ADVERTISEMENT
home / सौंदर्य
चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी

चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी

चेहऱ्यावरील लव अनेकांना चांगली वाटते, तर अनेकांना चेहऱ्यावरील लव नकोशी होते. अशावेळी चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. शेव्हिंग, वॅक्सिंग, हेअर रिमुव्हल क्रिम,फेशिअल हेअर रिमुव्हल टुल्स,ट्रिमरया सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. सोयीनुसार आणि तुम्हाला मिळालेल्या वेळेनुसार तुम्ही या पद्धतींचा अवलंब करता खरा… पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वापरत असलेली पद्धत योग्य आहे की नाही याचा कधी तरी विचार केला आहे का? आज आपण फेशिअल हेअर रिमुव्हल संदर्भातच अधिक माहिती घेणार आहोत.

बिकिनी वॅक्ससंदर्भात तुम्हाला काय माहीत आहे? मग जाणून घ्या A to Z  गोष्टी

फेशिअल हेअर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (Methods of facial hair removal)

  • शेव्हिंग (shaving)

चेहऱ्यावरील केस काढण्याचा हा अत्यंत चुकीचा पर्याय आहे असे आम्हाला वाटते.जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रेझर फिरवत असाल तर त्याचा आताच वापर थांबवा. कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लव कमी न होता ती अधिक वाढत जाते. त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही रेझरचा वापर टाळा. शॉर्टकट म्हणून हा पर्याय अवलंबणे सगळ्या जास्त हानिकारक आहे.

  • वॅक्सिंग (waxing)

face wax

ADVERTISEMENT

आता अगदी सगळ्याच पार्लरमध्ये ‘फेशिअल वॅक्सिंग'(Facial wax) केले जाते. इतर वॅक्सिंगप्रमाणेच हे वॅक्सिंग असून यामध्ये रिका वॅक्सचा सर्वाधिक वापर केला जातो. हे  वॅक्स तुलनेने महाग असल्यामुळे अनेक जणांना ते सेफ वाटते. पण जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या वॅक्सिंगचा पर्याय निवडू नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा ओढली जाण्याची शक्यता अधिक असते. काही काळासाठी तुम्हाला तुमचा चेहरा चांगला वाटेल. पण त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स किंवा अन्य त्रास उद्भवू शकतील त्यामुळे जर तुमची त्वचा नाजूक, तेलकट असेल तर अशांनी वॅक्सिंगचा पर्याय शक्यतो निवडू नये.

  • हेअर रिमुव्हल क्रिम (Hair removal cream)

घरच्या घरी करण्यासारखा सोपा पर्याय म्हणजे हेअर रिमुव्हल क्रिम… चेहऱ्याला लावल्यानंतर अगदी काही मिनिटे वाट पाहून तुम्ही चेहऱ्यावरील अतिरिक्त केस काढू शकता. पण या हेअर रिमुव्हल क्रिममधील केमिकल्स तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे जर तुम्हाला याचा योग्य वापर माहीत नसेल तर तुम्ही या क्रिम्स वापरणे टाळलेलेच बरे. 

  • फेशिअल हेअर रिमुव्हल टुल्स (facial hair removal tools)

हल्ली बाजारात सर्रास फेशिअल हेअर रिमुव्हल टुल्स मिळतात. यामध्ये तुम्हाला स्प्रिंग,रेझर सदृश्य अनेक प्रकार मिळतात. पण जर तुम्हाला ते वापरण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर ठिक नाही तर याचा त्रास इतकाच की तुम्हाला त्यामुळे जखमा होऊ शकतात. शिवाय या प्रकारच्या रिमुव्हल टुल्समुळे तुमचे येणारे केस जाडही येऊ शकतात .त्यामुळे त्यांचा वापर करताना जरा जपून

घरच्या घरी असा स्वच्छ करता येईल कंगवा, वाचा टीप्स

ADVERTISEMENT
  • ट्रिमर (trimmer)

जर तुम्हाला अगदी सोपा आणि त्रास न देणारा पर्याय हवा असेल तर फेशिअ ट्रिमर हा त्यावर एक चांगला पर्याय आहे. हा प्रकार दुखतही नाही म्हणून तो अनेक जण वापरतात. हे ट्रिमर महाग असतात. हल्ली बाजारात वेगवेगळ्या कंपन्याचे असे ट्रिमर येतात. जे खास तुमच्या नाजूक भागांवरील केसासांठी बनलेले असतात. त्यांचा वापर हा तुलनेने फारच सोपा असतो. तुम्हाला ही मशीन ज्या ठिकाणी केस आहे तेथे फिरवायची असते. 

  • रेडिमेड वॅक्स स्ट्रिप (Ready to use wax strips)

हल्ली बाजारात रेडिमेड वॅक्स स्ट्रिप मिळतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठीच ते खास बनवलेले असतात. जर तुम्हाला वॅक्स स्ट्रिप ओढायला त्रास होत नसेल तर तुम्ही या स्ट्रिपचा वापर करु शकता. अनेक कंपनीचे लहान लहान वॅक्स स्ट्रिप मिळतात ते वापरणे सोपे असते. पण त्यानंतर पोस्ट केअर घेणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पोस्ट केअरच्या टीप्स देखील दिल्या जातात. त्यांचे पालन केल्यास त्याचा त्रास होत नाही. 

 

नैसर्गिक पद्धतीनेही काढता येतात चेहऱ्यावरील केस(Natural remedies for removing facial hairs)

या व्यतिरिक्तही केस काढण्याच्या नैसर्गिक पद्धती आहे. या सोप्या आहेत आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत नाही. उलट ते तुमच्या त्वचेला अधिक तजेला देतात. 

ADVERTISEMENT

हळद आणि बेसन

halad and besan

हळद आणि बेसन तुमच्या चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी उत्तम आहे. एका भांड्यात एक मोठा चमचा बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद घाला. मिश्रण एकजीव करुन त्याची तयार पेस्ट चेहऱ्याला लावा.

पॅक सुकल्यानंतर तो तुम्हाला थोडा घासून काढायचा आहे. केसाच्या उलट दिशेने तुम्हाला तो स्क्रब करायचा आहे.

तुम्हाला तुमची गालाकडील,अपर लीप आणि लोअर लीपवरील लव निघालेली दिसेल.

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोन दिवस तुम्ही हा प्रयोग करु शकता.

अंड्याचा मास्क

egg mask %281%29

अंड्याचा मास्कही तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वापरु शकता. यासाठी तुम्हाला एक अंड, कॉर्नफ्लॉवर, 1टेबलस्पून साखर

एका अंड्याचा पांढरा बलक घेऊन त्यात एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि साखर घाला

ADVERTISEMENT

तयार पॅक चेहऱ्याला लावा.

वाळल्यानंतर तो ओढून काढा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात लगेच बदल जाणवेल. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनदा करु शकता.

तुम्हाला झालेला बदल थोड्यादिवसांनी दिसून येईल.

अपरलीपवरील केस काढताय, मग अशी घ्यायला हवी काळजी

ADVERTISEMENT

केस काढल्यानंतर अशी घ्या काळजी

facial hairs

चेहऱ्यावरील केस कोणत्याही पद्धतीने काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणेही आवश्यक असते. केस काढल्यानंतर तुम्ही चेहऱ्याची कशी काळजी घ्यायला हवी ते पाहुया

अॅलोवेरा जेल (Aloe vera Gel) :

चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल. त्यामुळे ती जळजळ शांत करण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे तो म्हणजे अॅलोवेरा जेल. केस काढल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावा. त्यामुळे तुम्हाला थंड तर वाटेलच. शिवाय केस काढल्यामुळे ओपन झालेल्या पोअर्समध्ये घाण जाणार नाही. चेहरा अधिक मुलायम वाटेल.

ADVERTISEMENT

मॉश्चरायझर (Moisturiser): 

तुम्हाला तुमचा चेहरा हायड्रेटिंक आणि फ्रेश राहावा असे वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्याला कायम मॉश्चचरायझर लावून ठेवा. त्यामुळे तुम्हाला होणारा इतर त्रास होणार नाही. 

सनस्क्रिन (sunscreen):

चेहऱ्यावरील केस हे तुमच्या चेहऱ्याला अतिनील किरणांपासून वाचवत असतात. ज्यावेळी तुम्ही केस काढता त्यावेळी तुमच्या चेहऱ्याला थेट ऊन लागते.त्यामुळे तुमचा चेहरा काळवंडण्याची अधिक भिती असते. त्यामुळे तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रिन लावायला विसरु नका. 

ADVERTISEMENT

वेळीच करा ट्रिम :

एकदा तुम्ही चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा केस येणारच. ते केस तुम्ही योग्यवेळी काढले तरच उत्तम. तुमच्या केसांच्या ग्रोथनुसार तुम्ही पुन्हा कधी केस काढणार ते ठरवून घ्या.

लक्षात ठेवा या गोष्टी

  • चेहऱ्यावर कोणताही नवा प्रयोग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखणे महत्वाचे असते. याचे कारण असे की, जर तुमची त्वचा नाजूक असेल तर यातील काही प्रकारांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • चेहऱ्यावरील लव ही जास्तवेळा साईडबर्न म्हणजेच गालफाड, अपरलीप, फोरहेड आणि हनुवटीवर असते.
  • जर तुम्हाला हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे चेहऱ्यावर केस आले असतील तर तुम्ही अधिक काळजी घ्यायला हवी, कारण तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतलेला बरा.
  • पार्लरमध्ये चेहरा वॅक्स करताना ते कोणत्याप्रकारातील वॅक्स वापरणार आहेत ते विचारुन घ्या. जर तुम्हाला त्या वॅक्सची अॅलर्जी असेल तर  आधीच ब्युटी एक्सपर्टला ते सांगा.
  • चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर तुम्हाला काही दिवस म्हणजे ग्रोथ येईपर्यंत चेहरा छान गुळगुळीत वाटेल. पण कदाचित बारीक बारीक केस आल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा रफ वाटेल. केसांची टोकं लागतील. त्याची मानसिक तयारी असू द्या.

hair lesar

  • जर तुमच्या चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त केस असतील तर तुम्ही लेझर हेअर रिमुव्हलचा पर्याय देखील निवडू शकता. कारण त्याचा लाभ तुम्हाला अधिक काळासाठी मिळू शकेल.तुम्हाला तुमचा चेहरा सतत शेव्ह करावा लागणार नाही.
  • चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर त्यावर थेट कसलाही प्रयोग करु नका. म्हणजे ब्लिचिंग किंवा अन्य काही करण्यापूर्वी सल्ला घ्या.

 

ADVERTISEMENT

 

 

13 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT