ADVERTISEMENT
home / Fitness
ऑफिसमध्ये बसल्याजागी करा ‘हे’ स्ट्रेचिंग एक्सरसाईज

ऑफिसमध्ये बसल्याजागी करा ‘हे’ स्ट्रेचिंग एक्सरसाईज

सध्या कामाचा ताण, बैठी जीवनशैली, ऑफिसमध्ये बसून काम करण्याची सवय यामुळे स्थूलपणा वाढत चालला आहे. वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची शरीराला गरज असते. व्यायाम केल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. मात्र ऑफिसमधील कामाची दगदग, सतत सुरू असलेल्या मिटींग्स, घरातील जबाबदाऱ्या यातून व्यायामासाठी वेळ काढणं कधीकधी कठीण जातं. सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी ऑफिसमध्ये बसल्याजागी काही व्यायाम करून तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकता. ऑफिसमधील एखाद्या ब्रेकमध्ये तुम्ही हे स्ट्रेचिंग एक्सरसाईज करू शकता.

मानेचा व्यायाम

ऑफिसमध्ये कंम्यूटर अथवा लॅपटॉपकडे पाहत तुम्हाला तासनतास काम करावं लागतं. कामाचा ताण आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या गडबडीत मानेवर याचा अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे काम करताना अचानक मानेतून कळा येऊ लागतात. कधीकधी मान आणि पाठीतून येणाऱ्या वेदनांंमुळे काम करणं अशक्य होतं. यासाठीच काम करताना अधूनमधून एक ते दोन वेळा मानेचा व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं. यासाठी मान एकदा उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा डावीकडून उजव्या दिशेने हळूहळू फिरवावी. त्याचप्रमाणे काही मिनीटे मान वरून खालच्या दिशेने आणि खालून वरच्या दिशेने फिरवावी. तसंच डोके घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चक्राकार फिरवूनदेखील मानेचा व्यायाम तुम्ही करू शकता. मात्र हा व्यायाम करताना हळूवारपणे मानेची हालचाल करा. नाहीतर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते. मात्र मानेचा हा व्यायाम अधूनमधून केल्यामुळे तुमच्या मानेला नक्कीच आराम मिळेल.

shutterstock

ADVERTISEMENT

डोळ्यांचा व्यायाम-

काम करताना एकटक लॅपटॉपच्या स्क्रिनकडे पाहिल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. डोळ्यांवर ताण आल्यामुळे तुमचे डोके दुखू शकते. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे मुळीच योग्य नाही. यासाठी ऑफिस चेअरवर बसल्याजागी तुम्ही हा व्यायाम नक्कीच करू शकता. यासाठी थोड्यावेळ डोळ्यांची हळूवार उघडझाप करा. तसंच मान सरळ ठेऊन डोळे वरून खालच्या दिशेने आणि खालून वरच्या दिशेने फिरवा. याचप्रमाणे घड्याळ्याप्रमाणे डोळे गोलाकार फिरवून तुम्ही डोळ्यांचा व्यायाम करू शकता. मात्र डोळ्यांचा व्यायाम करतानादेखील डोळे अलगद फिरवा. झटपट क्रिया केल्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. डोळ्यांचा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि  काम करताना फ्रेश वाटते.

खांद्याचा व्यायाम-

बसल्या जागी खांद्यांचा व्यायाम करणे सहज शक्य आहे. यासाठी हात कोपरातून दुमडा आणि हाताच्या मुठी खांद्यांवर ठेवा. या स्थिती खांदे पुढून मागच्या दिशेने आणि पुन्हा मागून पुढच्या दिशेने फिरवा. ज्यामुळे तुमच्या मान आणि पाठीवरचा ताण कमी होईल.

 

ADVERTISEMENT

shutterstock

हाताचे पंजे –

सतत कंप्यूटरवर काम करून तुमच्या हाताची बोटे दुखू लागतात. शिवाय दंड आणि मनगटांमधून देखील कळा येतात. अशा वेळी हात समोर समांतर ठेवून एकमेंकावर अलगद आपटावे. हातावर अशी टाळी दिल्यामुळे हातावर आलेल्या कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.

पायांचा व्यायाम-

सतत खुर्चीवर बसून काम केल्यामुळे कंबर आणि पाय दुखू लागतात. अशा वेळी खुर्चीवर बसूनच पाय समोर ताणून धरावेत आणि पावले घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरवावी ज्यामुळे पावलांमधील ताण कमी होतो आणि पायांमधील जखडलेले स्नायू मोकळे होतात.

 

ADVERTISEMENT

उभे रहावे आणि पाच मिनीटे चालावे-

सतत बसून अंग दुखू लागले असेल तर दर एक तासांनी उभे रहावे आणि पाच मिनीटांचा वॉक घ्यावा. पाणी, कॉफी घेण्यासाठी अथवा वॉशरूममध्ये जाताना तुम्ही हा व्यायाम करू शकता.

श्वासावर नियंत्रण

काम करता करता तुम्हाला ताण आला असेल तर सरळ दीर्घ श्वास घ्या आणि संथपणे श्वास बाहेर टाका. असे कमीतकमी पाच मिनीटे करा. ज्यामुळे तुमच्या मनावर आलेला कामाचा ताण कमी होईल. शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. यासोबत पाच मिनीटे फक्त श्वासावर लक्ष ठेऊन मेडिटेशन केल्याचादेखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मात्र प्राणायमाचे प्रकार ऑफिसमध्ये करू नयेत. कारण प्राणायमाचे काही प्रकार हे उपाशीपोटी करावे लागतात. शिवाय त्यामुळे तुमच्या इतर सहकाऱ्यांना त्रास होऊ शकतो.

ऑफिसमध्ये करण्यासारखे हे व्यायाम दिसायला साधे असले तरी नक्कीच फायदेशीर आहेत. कारण त्यामुळे तुम्हाला नियमित व्यायाम मिळू शकतो. कारण  या व्यायामामुळे तुम्हाला इंस्टंट ऊर्जा मिळू शकते. ज्यामुळे कामाचा उत्साह नक्कीच वाढू शकतो. सुटीच्या दिवशी जड व्यायाम, दररोज सकाळी अथवा संध्याकाळी कमीतकमी तीस मिनीटे चालण्याचा व्यायाम आणि ऑफिसमध्ये असताना हे स्ट्रेचिंग एक्सरसाईज करून तुम्ही तुमचे जीवन निरोगी आणि शरीर सदृढ ठेऊ शकता.

अधिक वाचा

ADVERTISEMENT

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

#internationalyogaday निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)

#internationalyogaday : ‘मेडिटेशन’ ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा

ADVERTISEMENT

वजन कमी करण्याच्या नैसर्गिक पद्धती

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

24 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT