काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्या सगळ्यांनाच नेहमीच्या वापरातील पांढरी लसूण माहीत आहे. ज्याचा वापर आपण दैनंदिन जेवणात करतो. काहींना तर प्रत्येक भाजीत लसणाची खमंग फोडणीला घातल्याशिवाय चैन पडत नाही. कारण लसणामुळे पदार्थाला येणारा स्वादच इतका छान आहे. पण काहींना लसूणाचा वास आवडत नाही. यावर एक उत्तम उपाय म्हणजे काळी लसूण (Black Garlic). तुम्ही कधी काळ्या लसूणविषयी ऐकलं किंवा पाहिला आहे का? काळ्या लसूणाचा वास पांढऱ्या लसणासारखा उग्र नसतो. खूप कमी लोकांना काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत. खरंतर काळा लसूण हा पांढऱ्या लसूणचाचं एक रूप आहे. पण काळ्या लसणाचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. त्यामुळे प्राचीन काळापासून औषधांमध्ये आणि उपचारपद्धतींमध्ये काळ्या लसूणाचा वापर केला जातो. त्यामुळेच अनेक आशियाई देशांमध्ये काळ्या लसूणाचा वापर सर्रास होताना दिसतो.   

Shutterstock

काळी लसूण म्हणजे काय?

काळी लसूण हा पांढऱ्या लसूणचाच एक रूप आहे. जो फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार केला जातो. ताजा पांढरा लसूण ठराविक तापमानावर फर्मेंट केला जातो. ज्यामुळे त्याची चव कमी तिखट होते. तो मऊ होतो. पण यामुळे त्यातील पोषक तत्त्व अजिबात कमी होत नाहीत किंवा तो लसूण खराबही होत नाही. 

मराठ्यात काळी मिरी देखील वाचा 

Instagram

फर्मेंटेशनने वाढतात काळ्या लसणातील पौष्टीक तत्त्वं

फर्मेंटेशन प्रक्रियेतून गेल्यामुळे काळ्या लसणामध्ये युनिक अँटी-ऑक्सीडंट्सचे गुण आढळतात. ज्यामुळे हा लसूण अँटी-इन्फ्लेमेटरी म्हणजेच जळजळ नाशक ठरतो. तसंच यात पॉलिफेनॉल, फ्लेवनॉईड आणि अल्कलॉईड पोषक तत्त्व ही या लसणात आढळतात.  

Instagram

आश्चर्य म्हणजे पांढऱ्या लसणात आढळणारं आरोग्यदायी गुणयुक्त एलिसीन हे पोषक तत्त्व काळ्या लसणातही आढळतं. हे रक्ताभिसरण वाढवतं, कॉलेस्ट्रॉल आणि हृदयसंबंधित रोगही कमी करतं. तसंच शरीरातील पेशींचं संतुलन आणि प्रतिकारकक्षमताही वाढवतं. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणही आढळतात. याशिवाय या लसणाचं सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हलही संतुलित राहण्यास मदत होते. 

काळ्या लसूणाचं सेवन या रोगांवर गुणकारी Benefits of Black Garlic

काळ्या लसूणाचं सेवन केल्याने अनेक प्रकारच्या कॅन्सरला आळा बसतो. खासकरून ब्लड कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि कोलन कॅन्सरच्या इलाजात हा लसूण गुणकारी ठरतो. हा लसूण एलर्जी कमी करतो. मेटोबॉलीजम वाढवतो, तसंच लिव्हरला कोणत्याही अपायापासून वाचवतो. याशिवाय काळी लसूण हा मेंदूला आरोग्यदायी ठेवण्यातही मदत करतो. 

Instagram

  • तुम्ही काळी लसूण दैनंदिन जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलात घालून ठेवल्यास तो वापरणं सोपं जाईल. तसंच त्याचे सर्व पौष्टीक गुणही जेवणात उतरतील.
  • हा लसूण तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारात हमखास विकत घेता येईल.
  • तुम्हाला काही त्रास असल्यास किंवा एखादी ट्रीटमेंट सुरू असल्यास याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.