्या हाताला मॉईस्चराईजर लावा. त्यामुळे तुमचे हात कायम मऊ आणि मुलायम राहतात. तुम्ही जर जास्त प्रमाणात प्रवास करत असाल तर तुमच्या बॅगमध्ये नेहमी मॉईस्चराईजर ठेऊन द्या.

6. साफसफाई करताना रबर ग्लोव्ह्ज घाला

हात पाण्यात घालत असताना अथवा साफसफाई करत असताना तुम्ही रबराचे ग्लोव्ह्ज घालणं विसरू नका. सफाई करताना बऱ्याचदा केमिकलशी संपर्क येण्याचा संबंध असतो. त्यामुळे आपले हात सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही ग्लोव्ह्ज घालावेत. त्यामुळे हातांची काळजी राखली जाते.

ADVERTISEMENT

7. नियमित Manicure करा

manicure

तुम्ही योग्य काळजी घेतलीत तर तुम्ही आरामात काही गोष्टी जपू शकता. क्यूटिकल केअर हे नियमित आणि योग्य मेनिक्युअरशिवाय शक्य नाही. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका, पण तुमचे हात कसे दिसतात आणि कसं फील करता हे तुमच्या क्यूटिकल्सवर अवलंबून असतं. त्यामुळे कमीत कमी 3-4 आठवड्यातून एकदा मेनिक्युअर नक्की करून घ्या.

8. Hydrated राहा

मऊ आणि मुलायम त्वचा हवी असेल तर तुमचं शरीर hydrated असणं अतिशय गरजेचं आहे. हीच गोष्ट तुमच्या हातालाही लागू होते. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस आपलं शरीर hydrated ठेवा आणि शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका. दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी नक्की प्या. त्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर चांगलं आणि निरोगी राहील.

9. हातांना Exfoliate करणं विसरू नका

Exfoliation शरीराच्या बाकी भागांसाठी जितकं आवश्यक आहे तितकंच हातांसाठीदेखील आहे. त्यामुळे आपल्या exfoliation रूटीन मध्ये हातांचादेखील समावेश करून घ्या. घरी तुम्ही 1 चमचा ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा साखर घालून एक स्क्रब तयार करून घ्या. हा स्क्रब तुम्ही हाताला लाऊन हलकासा मसाज करा. त्यानंतर तुमचे हात लगेच मऊ आणि मुलायम होतील.

ADVERTISEMENT

10. झोपण्यापूर्वी क्रीम लाऊन झोपा

झोपण्यापूर्वी हातांवर क्रीमचा जाड कोट अथवा वॅसलिन नक्की लावा. त्यामुळे रात्रभर तुमच्या हातावर moisture राहातं. तुम्ही हे लाऊन झाल्यानंतर हातांवर ग्लोव्ह्ज घालून झोपा. सकाळी उठल्यानंतर तुमचे हात तुम्हाला मऊ आणि मुलायम असल्याचं जाणवेल.

Images: Instagram  

हेदेखील वाचा – 

नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

ADVERTISEMENT

हातावरची जुनी मेंदी काढण्यासाठी घरगुती उपाय

नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम

14 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT