ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
प्रत्येकाला उपयोगी पडणाऱ्या 10 सोप्या ट्रीक्स

प्रत्येकाला उपयोगी पडणाऱ्या 10 सोप्या ट्रीक्स

दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांना दूर करण्यात आपला बराच वेळ जातो. जो आजकाला कोणाकडेच नाहीये. आजकाल प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी आपण शॉर्टकट्सच्या शोधात असतो. ज्यामुळे आपलं काम वेळेवर होऊ शकेल. जर पाहायला गेलं तर आपल्या अशा बऱ्याच समस्यांना सामोर जावं लागतंच ज्यात आपला नाहक वेळ जातो. दैनंदिन जीवनातल्या अशाच काही छोट्या समस्यांना दूर करण्यासाठी नक्की वाचा या 10 सोप्या ट्रीक्स. चला जाणून घेऊया कसं ते –

1 – कपड्यावरील डाग होतील गायब

pjimage

अनेक वेळा खाताना किंवा पेन आणि मार्करचा वापर करताना आपल्या कपड्यांवर डाग पडतात. जे लगेच काढणं शक्य नसतं. पण अगदीच अशक्यही नसतं. जर तुमच्याकडे सॅनिटायजर असेल तर टेन्शनचं कारणच नाही. फक्त त्या डागावर सॅनिटायजरचे काही थेंब टाका आणि 5 मिनिटं तसंच ठेवा. मग पाण्याने तो धुवा आणि पुसा. डाग गायब होईल.

2 – नवीन शूज सैल करण्यासाठी

pjimage %282%29

ADVERTISEMENT

कधीही नवीन शूज घेतल्यावर पहिले काही दिवस त्रास हमखास होतोच. कधी ते इतके घट्ट होतात की, शू बाईट होतं. असा त्रास टाळायचा असल्यास तुम्ही एक जोडी मोजे आणि ड्रायरचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही नवीन शूज घालाल तेव्हा आधी मोजे घाला आणि मग शूज. त्यानंतर शूजवरून काही मिनिटं हेअर ड्रायर फिरवा. मग हवं असल्यास मोजे काढून टाका. मग पाहा तुम्ही किती आरामात शूज घालू शकाल.   

3 – ईअरफोन चांगले राहतील जास्त दिवस

F7Y5KP2IXAPZQM4.LARGE

जर तुम्ही रोज प्रवास करत असाल किंवा वॉकला जात असाल तेव्हा नक्कीच ईअरफोनचा वापर गाणी ऐकण्यासाठी नक्की करतच असाल. पण रोजच्या वापरामुळे ईयरफोन लवकर खराब होतात. हे टाळायचं असल्यास एक उपाय आहे. ईअरफोनच्या लीडमध्ये पेनाची स्प्रिंग घाला आणि मग पाहा तुमचे ईअरफोन वर्षानुवर्षे चालतील.

4 – आर्टिफिशिअल ज्वेलरीचा होणार नाही त्रास

pjimage %281%29

ADVERTISEMENT

आजकाल फॅशन म्हणून प्रत्येकजण आर्टिफिशिअल ज्वेलरीचा वापर करताना दिसतं. पण ज्याची त्वचा सेन्सेटीव्ह असते त्यांना हे दागिने सूट होत नाहीत. अनेक वेळा याचा वापर केल्यावर त्वचेवर रॅशेसही येतात. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर आमच्याकडे आहे उपाय. ज्याच्या वापराने तुम्ही बिनदिक्कत अशी ज्वेलरी कॅरी करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला हवं एक ट्रान्सपरंट नेलपेंट. हे नेलपेंट तुमच्या ज्वेलरीच्या मागच्या साईडला लावा आणि थोडावेळ सुकू द्या. मग तुम्ही बिनदिक्कत आर्टिफिशिअल ज्वेलरी घालू शकता.  

5 – ड्रायरविना सुकवा कपडे

pjimage %284%29

कधी कधी असं होतं की आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असतं पण जे कपडे घालायचे असतात तेच नेमके धुवायला टाकलेले असतात. ते लगेच धुतले तरी सुकवणं शक्य नसतं. अशावेळी तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की, एक मोठा सुकलेला टॉवेल घ्या आणि त्यात तुमचे ओले कपडे मस्तपैकी गुंडाळून ठेवा. आता दोन्ही बाजूंनी ते पिळून घ्या. जास्तीत जास्त पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमचे कपडे वाळत घातल्यावर लगेच सुकतील.

6 – हँड शॉवर करा सहज स्वच्छ

pjimage %283%29

ADVERTISEMENT

बाथरूममध्ये सर्वात कठीण साफ करण्याची गोष्ट असेल तर ती आहे हँड शॉवर. या शॉवरवरील डाग लगेच साफ होत नाही. पण काळजी करण्याचं कारण नाही. फक्त एक ट्रीक वापरायची आहे. एक प्लास्टीकची पिशवी, पाणी आणि व्हिनेगर घ्या. प्लास्टीकच्या पिशवीत पाणी आणि व्हिनेगर मिक्स करून घ्या. आता ही पिशवी शॉवरच्या तोंडाला बांधा आणि एक तास तसंच ठेवा. तुमचा शॉवर अगदी नव्यासारखा भासेल.

8 – दूध जाणार नाही ऊतू

DSC00018

गॅसवर दूध ठेवल्यावर नेमकं आपलं लक्ष नसताना ते ऊतू जातं. तुम्हाला जर हे टाळायचं असल्यास त्या पातेल्यावर किंवा भांड्यावर एक लाकडी चमचा ठेवा. दूध उकळून वर येईल पण ऊतू जाणार नाही हे नक्की. आहे ना मस्त ट्रीक.

9 – किल्ली ओळखणं होईल सोपं

nail-polish-keys

ADVERTISEMENT

बरेचदा असं होतं की, आपण बऱ्याचश्या किल्ल्या एकाच किचेनला लावून ठेवलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा लॉक उघडताना आपण कन्फ्यूज होतो की, कोणती किल्ली कोणत्या कुलूपाची आहे. पण हे टाळता येण्यासाठी तुम्ही एक सोपी युक्ती करू शकता. जर तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त किल्ल्या असतील तर तुम्ही त्यांना नेलपेंटने कलर किंवा त्याच्यावर एखादी खूण करू शकता. यामुळे ऐनवेळी कुलूप उघडताना किल्ली ओळखणं सोपं जाईल.   

10 –  मायक्रोवेव्हमध्ये जेवण होईल चांगल गरम

pjimage %287%29

कधी कधी आपण जेव्हा मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करतो तेव्हा ते नीट गरम होत नाही. विशेषतः भात किंवा बिर्यानीसारखे पदार्थ. यासाठी तुम्हाला प्लेटमध्ये थोडा भात काढून त्याच्या मधोमध थोडी जागा करावी लागेल. असं केल्याने ते जेवण व्यवस्थित गरम होईल. ही ट्रीक खूपच उपयोगी पडते.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

तुम्हाला माहीत आहेत का शरीराशी निगडीत हे 15 शॉकींग फॅक्ट्स

बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

तुमचा मूड लगेच बदलतील 5 सुपर फू़ड्स

14 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT