प्रत्येक मुलीकडे दागिन्यांचे हमखास कलेक्शन असते. अगदी रोज घालायला नाही. पण काही खास प्रसंगी घालण्यासाठी असे दागिने आपल्याकडे असतातच. पण जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर तुमच्याकडे काही दागिने हे असायलाच हवेत. अगदी कोणत्याही प्रसंगी हे दागिने तुमच्यावर खुलून दिसतात. आज आपण असेच काही दागिने पाहणार आहोत.जे प्रत्येक महाराष्ट्रीय मुलीकडे असलेच पाहिजे. मग करुया सुरुवात
मराठमोळ्या दागिन्यांनी खुलवा नववधूचा श्रृगांर
1. बोरमाळ
बोरांच्या आकाराप्रमाणे मणी असलेली ही माळ बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. हा दागिना पारंपरिक प्रकारातील असून आता बाजारात या प्रकारामध्ये विविधता दिसून येते. सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही शेडमध्ये हे दागिने मिळतात. एक नाही तर आता तीन ते चार सरींची बोरमाळही सध्या बाजारात मिळतात. हा दागिना तुमच्याकडे असायलाच हवा. कारण हा दागिना पारंपरिक वाटत असला तरी तुम्ही कुडता, ट्रेडिशनल पंजाबी ड्रेस किंवा एखाद्या फॅन्सी टॉपवरही घालू शकता. हा दागिना ट्रेडिशनल वाटत असला तरी तो तुम्हाला एक वेगळा लुक देऊ शकतो.
वाचा – Marathi Paramparik Dagine
2.ठुशी
जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर तुमच्याकडे ठुशीही असायला हवी. बाजारात कितीही चोकरसेट आले तरीदेखील ठुशी ही कायमच एव्हरग्रीन आहे. ठुशीचे वेगवेगळे प्रकार सध्या मिळतात. सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये ठुशी मिळते. गळ्यालगत असणारा हा दागिना तुम्ही काठापदराची साडी नेसणार असाल तर तुम्हाला एक वेगळा एलिगंट लुक देतो.
उदा. इरकल, पैठणी, नारायण पेठ किंवा सिल्क साड्यांवर तुम्ही हा दागिना घालू शकता.
मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसुत्रांच्या या डिझाईन्स
3.तोडे
तुम्हाला जर हातात काही वेगळं पण पारंपरिक घालायचे असेल तर तुम्ही तोडे हा दागिना नक्कीच घालून पाहायला हवा. बांगड्याच्या तुलनेत तोडे थोडे जाड असतात. हा दागिना हिरव्या बांगड्यांसोबत घातला जातो. यावर कोयरीच्या डिझाईन्स असतात. आता या डिझाईन्समध्ये व्हरायटी पाहायला मिळतात. पण जर तुम्ही काही ट्रेडिशनल घातले असेल आणि तुम्हाला त्यावर साजेशा बांगड्या हव्या असतील तर तुम्ही तोडे घालू शकता.
जाणून घ्या काय आहे पेपर ज्वेलरीबद्दल सर्वकाही
4.नथ
महाराष्ट्रीयन मुलीकडे नथ नसेल असे शक्यच नाही. नथ ही प्रत्येक नवरीसाठी महत्वाचा दागिना असतो. पण तुमचे लग्न झाले असेल किंवा नसेल तुमच्याकडे अगदी आवर्जून हा दागिना असायला हवा. बाजारात कितीही वेगळ्या प्रकारच्या नथ असल्या तरी देखील टिपिकल नथीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हल्ली हे ट्रेडिशनल दागिने वेगवेगळ्या प्रकाराच्या कपड्यांवर घालण्याचा ट्रेंड आला आहे.
उदा. धोती पँटस- शॉर्ट टॉप किंवा मग अगदीच इंडो- वेस्टर्न कपड्यांवर हल्ली नथ घातली जाते. ही नथ घातल्यानंतर तुमच्या लुकमध्ये तुम्हाला नक्कीट बदल जाणवेल.
5.बाजूबंद
बाजूबंद हा प्रकार तुम्हाला कितीही जुना वाटत असला तरी हा तुमच्या दागिन्यांमध्ये हवा. कारण जर तुम्ही कधी नऊवारी किंवा एखादी पारंपरिक साडी नेसणार असाल अशावेळी तुमच्या साडीची शोभा हा दागिना वाढवतो. त्यामुळे तुमच्याकडे एकतरी बाजूबंदाचा प्रकार हवा.
हे 5 अगदी बेसिक दागिने आहेत जे तुमच्याकडे असायलाच हवे. हे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते नक्की घ्या. यातील वेगवेगळे प्रकार वापरुन पाहायला हरकत नाही.
You Might Like This:
नक्की वापरुन पाहा कोल्हापुरी साजच्या (Kolhapuri Saaj) या अनोख्या डिझाईन्स