19 जुलै 2019 चं राशीफळ, कन्या राशीला धनलाभ

19 जुलै 2019 चं राशीफळ, कन्या राशीला धनलाभ

मेष - तरूणांना यश मिळेल

आज युवकांना चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. व्यावसायिक योजना सफळ होतील. देणी-घेणी करताना सावध रहा. मित्रांच्या मदतीने धनप्राप्ती होण्याचा योग आहे. परदेशी जाण्याचा बेत आखाल.

कुंभ - आई-वडीलांना एखादे जुना विकार होण्याची शक्यता

तुमच्या आईला आज एखादा जुना आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. मुलांची चिंता सतावेल. तुमच्या एखाद्या जुन्या सवयीचा तुम्हाला पुन्हा त्रास होऊ शकतो. एखाद्या संस्थेकडून सन्मानित व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन- प्रेमसंबध मजबूत होतील

जोडीदाराची मदत आणि धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील. जुन्या मैत्रीतून लाभ होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. प्रवासाचा योग आहे.

वृषभ - आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे

आज पैशांबाबत तुमच्या मनात अस्थिरता निर्माण होऊ शकते. एखाद्या जुन्या कर्जाकडे दुर्लक्ष करू नका. घाई करून एखादे काम बिघडवण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. काम वेळेत करण्याची सवय लावा.

मिथुन - रिपोर्ट चांगला असेल

आज तुमच्या आईवडीलांचा हेल्थ चेकअप टेस्टचा रिपोर्ट चांगल्या असल्याने मन आनंदी होईल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान वाढू शकतो. बोलताना सावध रहा.

कर्क - मनातील एखादी जुनी शंका वर येईल

आज तुमच्या मनातील एखादी जुनी शंका पुन्हा वर येईल. ज्यामुळे एखादे जवळचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. चिडचिड आणि रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. मेहनतीचे फळ उशीरा मिळेल.

सिंह - वडीलांना अॅसिडिटीचा त्रास होईल

आज तुमच्या वडीलांना अॅसिडिटी अथवा सांधदुखीचा त्रास होऊ शकतो. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी जबददस्ती करू नका. मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. मूड स्वींगचा त्रास होईल.

कन्या - धनलाभ होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला जोडीदाराकडून धनलाभ होणार आहे. व्यवसायातील एखादे काम बंद होईल. एखादे काम सहज पूर्ण होऊ शकते. राजकारणात लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल.

तूळ - विवाहाचा प्रस्ताव मिळेल

आज अविवाहित लोकांना एखादे चांगले स्थळ येईल. महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांचा सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मित्रांची मदत मिळेल. धार्मिक कार्याची आवड वाढेल.

वृश्चिक - दुर्लक्ष केल्याने चांगली संधी गमवाल

आज तुम्हाला काही महत्त्वाची कामे करण्याची संधी मिळेल. मात्र तुमच्या दुर्लक्षपणामुळे तुम्ही ही संधी गमवाल. इतरांसाठी चेष्टा आणि टीका करणे टाळा. वादविवाद करू नका. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध काम करावे लागेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

धनु - पुन्हा पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला पुन्हा पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैशांची गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांचे आज अभ्यासात मन रमणार नाही. मंगल कार्यात व्यस्त राहाण्याची शक्यता आहे. प्रेमयुगूलांसाठी चांगला दिवस  आहे. 

मकर - विद्यार्थ्यांचे मन भटकण्याची शक्यता आहे

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे मुड बिघडू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढणार आहे. अती उत्साहात कामाची सुरूवात करू नका. वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम