ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
घरगुती उपायांनी घालवा घामुळं आणि Rashes!!

घरगुती उपायांनी घालवा घामुळं आणि Rashes!!

सध्या उन्हाळा खूपच जास्त झाला आहे. उच्च तापमान आणि घामामुळे प्रत्येकाचे हाल होत आहेत आणि त्यामुळे सर्वात पहिली समस्या उद्धवते ती म्हणजे घामुळं आणि दुसरी समस्या म्हणजे rashes. जेव्हा अंगावर जास्त घाम येतो तेव्हा घाम तसाच अंगामध्ये झिरपतो आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद होतात, त्याचमुळे तुमच्या अंगावर रॅशेस उठतात. Rashes हे एखाद्या लाल चट्ट्याप्रमाणे असतात. अंगावर घामुळे आणि रॅशेस आल्यास, प्रचंड प्रमाणात खाज येते. या दोन्ही समस्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॉमन आहेत असं जरी म्हटलं तरीही कोणालाही अंगावर घामुळं आणि rashes आलेले आवडत नाहीत. वास्तविक घट्ट कपडे घातल्याससुद्धा ही समस्या येते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? ही समस्या घरगुती उपायांनी लवकर बरी करता येते. घरगुती उपायांनी आता करा घामुळं आणि रॅशेसला Bye Bye!

1. ‘टरबूज’ मुळे होते लवकर सुटका!

घामुळ्यातून लगेच सुटका (immediate relief) हवी असल्यास, टरबूज हे फळ खूपच उपायकारक आहे. त्यासाठी तुम्हाला टरबूज घेऊन त्यातील बी काढून टाकावी लागेल. त्यानंतर त्याचा पल्प तयार करा. हा पल्प तुमच्या घामुळं आलेल्या भागाला अथवा 25-40 मिनिटांनंतर थंड पाण्याने आंघोळ करा. याशिवाय तुम्ही टरबूज ब्लेंड करूनही त्याचा वापर करू शकता. टरबूजमुळे त्वचेच्या आतील भागावर चांगल्या प्रकारे हायड्रेट होते.

2. ‘कडूलिंबा’मुळे होतं घामुळं कमी

lime leaf

कडूलिंबामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटी – इन्फ्लेमेटरी घटक असतात, जे इन्फ्लेमेशन आणि घामुळ्यामुळे येणाऱ्या खाजेवर नियंत्रण आणतात तसंच लिंबू हे शरीरावर खाज येण्यापासूनही रोखतात. यासाठी कडूलिंबाची काही पानं घेऊन थोडंसं पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्हाला घामुळं आलेल्या आणि rashes आलेल्या ठिकाणी लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने सदर भाग धुऊन घ्या. असं दिवसातून एकदा करा. एका आठवड्यात तुम्हाला याचा उत्कृष्ट निकाल दिसेल. तुम्हाला हवं असल्यास, ही पेस्ट बेसनमध्ये मिसळूनही तुम्ही अंगावर लाऊ शकता.

ADVERTISEMENT

3. भयंकर जळजळीतून मुक्त करेल ‘काकडी’

cucumber for sunburn

घामुळं अंगावर आल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे घामुळ्यामुळे होणारी जळजळ. हे ठीक करण्यासाठी काकडी हा योग्य उपाय आहे. घामुळ्यावर साल काढलेल्या काकडीचे काही स्लाईस ठेवा अथवा काकडीचा पल्प बनवून तो तुमच्या त्वचेवर लावा. 30-40 मिनिट्स झाल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. असं आठवडाभर केल्यानंतर तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल.

4. ‘कोरफड’ थांबवते इन्फेक्शन

aleo vera gel

कोरफडमधील अँटी बॅक्टेरियल (anti-bacterial), अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक घटक हे घामुळ्याशिवाय त्वचेवर आलेले rashes देखील कमी करतात. तसंच त्वचा हायड्रेट करण्याबरोबरच त्वचेवरील झालेलं इन्फेक्शन कमी करण्याचं कामदेखील करते. शिवाय लवकरात लवकर इन्फेक्शन दूर करून त्वचेला बरं करण्यास फायदेशीर ठरते. तसंच त्वचेवरील rashes कमी करण्यासाठीदेखील कोरफडचा उपयोग होतो. कोरफडची जेल सरळ तुमच्या त्वचेला लावा. रोज दिवसातून तुम्ही 2-3 वेळा लावल्यानंतर तुम्हाला याचा फरक जाणवेल.

ADVERTISEMENT

5. ‘मुलतानी माती’ त्वचेवरील irritation पासून देते सुटका

multani

मुलतानी मातीमध्ये त्वचेला साजेसे घटक असतात जे घामुळ्यामुळे त्वचेवर आलेले irritation, inflammation आणि खाज दूर करण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही 5-6 चमचे मुलतानी माती घ्या. त्यामध्ये थोडं गुलाबपाणी मिसळा. घामुळं आलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा. ही सुकल्यानंतर 2-3 तासानंतर थंड पाण्याने धुवा. हे उपचार तुम्ही दिवसातून एकवेळ करा आणि आठवड्याभरानंतर तुम्ही फरक बघा.

6. Inflammation पासून होईल लगेच सुटका ‘ओटमील बाथ’ने

oatmil

ओटमीलमध्ये anti-irritating, anti-inflammatory आणि सूदिंग घटक असतात ज्यामध्ये घामुळं आणि खाज या दोन्हापासून सुटका लगेच मिळवून देण्यास मदत होते. त्वचेला exfoliate करून त्यातील घाम काढून टाकण्यास याची मदत होते. यासाठी तुम्ही बाथटबमध्ये थंड पाणी काढा आणि त्यामध्ये 1 कप बारिक ओटमील पावडर टाका. आता हे व्यवस्थित मिक्स करा. हे मिक्स करताना पाण्याचा रंग दुधासारखा होतो की नाही ते पाहा. या पाण्यात तुम्ही साधारण 20-35 मिनिट्स आरामत पडून राहा. त्यानंतर बाहेर येऊन सॉफ्ट टॉवेलने अंग पुसून स्वच्छ करा. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ असं केल्यास, तुम्हाला काहीच दिवसात फरक जाणवेल.

ADVERTISEMENT

7. खाज आणि जळजळवर उपायकारक ‘कापूर’

घामुळ्याने येणारी खाज आणि जळजळीवर सर्वात उपायकारक वस्तू म्हणजे कापूर. हा सर्वात जुना उपाय आहे. कापूर वाटून त्याची पावडर करून घ्या आणि त्यामध्ये कडूलिंबाचं तेल घालून जाडसर पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्हाला घामुळं आलेल्या ठिकाणी लावा. ही पेस्ट लावल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचा थंडावा लागेल आणि त्याचा फरकही लगेच जाणवेल.

8. त्वचेला थंडावा देईल ‘चंदन’

chandan

चंदनातील घटकांमुळे घामुळ्याची लक्षणं कमी होतात. हे शरीराचं तापमान कमी करण्यास फायदेशीर आहे. तसंच यामुळे घामुळं फारच लवकर कमी करण्यातही फायदेशीर आहे. चंदनाचा उपयोग तुम्ही 3 प्रकारामध्ये करू शकता –

– चंदन पावडर आणि गुलाबपाणी समान प्रमाणात घेऊन मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करून ती तुमच्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. असं रोज दिवसातून दोन वेळा करा आणि एकाच आठवड्यात याचा योग्य परिणाम पाहा.

ADVERTISEMENT

– चंदन पावडर आणि धने पावडर समान प्रमाणात घ्या आणि गुलाबपाणी घालून त्याची जाडसर पेस्ट करून घ्या. पेस्ट तुमच्या त्वचेला लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने त्वचा धुवा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा.

– चंदन पावडरचा उपयोग तुम्ही टॅल्कम पावडरप्रमाणेही करू शकता. आंघोळ केल्यानंतर तुम्ही ही पावडर अंगाला लावा.

9. खाजेच्या त्रासापासून वाचवतं ‘आलं’

ginger

आल्यामध्ये असलेल्या घटकांमुळे बऱ्याचदा शरीराच्या समस्या सोडवण्यास मदत होते. घामुळं किंवा rashes मुळे होणाऱ्या खाज आणि स्टिंगिंग सेन्सेशनपासून आलं सुटका मिळवून देतं. आलं किसून अथवा ठेचून पाण्यात घाला आणि हे पाणी उकळून घ्या. पाणी थंड होऊ द्या आणि मग नरम कपड्यांनी अथवा स्पंजने हे पाणी तुमच्या त्वचेवर घामुळं आलेल्या ठिकाणी लावा. हा उपचार तुम्ही दिवसातून एकदा करा.

ADVERTISEMENT

10. उपायकारक पपई, मध आणि बटाटा

papaya

या उपायांनीदेखील खाज कमी होते.

– पपई ही जळजळ आणि खाजेपासून सुटका मिळवून देते. तुम्ही पिकलेली पपई मॅश करून तुमच्या त्वचेवर लावा आणि 20-30 मिनिट्सनंतर पाण्याने धुवा.

– अँटीबॅक्टेरियल आणि मॉईस्चरायजिंग घटक असल्यामुळे मध हे त्वचेसाठी एक वरदानच आहे. मध तुम्ही तुमच्या त्वचेवर लावा आणि 20-30 मिनिट्सनंतर धुऊन टाका.

ADVERTISEMENT

– बटाटा घामुळ्याने होणारी खाज आणि टोचण्यापासून सुटका मिळवून देतो. त्वचेवर तुम्ही साल काढलेल्या बटाट्याने स्लाईस लावा आणि 20-25 मिनिट्स ठेऊन तुम्ही धुऊन टाका.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर

ADVERTISEMENT

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

Cucumber Benefits In Marathi

22 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT