ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
विकी कौशलला झाली हॉरर फिल्मच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत

विकी कौशलला झाली हॉरर फिल्मच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत

उरी: द सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला विकी कौशल सध्या गुजरातमध्ये आपल्या आगामी एका हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. भानुप्रताप सिंहच्या हॉरर चित्रपटामध्ये विकी काम करत असून सध्या याच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. मात्र विकीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे विकीला या चित्रपटासाठी करत असलेल्या एका अॅक्शन सीनदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.

अॅक्शन सीनदरम्यान विकीला दुखापत

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण चालू असून पूर्ण क्रू तिथेच आहे. दोन – तीन दिवसांपूर्वी नाईट शूटच्या वेळी विकी कौशल एका शिपवर एक अॅक्शन सीनचं चित्रीकरण करत होता. त्यावेळी त्याला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता. पण जो दरवाजा उघडायचा होता तोच दरवाजा त्याच्या अंगावर पडला आणि या अपघातामध्ये विकीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर विकीला लगेच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तातडीने मुंबईमध्ये आणण्यात आलं आहे.

vicky 1

विकीला पडले 13 टाके

मिळालेल्या माहितीनुसार, विकीच्या गालाचं हाड फ्रॅक्चर झालं असून त्याच्या चेहऱ्यावर 13 टाके लावण्यात आले आहेत. विकीबरोबर झालेला हा अपघात खूपच गंभीर सांगण्यात येत आहे. सध्या विकी मुंबईच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असून आराम करत आहे. तब्बेत पूर्ण ठीक झाल्यानंतरच विकी आता या चित्रपटाचं चित्रीकरण करू शकणार आहे. सध्या विकीला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय टाके असल्यामुळे विकीलादेखील आराम करणं गरजेचं आहे. कोणत्याही कलाकारासाठी त्याचा चेहरा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे विकीच्या तब्बेतीविषयी सध्या सगळेच चिंताग्रस्त आहेत. पण विकी लवकरच बरा होऊन आपल्या पुढच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

विकी सध्या टॉपवर

vicky FI

उरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विकी कौशलला प्रेक्षकांचा आणि अगदी बॉलीवूडमधूनही खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये विकीने केलेल्या कामाची खूपच प्रशंसा झाली. शिवाय या चित्रपटानंतर विकीच्या चाहत्यांमध्येही भर पडली आहे. विकीला या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. विकीकडे सध्या खूप चित्रपट असून विकी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहे. विकीचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘राझी’ आणि वेबसिरीज ‘लस्ट स्टोरीज’ या दोन्हीमधून विकीने प्रेक्षकांचे आणि निर्मात्यांचेही लक्ष वेधून घेतले. शिवाय हे वर्ष विकीचाच बोलबाला झाला असं म्हणावं लागेल. अनेक पुरस्कार विकीने आपल्या नावे केले आहेत. आता विकी कधी बरा होऊन लवकरच पुन्हा प्रेक्षकांंसमोर येईल ते पाहावं लागेल. विकीच्या रिकव्हरीसाठी त्याचे चाहते सध्या प्रार्थना करत असून विकी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आराम करत आहे.

विकीचं नुकतंच झालं ब्रेकअप

काही दिवसांपूर्वीच विकी आणि हरलीन कौरचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर विकी लवकरच यातून बाहेर पडला आणि त्याने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकी ‘अश्वत्थामा’ चित्रपट करत असून दुसऱ्या बाजूला धर्मा प्रॉडक्शनचा ‘तख्त’देखील करत आहे. या चित्रपटात रणवीर, करीना, जान्हवी, आलिया अशी खूपच मोठी स्टारकास्ट दिसणार आहे.

फोटो सौजन्य – Instagram

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा –

मुलगी निसाच्या बॉलीवूड डेब्यूवर काजोलचा खुलासा

तेरे नामचा ‘राधे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Good News: ‘हेट स्टोरी’ फेम सुरवीन चावलाच्या घरी आली ‘ईवा’

ADVERTISEMENT
23 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT