ADVERTISEMENT
home / Shoes
जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!

जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!

उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा असो जीन्स हा प्रत्येकीच्याच वॉर्डरॉबचा महत्त्वाचा भाग आहे. कारण जीन्सही कधीही पटकन घालता येते आणि रफ अँड टफ असल्याने घातल्यावरही कंफर्टेबल वाटतं. त्यामुळे जीन्सला आपली सेकंड स्कीन असं म्हणायला हरकत नाही. पण आता प्रश्न असा आहे की, बाजारात जीन्सच्या इतक्या व्हरायटीज आहेत. जसं स्कीनी, स्ट्रेट कट, हाय वेस्ट इ. त्यामुळे घेताना आवड म्हणून आपण जीन्स तर घेतो पण नंतर त्यावर काय घालायचं हा प्रश्न पडतो. तुमचा हाच प्रोब्लेम दूर करण्यासाठी आम्ही आहोत ना. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या जीन्सवर कोणता टॉप दिसेल परफेक्ट. चला तर मग सुरू करूया आपली स्टाईलिंग जर्नी.

क्रॉपड जीन्स

jeans-1

क्रॉप जीन्स ही प्लेफुल vibe देते. त्यामुळे क्युट कॅज्युअल लुकसाटी तुम्ही यावर गर्ली टीशर्टचं कॉम्बिनेशन करू शकता. तसंच यावर तुम्ही semi-formal शर्ट किंवा स्लीक ब्लॅक टँक-टॉप (सिल्क टॉपही खूपच छान दिसेल) सोबतही कॅरी करू शकता. पण या जीन्समध्ये तुमचे पाय हे नॅचरली शॉर्ट वाटतात त्यामुळे हील्स घालणं मस्ट आहे. हील्समध्ये तुम्ही पंपस्, न्यूड वेजेस किंवा अँकल लेंथ बूट्स घातले तर नक्कीच छान दिसतील. आम्ही तुम्हाला सूचवू – MickeyRed Printed T Shirt (रु.499)

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

ADVERTISEMENT

हाय वेस्ट जीन्स

jeans-2

हाय राईज जीन्स खूपच क्लासिक आणि chic दिसते आणि ही एकच अशी जीन्स आहे जी कोणीही घातली तरी चांगली दिसते. हाय वेस्ट जीन्सवर तुम्ही हाय हील्स घातल्यास तुमचे पाय अजून लांब असल्याचा भास होतो. ही जीन्स अनेक फिट्स आणि कट्समध्ये उपलब्ध आहे. पण क्लासिक हाय वेस्ट जीन्सला तुम्ही कॅज्युअलसोबतच अपस्केल प्रोफेशनल लुकही देऊ शकता. ही जीन्स घाला फेमिनन tailored शर्टसोबत. असा शर्ट नेहमी टक ईन करावा म्हणजे तुम्हाला कंबर फ्लाँट करता येईल. नाहीतर हाय वेस्ट जीन्स घालायचा काय फायदा. या लुकवर बारीक (thin) बेल्ट घाला आणि सेक्सी हाय हील्स (पम्पस) ने तुमचा लुक कंप्लीट करा. 

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स 

बॉयफ्रेंड जीन्स

jeans-3

ADVERTISEMENT

बॉयफ्रेंड जीन्समध्ये थोडा masculine feel असतो. जो तुम्हाला टॉम बॉय किंवा गर्ली लुकमध्ये स्टाईल करता येईल.  रफ अँड टफ लुकसाठी तुम्ही लूज क्रॉप टॉप, leather बाईकर जॅकेट आणि अँकल लेंथ बूट यासोबत घालू शकता. आरामदायक आणि chic असल्यामुळे ही जीन्स कॅज्युअल डेट किंवा आऊटींगसाठी परफेक्ट आहे. मग masculine जीन्सला एखाद्या क्यूट गर्ली टॉप आणि गर्ली बॅलरीनासोबत accessorize करा. आम्ही सूचवू – HarpaBlack Solid Crop Top (रु 1199)

ओव्हरसाइज्ड टी-शर्ट बद्दल देखील वाचा

स्किनी जीन्स

jeans-4

जेव्हा ही जीन्स ट्रेंडमध्ये आली तेव्हापासून प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक ना एक तरी स्कीनी जीन्सही असतेच. ही जीन्स तुम्ही टी-शर्ट, टँक-टॉप, डेलिकेट पार्टी टॉप, शर्टसोबतही घालू शकता. पार्टी लुकसाठी डेलिकेट पार्टी टॉप (जसा सिल्की peplum टॉप), सोबत घाला. कॅज्युअल लुक- टी-शर्ट, टँक-टॉप किंवा शर्टसोबत तुम्ही बॅलरीना, wedges किंवा हील्स घालू शकता. जर तुमचं बॉटम हेवी असेल तर हिप कव्हर करणारा टॉप घाला. आम्ही तुम्हाला सूचवू- Cult FictionGrey Solid T Shirt (रु 799) 

ADVERTISEMENT

तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स 

स्ट्रेट फिट जीन्स

jeans-5

ही जीन्स शक्यतो सगळ्यांवरच छान दिसते आणि त्यामुळे ही जीन्ससुद्धा तुम्ही स्कीनी जीन्सप्रमाणेच स्टाईल करू शकता. फरक फक्त इतकाच आहे की, ही जीन्स शक्यतो सगळ्या बॉडी टाईपला सूट होते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही टॉपसोबत ही जीन्स घालू शकता पण यावर wedges किंवा हील्स नक्की घाला. आम्ही सूचवतो – PurysBeige Shirts (रु 524)  

उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स

ADVERTISEMENT

फ्लेयर्ड जीन्स

jeans-6

ही जीन्स तुम्हाला नक्कीच रेट्रो एराची आठवण करून देईल आणि जर तुमचं बॉटम हेवी असेलत तर तुमच्यासाठी ही जीन्स उत्तम पर्याय आहे. पण याचा अर्थ असा नाही की, इतरजणी ही जीन्स घालू शकत नाहीत. या जीन्सवर तुम्ही फिटींगचा शॉर्ट टॉपही घालू शकता. जीन्सच्या खालून फ्लेयर्ड असल्यामुळे यावर लूज टॉप घालू नका. तसचं तुम्ही या जीन्ससोबत हील्स जसं पंम्प्स पेअर अप करायला विसरू नका.    

आता आम्हाला खात्री आहे की, तुमचं थोडं तरी कन्फ्यूजन कमी झालं असेल. मग पुढच्या वेळी तुमच्या जीन्सला थोडा अजून स्टाईलिश लुक द्यायला विसरू नका आणि मग मिळवा भरपूर Compliments.

देखील वाचा – 

ADVERTISEMENT

वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ फॅशन टीप्स

तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजेत हे ट्रेंडी क्रॉप टॉप्स

श्रेडेड लाँग टॉप्स (Shredded Long Tops In Marathi)

07 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT